कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात झालेल्या "पाककला" स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तीळ हा मुख्य घटक वापरुन पदार्थ बनवायचा होता. ह्या पाककला स्पर्धेतली माझी कल्लाकारी
आणि हो... मेहेनतीचं सार्थक झालं हं...... बक्षिस मिळालं
काही लोकांच्या प्रेमळ विनंती साठी सजावट कशी केली ते थोडक्यात
१. आधी बारीक नूडल्स वाफवून घेतल्या. मग एका छोट्या चाळणीत त्याला बाऊल सारखा आकार देऊन तेलात तळून घेतलं. चाळणीतून बाहेर काढल्यावर तयार झालं घरटं.
२." दिलखुश क्रंच” चे चपटे ओव्हल गोळे बनवले. त्यावर लवंगीचे डोळे, पिस्त्याच्या कापाचे नाक आणि बदामाच्या कापाचे ओठ केले. बेकींग कप्स ची टोपी करुन ती टूथपीक ने प्रत्येक गोळ्याच्या डोक्यावर घातली. आधी तयार केलेल्या घरट्यात ही गोजिरवाणी बाळं ठेवली.
३. एका ट्रे मधे माती घालून त्यात मूग, मोहरी पेरली. हे झालं घराचं अंगण. त्यावर फुलांचे वाफे आणि मिर्च्यांचं कुंपण तयार केलं. अंगणात नूडल्सचं घरटं आणि घरट्यात “दिलखुश” गोजिरवाणी बाळं !!!
खूप खूप धन्यवाद लोक्स
खूप खूप धन्यवाद लोक्स
फारच छान. अभीनंद्न.
फारच छान. अभीनंद्न.
Pages