प्रवेशिका - ४२ ( satish.waghmare - जमाव जातो कुठे... )

Submitted by kaaryashaaLaa on 13 October, 2008 - 23:45


जमाव जातो कुठे, पाहुया- सुचले नाही
प्रवाहासवे पुढे जाउया- सुचले नाही

मनाकडे मी कितीकदा कुजबुजलो होतो
तुलाच सारे कधी सांगुया- सुचले नाही

लवाद आणि निवाड्यात मी थकून गेलो
कधी पुरावे तरी मागुया -सुचले नाही

तिचे उखाणे, तिचे वागणे छळून गेले
नवाच कोणी हात शोधुया-सुचले नाही

मला कळेना कुणा बोलुनी हलका होऊ
सुरात हे रडगान गाउया- सुचले नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळेच कवाफी, सुंदर रदीफ, आकर्षक कल्पना, छान गझल!
'तुलाच सारे कधी सांगुया...', 'लवाद', 'तिचे उखाणे', आणि शेवटचे 'सुरात हे रडगान' खूप आवडले.
'तिचे उखाणे' या शेरात मांडलेली 'कमिटमेंट' ची भूमिका खूप आवडून गेली आणि त्या कल्पनेची मांडणीही...
माझ्या मते ८ गुण.
-सतीश

सात माझे. वेगळाच भाव.

सगळ्याच कल्पना छान

८ गुण

"मला कळेना कुणा बोलुनी हलका होऊ
सुरात हे रडगान गाउया- सुचले नाही"
८ गुण...

छान. कुजबुजलो शेर आवडला!!
माझे - ६.

तिचे उखाणे, तिचे वागणे छळून गेले
नवाच कोणी हात शोधुया-सुचले नाही
जीव घेतला.....
माझे ८

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

८ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

चांगली जमलेय. माझे ७ गुण.

मनाकडे मी कितीकदा कुजबुजलो होतो
तुलाच सारे कधी सांगुया- सुचले नाही

आवडला. माझे ६ गुण..

मनाकडे मी कितीकदा कुजबुजलो होतो
तुलाच सारे कधी सांगुया- सुचले नाही

तिचे उखाणे, तिचे वागणे छळून गेले
नवाच कोणी हात शोधुया-सुचले नाही

खुप आवडले.....

८ गुण.

५ गुण
--------------------------------
आली दिवाळी! Happy