धक्का

Submitted by Deepali_Mali on 14 October, 2008 - 05:36

दोन दिवसांवर नुपूरचा जन्मदिवस आला होता. अर्पणा आणि अजयची नुसती धावपळ सुरु झाली होती. दोघांचा जीव की प्राण असनाय्रा नुपूरचा हा पाचवा जन्मदिवस होता. दोघेही तसे आपआपल्या कंपन्यामध्ये उच्च पदावर कार्यरत होते. नुपूरचा जन्मदिवस आणि येनाय्रा नविन पहून्याचि चाहूल यामुळे ते दोघे खुप आनंदात होते.
नाही नाही म्हनताना देखिल फक्त हटृटापायी त्याने खरेदिस अर्पणाला सोबत येऊ दिले होते. खरेदि मनासारखि झालि होति. अर्पणा लॉनमध्ये अजयचि वाट पाहत ऊभी होती. अजय पार्किंगमधुन कार काथन्यासाथि गेला होता.
"काय हे? किती ऊशिर?" अर्पणाने नेहमिच्या तकरारिचा सुर लावला. तसा अजयने बाहेर येऊन तिच्या हाततल्या सर्व पिशव्या घेऊन कारविंडोमधुन मागच्या सिटवर टाकल्या.
"यावे राणीसरकार " कारचा दरवाजा उघडुन अजय अस्याकाही नाटकी स्वरात म्हणाला की तेथे दुसरे कुणी असते तर तेहि हसत सुटले असते. तिथे अर्पणा बिचारि काय करनार.
तेव्हाच अचानक आवाज झाला. आनि दोघांनि आपला मोर्चा त्या आवाजाच्या दिशेने वळ्वला. तेव्हा त्यांनच्या लक्षात आले कि पाथुन येनाय्रा कारने त्यांच्या कारला धडक दिल्याने तो आवाज झाला होता. त्यामुळे घाबरुन त्या कारचा ड्रायवर बाहेर येऊन माफि मागु लागला.
पन अश्या सुखाच्या क्षणि त्यांना कुनालाहि दुखवायचे नव्ह्ते. म्हनुन ते दोघेहि काहि जुजबी बोलुन कारच्या दिशेने चालु लागले.

"Excusme. I am Extreamly Sorry"

अर्पना बसत असताना पाथुन आवाज आला. आणि हे वाक्य बोलनाय्रा त्या व्यक्तिकडे बघताच अर्पनाच्या पायाखालुन जमिन निसट्ल्या सारखा भास तिला झाला. तिकडे अजयचि अवस्था काहि वेगळि नव्हति.

गुलमोहर: 

दीपाली,
चांगली सुरुवात आहे. फक्त भाग जरा मोठे टाकलेत आणि शुद्धलेखनाच्या चुका टाळल्यात तर वाचायला अजुन जास्त मजा येईल.
मायबोलीवर लेखन अप्रकशित ठेवायची पण सोय आहे त्यामुळे एकावेळी मोठा भाग लिहीणे शक्य नसेल तर ते अप्रकाशित ठेवता येईल आणि मग त्यात भर घातल्यावर मोठा भाग प्रकाशित करता येईल. आशा आहे आपण या सुचना सकारात्मकरीत्या स्वीकाराल Happy

छान आहे सुरुवात.
वाट पहातेय. पुढच्या भागाची
------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

सुरुवात चांगली आहे. पुढच्या भागाची वाट पहातेय.

दिपाली चांगली सुरुवात आहे. लवकर आणि जरा मोठे भाग टाक.

छान आहे सुरुवात... पुढच्या भागाची वाट पहातेय....

लवकरच लिहिण्याचा प्रयत्न करते पन तरिहि थोडा वेळ द्या तुमच्या सुचनांनचा पालन करण्याचा प्रयत्न करते

मला वाटले पुढची गोष्ट वाचणरयाने पूर्ण करायची आहे.सुरुवात चान्गली वाटली.अजून वाचावेसे वाटते.

खूपच छान सुरूवात....... शुद्धलेखन मात्र हवे...... मजकूर टाकायची घाई कशाला? हवी असल्यास मी मदत करेन.....