गझलेची मुळप्रेरणा. http://www.maayboli.com/node/40513
तुझ्या भुकेमुळे मागे फिरावे लागले आम्हा!
पुन्हा हॉटेलातुनी आत यावे लागले आम्हा!!
खाल्ले तू सर्व ताटातले जरी मागावायच्या आधी,
स्वत:च्या ताटलीसाठी घासावे लागले आम्हा!
निसरडे बेसिन होते हे अम्हीही पाहिले होते....
अशी ती वेळ होती की, भांडे घासावे लागले आम्हा!
नको समजूस की, पटले हॉटेल मालकाला सहजी;
स्वत:चे शेकडो वेळा खिसे चापसावे लागले आम्हा!
जरी टेबलावर तुझ्या आम्ही उगवलो हे खरे आहे,
अगं! दुसर्याचाच ताटात , गिळावे लागलेआम्हा!
बरे झाले, तसे एका परीने इडली आली....
पांढरे कोण अन् काळे कोण, पहावे लागले आम्हा!
समजला हॉटेला मधलाअताशा गारवा आम्हा!
उभे तारुण्य रखरखते घरी गिळावे लागले आम्हा!!
चरू लागले वार्धक्य बिलाचा जाब, हादडण्याचा....
हयातीचे पुन्हा हॉटेल काढावे लागले आम्हा!
जरी या तोंडवटी होते खरे बावनकशी बेंटेक्स;
तरी भावाभावात मोडीच्या फेकावे लागले आम्हा!
कधी खाणार नाही हे शपथपूर्वक म्हणालो पण.....
खाण्याचे पाहुनी अश्रू सांडावे लागले आम्हा!
फुकाचा गंध का येतो कधी मटणास कोणाच्या?
सुगंधी तांबड्यासाठी
मसाला वाटावा लागला आम्हा!
दिसायाला भलीमोठी जरी ही किटली आहे,
विचारा की, कितीवेळा फुर्रकावे लागले आम्हा!
अशी आण देवा! कुणावर वेळ केव्हाही.....
बिलोरी स्वप्न मटणाचे, आमटीवर भागवावे लागले आम्हा!
विशेष सुचना:-रदिफ आणि काफिये फीरायला गेले असल्याने इकडे कदाचित फिरकणार नाहीत ,वृत्ताचे कोणतेच 'वृत्त' हाती न आल्याने ते ही इथे नसावे.
छान
छान
फणस१ | 31 January, 2013 -
फणस१ | 31 January, 2013 - 10:41
छान
>> अरे किमान आयडी बदलाय का ते तरी कम्फर्म करा
वर्षाआज्जे ,तो मीच दिलेला
वर्षाआज्जे ,तो मीच दिलेला प्रति आहे. स्वपाठथोपटणे.
>>> वर्षाआज्जे ,तो मीच दिलेला
>>>
वर्षाआज्जे ,तो मीच दिलेला प्रति आहे. स्वपाठथोपटणे.
<<<<
फणस१,
तरीही वेगवेगळे आयडी वापरून प्रतिसाद दिलेत, तर माबोवर नक्की नाव कमवाल...
जोशी, आपण गझला टाकित जा, इकडे
जोशी, आपण गझला टाकित जा, इकडे तिकडे बघु नका, डायरेक्ट पाचपंचवीस खरडुन टाका.