सुकट

Submitted by प्रगती जाधव on 2 February, 2013 - 00:04

साहित्यः
१ मुठ्भर सुकट,
२ कान्दे,
२ पाकळ्या लसुन ठेचलेला,
१हिरवी पोफळी मिर्चि,
४-५ पाने कढिपत्ता,
१ मोठा टोमेटो,
अर्धा चमची हळद,
२ चमचे मसाला,
चविनुसार मिठ,
३ पळ्या तेल,
कोथिंबिर.

बनवण्याची पध्द्त:
१)सुकटीची डोकी काढुन घ्यावित.
२)थोड्या कोमट पाण्यात १० मिनिटे टाकुन ठेवावी.नन्तर काढुन ताटात ठेवावि.
३)कढईत तेल गरम करावे,ठेचलेल्या लसनाच्या पाकळ्या, कढिपत्ता,टाकुन घ्यावा.नन्तर कान्दा उभा कापुन, हिरवी पोफळी मिर्चि चौकोनी तुकडे करुन,टाकुन घ्या.कान्दा गुलाबी होईपर्यन्त परता....
४)आता हळद,मसाला टाका.२ मिनिट परता.आता त्यात धुतलेली सुकट टाकवी.चमच्याने हलवावे.किन्चित पाणि घालावे.टोमेटोच्या फोडि व चविनुसार मिठ टाकावे.झाकन देउन ५ मिनिट वाफ काढावी.
५)तुम्हाला हवी तितकी सुकि किन्वा पातळ(यासाठी पाणि जरा जास्त घालावे)ठेउ शकता.वरुन कोथिंबिर पेरावी......पण ही सुकट सुकिच चान्गली लागते. ती पण तान्दळाच्या भाकरी(चुलीवरची-खापरीवरची) बरोबर तर जबराट लागते.
ही आमची आगरी पध्दत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडिशि चिंच(२ मिनिटे पण्यात ठेउन) टाकु शकता.>>>>>>>>>>>. चिंच पाण्यात भिजवुन ती पाण्यात कुस्करुन तिचा पल्प काढायचा...तोच चिंचेचा कोळ Happy