योगासनं शिकण्याविषयी

Submitted by नताशा on 22 January, 2013 - 10:35

शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासनं शिकण्यासाठी कुठली पुस्तकं योग्य आहेत? किंवा डिवीडी वगैरे?
डिवीडी असेल तर बरं कारण पुस्तका पाहून पाहून करणं कठीण पडतं.
मला तरी नीट योगासनं शिकवणारे क्लासेस घराजवळ सापडले नाहीत. बिक्रम योगा, भरत ठाकुर वगैरे नकोय.. पॉवर योगा अजिबात नकोय. एनी सजेशन्स?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या इथे अमेरिकेत योगाच एवढ व्यापारीकरण झालेल आहे की विचारू नका.>> इंडिया त्याच लाइनीत आहे. खरं योग काय २-३ महिने शिकून दुसर्‍याला शिकवण्यासारखी गोष्ट आहे का? खरंच किती अनसेफ. पण (किमान मला भेटलेले तरी) सगळे ट्रेनर्स तसेच. जे खरंच अनुभवी असतील ते या बाकी मोठ्या नावांइतकं मार्केटिंग करु शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला शोधूनही सापडत नाहीत.

पॉवर योगा हा शब्द्च मला oxymoron वाटतो. >> कल्पु +
शुम्पी, तुझ्या पोस्टस वाचते आहे. तू लिहीलेले वाचून पावर योगाबाबत पुनर्विचार करते आहे, तरीपण मलाही कल्पुसारखे ते ऑक्सीमोरॉनच वाटते.

शूंपी,

मी कोथरुडमधे रहाते. तुम्ही वर उल्लेखलेल्या कोथरुडमधील योगासनांच्या क्लासची माहिती देउ शकाल का?

अदिती, कर्वे पुतळ्या ज्या जुस्ट आधी डावीकडे वळलं की तिकडे एक कसलंतरी देउळ आहे. त्याच्यापुढच्या गल्लीत डावीकडे वळलीस की मी म्हणते तो योगाचा क्लास आहे. तिथे थोडी चौकशी कर, त्या एरियामध्ये प्रसिद्ध आहे. अभय जावखेडकर हे त्या सरांचं नाव. त्यांचे आई-वडील सुद्धा कित्येक वर्षे योगासने शिकवतात.
ऑल द बेस्ट!

हं...........शूम्पी मी विचारणारच होते की अभय जवखेडकर का? ते बेस्ट आहेत. तीघेही!
रामदेव बाबांची सीडीही छान आहे.

कोणी बिबवेवाडीला योगा क्लास शोधत असाल तर ,.....स्वाती कुलकर्णी ---- ९४२२००४६१६ वर सम्प्र्क साधा......एक्दम बेस्ट आहे ....

निकम गुरुजींच्या अंबिका योग कुटिरविषयी कोणालाच माहिती नाही?
नो-नॉनसेन्स प्युअर योग! ३ महिन्यांचा दर रविवारी क्लास असतो. अगदी शिस्तबद्ध योग शिकवतात. (शरीर शुद्धीकर्म (षट्कर्म), प्राथमिक प्राणायाम आणि आसनं!
http://www.ambikayogkutir.org/

अनेक ठिकाणी शाखा आहेत.

शूम्पी: विपूत मेसेज पाठवला आहे. कृ. उत्तर देशील का? इच्छा नसेल तर तस कळवल तरी चालेल. धन्यवाद.
माझ्या मैत्रिणिला अय्यंगार इन्स्टिट्यूट मधे आलेला अनुभव. ती स्वतः योगा-टिचर आहे आणि गेली ४ वर्ष शिकवत आहे. कुठल्या तरी दहा दिवसांच्या कार्यशाळेत तीने नाव घातल. तिच्या बरोबर दोन अमेरिकन मैत्रिणी होत्या पण टीचर्स त्यांच्याकडेच् जास्त लक्ष पुरवत होते. हे खर असेल का? इतक्या नामांकीत आणि जेन्यूइन संस्थेत अस होउ शकत का?

कल्पु, विपू पहा Happy

इतक्या नामांकीत आणि जेन्यूइन संस्थेत अस होउ शकत का?>> मी स्वतः रमामणी अय्यंगार संस्थेत जाउन शिकलेले नाही , अभयकडेच शिकले. म्हणुनच चांगले शिक्षक भेटणं / गाठणं महत्वाचं.
जे शिक्षक आपले प्रश्न / शंका कितीही फालतू वाटले तरी न टाळता/गुंडाळता समाधानकारक उत्तरं देतात आणि माहित नसल्यास तसं कबूल करून स्वतःला माहित न्सलेली उत्तरं शोधून आपलं आणी स्वतःच देखिल शंकानिरसन करतात त्यांना उत्तम शिक्षक म्हणावं Happy

@शूम्पी: थँक्यू ग, एवढ सविस्तर आणि छान उत्तर दिल्याबद्दल. लिंडा-समाला पाहून घेते (चेक आउट करते).

अरे..आता हे सगळं वाचुन मला टेन्शन येतयं..
उसगावात असताना मस्त जिम केली होती मग परतल्यावर सगळं बंद नको म्हणुन योगा चालु केला.. पण ऑफिसमध्ला ट्रेनर रोज तेच एका सुरात नि तालात घ्यायच.. आला की लगेच १ २ ३ सुरु करायचा..
मग सरळ आयफोनवर अ‍ॅप डाउन्लोड करुन सध्या घरी करते आहे मी.. कधी कधी मिस होतयं.. काय करु? कंटिन्यु की नीट शिकुन घेवु?

कबीरबागचा अनुभव नाही का कुणाला? मी ज्या काकूंकडून शिकले त्या कबीरबागेतून पोस्टग्रॅड लेवलचं शिकल्या आहेत. फार सुरेख शिकवतात त्या. त्यांच्या मते, अगोदर थोडं स्ट्रेचिंग, मग मुद्रा, योगासनं आणि शेवटी प्राणायाम असा क्रम असावा शिकवायचा. त्या सोम. ते शनि असा क्लास ३ महिने घेतात, एक बेसिक कोर्स होतो. हे रत्नागिरीचं आहे, पण त्या पुण्यातच शिकल्या आहेत.
अगोदर अंग वळून, लवचिकता येऊन, प्राणायामासाठी बैठक तयार व्हावी लागते. मला ते अनुभवाने पटलं. अर्थात हे वैम. अनेक प्रकारे योगा शिकता येतं.
पण बेसिकसाठी प्रत्यक्ष अनुभवी माणसाकडून शिकायला हवं.

मैत्रिणिंनी सौरभ बोथराच्या योगा क्लासचे( Habuild ) खूप कौतुक केले आहे. ऑनलाईनच आहे, आधी २ आठवडे फुकट नंतर पेड मेम्बरशिप. मी फ्री सुरू केले आहे, तीन दिवस झाले, ४५ मिनिटे आहे क्लास. तो छान सांगतो अगदी. एकच आहे, माझे पाय खूप दुखताहेत, काय चुकत असेल माझं ?
मी याच्या आधी योगा केला त्याला कित्येक वर्षे झालीत. रोज थोडे light walking करायची तेव्हढेच.

माझे पाय खूप दुखताहेत>> कदाचित सवय राहिली नसल्याने स्नायूंना सुरवातीपासुन जास्त व्यायाम/ताण/स्ट्रेचिंग होत असेल का? प्रत्येक असनाची/व्यायामाची वेळ, इंटेन्सिटी कमी करून हळुहळु वाढवत नेऊन बघा.

हो पाणी भरपूर पिते मी.

मानव, तुम्ही म्हणता तसेच असेल. आज ब्रेक घेतला होता, उद्या हळू हळू पुन्हा सुरु करीन. कमी प्रमाणात.

मापृ इज राइट!

@स्नेहा१ , मी गेल्या जुलै मधेच हा क्लास जॉईन केलाय. त्या आधी जूनमधे मी त्याचे १४ दिवसांचे फ्री योगा सेशन केले होते आणि ते बर्‍यापैकी लाईट होते. त्यामुळे कदाचित नंतर तेवढा त्रास झाला नसावा. पाय दुखत असतील तर सगळे प्रकार एकदम करू नकोस. मुख्य म्हणजे सौरभ स्वतःच सांगतो की तुम्हाला जेवढं करता येतंय तेवढंच करा. त्यामुळे तसंच कर आणि गिल्ट घेऊ नकोस. शिवाय तो प्रत्येक प्रकाराचं इझी व्हर्जन दाखवतो ते करता येतंय का पहा. कदाचित त्याने तुला त्रास होणार नाही.
हळुहळू शरीराला सवय झाली की पाय नाही दुखणार. तरीही दुखत आहेत असं वाटलं तर त्यांच्या सपोर्ट टीमला मेसेज पाठव तसा. ते नक्की मदत करतील काहीतरी.

रमड, चूक माझीच झाली आहे. एक तर सध्या खूप व्यायाम चालू नाही,दिवसातून दोनतीनदा १५-२० मिनिटे चालणेच फक्त. म्हणजे ४५ मिनिटांची सवय नाही. त्यात सुरू केले त्याच्या आदल्या दिवशी नवीन बूट घालून चालल्यामुळे आधीच पाय दुखत होते , तरीही उगीच ३ दिवस करत राहिली.
आता ब्रेक घेते, ठीक वाटले की हळूहळू, जमेल तितके आणि एका दिवसाआड असे करून बघीन.
तुझा अनुभव कसा आहे पेड मेम्बरशिपचा? ज्यांनी मला सांगितले त्यांना फार आवडला आहे.

जमेल तितके आणि एका दिवसाआड असे करून बघीन >>> गुड प्लॅन!

माझा पेड मेम्बरशिपचा अनुभव चांगला आहे. मी क्लास सुरू केला तेव्हा जाणवलं की शरीराची लवचिकता खूप कमी झाली आहे. पण सुमारे सहा महिन्यांत ती बरीच वाढलेली जाणवली. अजूनही कधीकधी त्याने खूप जास्त स्ट्रेचिंग घेतलं तर त्या वेळापुरते हात / पाय दुखायला लागतात पण ते फार काळ टिकत नाही. मला अजूनही बर्पीज चांगल्या जमत नाहीत म्हणून मी सौरभ करतो ते सोपं व्हर्जन करते. जमेल तेवढं, जमेल तसं पण काहीतरी करत रहायचं हाच मंत्र आहे आणि तो उपयोगी पडतो. मुळात त्याच्या क्लासचं उद्दिष्ट व्यायामापेक्षाही रोजच्या व्यायामाची सवय लागणे हे आहे आणि ती सवय महिन्या - दोन महिन्यांतच लागली. आता एखादा दिवस जरी क्लास मिस झाला तर चुटपुट लागते. हा क्लास सुरू केल्यापासून दिवसाची सुरूवातच एकदम उत्साहाने होते आणि त्यामुळे सगळा दिवस छान जातो.

त्यासोबतच त्यांचे बरेच वर्कशॉप्स असतात. मी सगळे केले नाहीत. पण मुद्रा वर्कशॉप, जर्नलिंग वर्कशॉप केले ज्याचा मला उपयोग झाला. याव्यतिरिक्त त्यांचे डिटॉक्स वर्कशॉप्स असतात, फेस योगा वर्कशॉप असतो अधूनमधून किंवा जॉईंट पेन / थायरॉईड अश्या गोष्टींसाठी पण वर्कशॉप्स घेतले जातात. हे वर्कशॉप घ्यायला ते एखाद्या तज्ञाला बोलावतात.

मला सगळ्यात आवडतं ते गाईडेड मेडिटेशन जे तो दर शुक्रवारी सेशन दरम्यान घेतो. छान वाटतं.

थॅन्क्स गं ! चांगली माहिती दिलिस. पहिल्या दिवशी मला पण पाय दुखत असले तरी छान वाटले. शिवाय केल्यावर मूड पण चांगला झाला Happy
मी करीन आता जमेल तसे.

मीपण करते सौरभ बोथ्राचे क्लासेस. सप्टेंबरमध्ये जॉईन झाल्यापासून एकही बुडवला नाही. फक्त रविवारची सुट्टी.

Pages