एकनाथांचा विंचु,खेबुडकरांची इंगळी आणि शैलेद्रांचा बिच्छु

Submitted by नितीनचंद्र on 27 January, 2013 - 07:43

आजच गौरव महाराष्ट्राच्या कार्येक्रमात एका स्त्री कलाकाराने पिंजरा मधल इष्काची इंगळी डसली हे जगदीश खेबुडकर रचीत, राम कदम यांच्या संगीताने नटलेल आणि उषा मंगेशकरांच्या मुळच्या आवाजाताल गाण ऐकत होतो. या गाण्यानेच काय तर व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटानेच त्या काळी वेड लावले होते. या चित्रपटातली सगळी गाणी, संध्या, डॉ श्रीराम लागु आणि निळु फुले यांच्या भुमीका, जगदीश खेबुडकरांची गीते आणि राम कदम यांच संगीत अजरामर झाल.

खास करुन मला इष्काची इंगळी डसली या गाण्याची मध्यवर्ती कल्पना जगदीश खेबुडकरांना संत एकनाथांच्या विंचु चावला या भारुडावरुन तर सुचली नसेल ना ? असा एक प्रश्न मनात रुंजी घालु लागला आणि त्या भारुडाच्या शब्दावर विचार करताना मधुमती या हिंदी चित्रपटातल शैलेंद्र यांनी लिहलेल " चढ गयो पापी बिच्छूआ" हे १९५८ मधे आलेल गाणही आठवल.

संत एकनाथांची भारुडाची परंपरा ही लोकशिक्षणासाठी आहे हे विसरुन चालणार नाही. संत एकनाथांच्या मुळ शब्दांना सादर करताना भारुड परंपरेनुसार बरेच शब्द जोडले गेलेले असणार.

या कलाकृतींच्या निर्मीतीचा क्रम आणि एकनाथी भारुड- विंचु चावला ( साधारण १५ व शतक ) मग मधुमतीमधल चढ गयो पापी बिच्छूआ ( १९५८ ) आणि शेवटी पिंजरा ( बहुदा १९७५ नंतर ) असा दिसला.

या तिनही कलाकृतींनी ऐकणार्‍यांना वेड लावल. आजही हे भारुड असो की ही दोन हिंदी व मराठीतली गाणी लोकप्रिय आहेत.

मला हे म्हणायच नाही की शैलेंद्र किंवा जगदीश खेबुडकरांनी संत एकनाथांची मध्यवर्ती कल्पना घेतली. हा एक योगायोग असावा. मी जाणकारांची मते जाणण्यास उत्सुक आहे.

.
पाहुया भारुड आणि नंतर पिंजरा या गाण्यांचे शब्द . दुर्देवाने आंतरजालावर "चढ गयो पापी बिच्छूआ" हे गाण ऑडिओ स्वरुपात उपलब्ध झाल पण शब्द उपलब्द झाले नाहीत.

-----------------------------------------------------------------------------------------------------

रचना : संत एकनाथ - गायक आणि संगीतकार - शाहीर साबळे

http://www.youtube.com/watch?v=PaH0HFwZ-RU

विंचू चावला
सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार

अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
अग बया, बया ..... विंचू चावला

अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?

काम, क्रोध विंचू चावला
तम घाम अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला

मनुष्य इंगळी अति दारुण
((हा, हा, म्हणजे अति 'दारू' नं)
दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही.
दारूण म्हणजे भयंकर.
(भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का ?)
अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
(अति भयंकर म्हणजे ?)
खूप भयंकर.
(अन्‌ खूप भयंकर म्हणजे ?)
मायंदाळ भयंकर.
(अन्‌ मायंदाळ भयंकर म्हणजे ?)
तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
(बापरे !))

मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं .....

((तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.
गंगीचा इथे काय संबंध ?
(मग त्या रंगीनं.)
कुणाचाही संबंध नाही.)

तिनं म्हणजे त्या इंगळीनं
(महाराज इंगळी म्हणजे ?) ..... मोठा विंचू !
(अंदाजे केवढा ?) ..... तुझ्याएवढा !

मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं
सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची

या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा
(तंबाखु खाणं मागे सारा)
नाही, नाही, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा

तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.

सत्वगुण लावा अंगारा, अन्‌ विंचू इंगळी उतरे झरझरा

सत्य उतारा येऊन (आला का ?)
अवघा सारिला तमोगुण
किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने

पुंडलीक वरदा (हरी विठ्ठल)
श्री ज्ञानदेव (तुकाराम)
पंढरीनाथ महाराज की जय

-----------------------------------------------------------------------------------------------------

चढ गयो पापी बिच्छूआ - चित्रपट मधुमती१९५८ , गीत शैलेंद्र, संगीत - सलील चौधरी
गायीका - लता मंगेशकर, मन्ना डे

http://www.raaga.com/player4/?id=25000&mode=100&rand=0.6547084770804644

-------------------------------------------------------------------------------------------------------


चित्रपट : पिंजरा - गीत : जगदीश खेबुडकर , संगीत : राम कदम , गायीका : उषा मंगेशकर

http://www.youtube.com/watch?v=LEFhcOyxnVg

मी एकलीच निजले, रातीच्या अंधारात
नको तिथंच पडला, अवचित माझा हात
हाताखालती नांगा काढुन, वैरिण ती बसली
ग बाई मला, इष्काचि इंगळी डसली
बाई ग, बाई ग

मारलि किंकाळी कळ ल‍इ आली
उरि घामानं भिजली चोळी
अंगाअंगाची काहिली झाली
सांगा ही कळ कसली

साऱ्या घरात फिरले बाई ग
मला औशिद गावलं न्हाई ग
तंवर कुणाची चाहूल आली
खूण खुणेला पटली

ह्या इंगळीचा कळला इंगा
खुळ्यावानि मी घातला पिंगा
मंतर घाला हलका हलका
नार चुकुन फसली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या बिछुआदेखील.....

चढ गयो पापी बिच्छूआ -
चित्रपट : मधुमती (१९५८ )
गीत शैलेंद्र, संगीत - सलील चौधरी
गायीका - लता मंगेशकर, मन्ना डे

ल : ओ बिछुआ..हाय रे
पीपल छैंया, बैठी पल भर...., हो
धर के गगरिया.., हाय रे
को : हाय रे -३

ल : होय ओय ओय ओय ओय
ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ
को : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ
ल : ओ हाय-हाय रे मर गई
कोई उतारो बिछुआ
को : ओ हाय-हाय रे मर गई
कोई उतारो बिछुआ
ल : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ
को : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ

को : कैसो रे पापी बिछुआ बिछुआ -२
ल : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ
को : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ

म : हो हो ओ, मन्तर फेरूँ हूँ
कोमल काया ओ
छोड़ के जा रे..., छू
को : जा रे -३

ल : होय ओय ओय ओय ओय
ओ और भी चढ़ गयो
ना गयो पापी बिछुआ
को : ओ और भी चढ़ गयो
ना गयो पापी बिछुआ
ल : कैसी आग लगा गयो पापी बिछुआ
को : ओ कैसी आग लगा गयो पापी बिछुआ
ल : सारे बदन पे छा गयो पापी बिछुआ
को : सारे बदन पे छा गयो पापी बिछुआ

को : कैसो रे पापी बिछुआ बिछुआ -२
ल : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ
को : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ

ल : ओ .., हाय रे
मन्तर झूठा.., ह बैद भी झूठा..., हो....
पिया घर आ रे.., आ रे
को : आ रे -३

ल : ओय ओय ओय ओय
देखो रे देखो रे
देखो उतर गयो बिछुआ
को : ओ देखो रे देखो रे
देखो उतर गयो बिछुआ
म : हे टूट के रह गयो
डन्क उतर गयो बिछुआ
को : ओ टूट के रह गयो
डन्क उतर गयो बिछुआ
ल : सैंया को देख के
जाने किधर गयो बिछुआ
को : ओ सैंया को देख के
जाने किधर गयो बिछुआ

को : कैसो रे पापी बिछुआ बिछुआ -२
ल : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ
को : ओ दैया रे दैया रे
चढ़ गयो पापी बिछुआ
ल : ओ हाय-हाय रे मर गई
कोई उतारो बिछुआ
को : ओ हाय-हाय रे मर गई
कोई उतारो बिछुआ

विंचु हे कामाचे प्रतीक तर पूर्वापार आपल्याकडे मानले गेलेय. विंचवाला प्रत्यक्ष संग शक्य नसतो त्यामूळे तो कायम त्या बाबतीत अतृप्त असतो, असा समज. लोकसाहित्यात हे प्रतीक अनेकवेळा येते. त्यामूळे गाण्यात येणे साहजिकच.

नि३, संत एकनाथांच्या विंचू चा त्या बिच्छू आणि इंगळीशी काहीच संबंध नाही. विंचू अवगुणांचा प्रतिक आहे तर बिच्छू आणि इंगळी भावनेशी निगडीत आहे, ज्यात गुण अवगुण सगळे चुलीत घातले जातात. पण एकंदर आढावा छान. Happy

आ व डलं. अशीच साम्य स्थळे एकदा मराठी आणि हिंदसिनेमागितांमह्धे आणि ती गीते यावर पिटारा मधे चर्चा झाली होती. मजा आली.
यावरुन एक आठव्लं जरा संदर्भ वेगळा असला तरी मोह आवरत नाही म्हणुन.. ह्र्दयनाथांनी एक बंगाली लोक गीत मराठीत केले चाल तीच शब्द मराठी ... कान्हू मोहुन जाय असे काही तरी शब्द आता आठव्त नाही पण उषाताईनी गायलेय फार छान आहेत शब्द आणि चाल पण...
तसेच एस्डी बर्मन्दा नी पण एक पहाडी धुन हिंदी गीताला दिलीय शब्द हिंदी आणि आशय पहाडी लोकगीतातील तसाच ठेवलाय. ही पण आठव्ण खुद्द आर्डी ने पिटारात सांगितलीय...
असो
लेखन आवडले ! बर्याच दिवसांनी मायबोलीवर आगमन तुमचे आणि माझे ! असो.

हम्म.
असा विचार केला नव्हता पण एकनाथांच भारुड हे षडरिपुनी कसं जखडलय हे दाखवतो तर इश्काची इंगळी हे श्रुंगारीक अर्थाने आलेलं गाणं आहे.
वर दिनेशदानी लिहिलय तसं असु शकतं.
माझा काही अभ्यास वै नसल्याने इथली मतं वाचण्यास उत्सुक आहे. Happy

संत एकनाथांचं भारूड ही भक्तीरसातली इंगळी आहे- त्याचे शब्द वाचले तर उमगेल. काम, क्रोधापासून मुक्ती मिळवण्यासाठी, ह्या षडरिपूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी, ते कसे वाईट आहेत आणि ते सोडून देण्यातच कसे भले आहे त्याचा प्रचार लोकांपर्यंत होण्यासाठी रचलेलं भारूड.

इश्काची इंगळी डसली- ही प्रॉपर शृंगारिक लावणी आहे. त्यात अध्यात्म (दिसलं) नाही (मला) Happy

पापी बिछुआ- लोकगीत आहे.
सैंया को देख के
जाने किधर गयो बिछुआ
को : ओ सैंया को देख के
जाने किधर गयो बिछुआ>> हा 'सैंया' म्हणजे कधीकधी देवाला उद्देशूनही असते. त्यामुळे हे अध्यात्मिक संदेश देणारे गाणे असू शकेल, पण चित्रिकरण तसे नाही Happy

नितीन...

जगदीश खेबुडकर ही मूळचे भावकवी [भक्तीगीतेही लिहित]. आमच्या कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये ते मराठी विषय शिकवित. शीघ्र कवी म्हणूनही त्यानी आपल्या मित्रपरिवारात लौकिक मिळविला होता. चित्रपट गीतकार या नात्याने त्यांची ओळख सार्‍या महाराष्ट्रभर झाली त्या 'रंगल्या रात्री अशा' या चित्रपटातील 'नाव गाव कशाला पुसता...अहो मी आहे कोल्हापुरची' ह्या ठसकेबाज लावणीने... आणि मग त्यांच्या घरी मराठी चित्रपट संगीतकारांचा नित्यनेमाने राबता सुरू झाला. जयप्रभा स्टुडिओ [भालजींचा] आणि शालिनी स्टुडिओ [शांतारामबापू यांचा] ह्यांच्या ठिकाणापासून बरोबर मध्यवर्ती ठिकाणी खेबुडकरांचे घर {'बेलबाग' एरिया} असल्याने संध्याकाळी हायस्कूल सुटले की जयप्रभा स्टुडिओच्या कट्ट्यावर अगदी अलकट्पलकट मांड्या ठोकून गप्पांचा जो डाव पडे, त्या मध्ये आघाडीवर खेबुडकर, कॅमेरामन वसंत शिंदे [अभिनेते वसंत शिंदे नव्हेत], आणि संगीतकार राम कदम असत. खेबुडकरांचे मराठी भाषेवर प्रेम असल्याने साहजिकच एकनाथी भारुडेच काय पण मोरोपंतांच्या केकावलीतील पंक्तीही ते गप्पाच्या ओघात वानगीदाखल देत असत.

सांगायचा मुद्दा हा की, जरी 'इश्काच्या इंगळी' ची गंगोत्री एकनाथाच्या विंचवात लपली असली तरी त्यामुळे खेबुडकरांच्या गाण्याची महती तसुभरही कमी होऊ शकत नाही इतके ते अस्सल आणि जातिवंत आहे. त्यातही 'पिंजरा' ही शांतारामबापूंची निर्मिती होती आणि आपल्या चित्रपटातील गाण्यांच्या रचना तसेच संगीताबद्दल ते विशेष जागरूक असत. एकट्या पिंजरासाठी खेबुडकरांनी आठदहा नव्हे तर चक्क ११० दहा गाणी लिहून बापूंना दिली होती त्यातील अकरांना चित्रपटात स्थान मिळाले. म्हणजेच 'इंगळी' च्या वेळेस त्या सर्वांची शब्दांबद्दल योग्य ती चर्चा होऊन त्यास एकनाथी भारुडाची संगत लावली जात नसल्याची खात्री बापू आणि कदम यानी केलीच असणार.

भारुडांची रचना ही 'लोकशिक्षण....समाजप्रबोधन' आदी कारणासाठी असल्याने समाजातील ढोंगीपणाला 'विंचवाची शॉक ट्रीटमेन्ट' देणे गरजेचे होते [ते काम अनेक शाहिरांनी केल्याचे दाखले आहेतच...], तर खेबुडकरांची इंगळी तसेच शैलेन्द्र यांचा बिछवा हे प्रीतीचे, इश्कबाजीचे प्रतीक असल्याने त्या त्या रचनेकडे वेगवेगळा चष्मा लावून पाहिल्यासच तिन्ही गाण्यांचे श्रवण आनंददायी होऊ शकते.

अशोक पाटील

एकनाथ महाराजांचे मुळ शब्द आहे

काम, क्रोध विंचू चावला
तम घाम अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला

यातला काम या शब्दाला असलेला प्रतिशब्द इष्क ( असे मला वाटते ). यावर मतभेद असु शकतील.

खेबुडकरांनी आणि शैलेंद्र यांनी एकनाथांच्या मध्यवर्ती कल्पनेची कॉपी केली अस नाही पण या दोन्ही काव्य रचनेच जुन्या भारुडाशी साम्य वाटल म्हणुन हा लेख चर्चे साठी लिहला आहे.

एकनाथांनी भारुडाची रचनाच लोक शिक्षणासाठी केलेली आहे. अध्यात्म हा भारुडाचा गाभा नाही. ( असे माझे मत आहे ) सामान्य लोकांना सतावणार्‍या गोष्टी ( काम आणि क्रोध ) आणि त्यावर सत्वगुणाचा लावा अंगारा म्हणजे सत्व गुण अंगिकारा हा उपदेश आहे.

खेबुडकरांना ही लावणी श्रुंगाररसा साठी लिहायची असल्याने त्यात उपदेश नव्हता किंवा अपेक्षीत ही नाही पण विंचवाचा दंश हा कामेच्छा स्वरुप या अर्थाने आला आहे.

शैलेंद्र यांना अपेक्षित हिंदी गीतात कामा पेक्षा ही विरह हा भाव मोठा आहे पण तो व्यक्त करताना सुध्दा विंचवाचा दंश हे साम्य दिसत.

"...यातला काम या शब्दाला असलेला प्रतिशब्द इष्क ( असे मला वाटते )....."

.... हा समज ताबडतोब तुमच्या मनातून काढून टाका नितीन. संतांनी 'काम' चे योजन मनुष्यप्राण्यातील प्रणय दाखविण्यासाठी केलेले नसून त्याचा तो करीत असलेला अतिरेकीपणा आणि त्यासमवेत मग त्याच्यात उदभवणारे 'तमोगुण' दर्शविण्यासाठी केले आहे. त्या उलट 'इष्क' ही एक सहजप्रवृत्ती असून ती नरमादी या दोन्ही घटकाना हवीहवीशी वाटणारी बाब आहे.

'काम' मध्ये हिंस्त्रपणा आहे तर इष्क मध्ये हळुवारपणा आहे.... हे कवीनींनी दाखविले आहे.

अशोक पाटील

हा समज ताबडतोब तुमच्या मनातून काढून टाका नितीन. संतांनी 'काम' चे योजन मनुष्यप्राण्यातील प्रणय दाखविण्यासाठी दाखविला नसून त्याचा तो करीत असलेला अतिरेकीपणा आणि त्यासमवेत मग त्याच्यात उदभवणारे 'तमोगुण' दर्शविण्यासाठी केले आहे. >> अनुमोदन.

हा समज ताबडतोब तुमच्या मनातून काढून टाका नितीन. संतांनी 'काम' चे योजन मनुष्यप्राण्यातील प्रणय दाखविण्यासाठी दाखविला नसून त्याचा तो करीत असलेला अतिरेकीपणा आणि त्यासमवेत मग त्याच्यात उदभवणारे 'तमोगुण' दर्शविण्यासाठी केले आहे. >> अनुमोदन.

माझे सुध्दा अनुमोदन .

मस्त चर्चा चाललीये. आता काकाश्रींसारखे अनुभवी भिडू मैदानात उतरलेले असल्याने आपण झाडावर बसून मजा घेतलेली बरी Happy

पण एकंदर आढावा छान. >> ३ गाणी म्हणजे आढावा ठरत नाही. "सारे बदन मे जहर चढ गया, बिच्छू लड गया", "येह बिच्छू मुझे काट खायेगा" आणि अजून अशी थोडीफार गाणी असतील तर तो आढावा ठरतो.

वरील तिन्ही गाण्यात विंचू/इंगळी/बिच्छू ला बदनाम केल ... हमको आजकल हे इंतजार मध्ये माधुरी जशी झटकली आहे तिथे न सांगता ही संशय विंचू किंवा इंगळी वरच जातो, इतक ह्या तीन गाण्यांनी बदनाम केलाय विन्चुला. Happy

विंचवा बद्दल लिहिणाऱ्या सर्वांनी तात्या विंचू चे स्मरण करून मगच दिनक्रमास लागावे, नाहीतर दिवसभर 'विंचू चावला' ह्या गाण्यांऐवजी 'जुही चावला' ची गाणी आठवण्याचा शाप मिळेल.

बाकी लेख म्हणजे एक संस्कृत मधली 'बादरायण' ची गोष्ट आठवली.