क्वांग चौ हून केवळ १४० किमी वर असलेल्या ' शेंझेन' शहरात जवळ जवळ ११८ एकर जमीनीवर , विभिन्न देशांतील प्रसिद्ध, निरनिराळ्या १३० पर्यटन स्थळांच्या लहान प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत. या कलाकृती इतक्या सुंदर आहेत कि चीन मधील काही प्रमुख पर्यटन स्थळांमधे या विंडो चा नंबर बराच वरचा आहे.
प्रवेश फी १८०० रुपये वयस्कांकरता तर १२०० रुपये बालकांकरता अशी घसघशीत आकारण्यात येते.
आत शिरल्यावर पायी चालायचे नसल्यास मोनो रेल, बालोद्यानात असते तशी झुकझुक गाडी, स्वतःच चालवता येण्याजोगे स्कूटर्स उपलब्ध आहेत, अर्थातच या साधनांचा उपयोग करायचा असल्यास वेगळं भाडं भरावं लागतं.
आत शिरल्यावर ठिकठिकाणी स्टँड्स वर टूरिस्ट्स करता मोफत नकाशे ठेवलेले आहेत. त्यांशिवाय हा सर्व प्रवास कठीणच.
इथे प्रामुख्याने युरोप, आशिया,ओशेनिया, आफ्रिका आणी अमेरिका या रीजन्स मधील पर्यटक स्थळांचा सामावेश केलाय. इतर रीजन्स मधील उत्तर अमेरिकेतील ब्राझील आणी दक्षिण अमेरिकेतील चिले, मेक्सिको, पेरू इ. देशांतील काही उल्लेखनीय स्ट्रक्चर्स ही पाहायला मिळतात. याशिवाय युरोपिअन शॉपिन्ग स्ट्रीत, एशिअन स्ट्रीत, युरोपातील चर्चेस , जगभरातील प्रसिद्ध शिल्पं, पुतळे इ.ही अमाप संख्येत विखुरलेले आहेत..
चला तर आता ,'विंडो ऑफ द वर्ल्ड' मधे झटपट डोकवायला..
हे पाहा प्रवेशद्वार
आत चला..अर्रे हे काय..
तिकिटं काढायपूर्वी बाहेरच्याच परिसराचे फोटू काढण्यात गुंतायला होतं
हां चला.. आता नकाशे हातात घेऊन..
आत शिरल्याशिरल्या पहिलंच स्ट्रक्चर पाहिलं आणी बरं बरं वाटलं..
एमरल्ड बुद्धा टेंपल- थायलँड
ग्रँड पॅलेस- थायलँड
श्वेतागोन पगोडा- बर्मा
मशीद प्रांगणातील अरेबियन चौक
या मॉन्युमेंट चं नांव मिस झालंय..
ताजमहल..
चायनीज अनारकली कि नूरजहाँ, हौसेने हे भाड्यावर मिळणारे कपडे घालून फोटो काढून हेत होती
स्टेपविहीर- मोधेरे- भारत
ईजिप्त चे पिरॅमिड
लगेच तिथे या दोन हंप वाल्या उंटावर बसून एक जेमतेम तिथल्यातिथेच चार पावलं फिरून यायची सोय केलेली होती. ३०० रुपये एका मिनिटाला या हिशोबाने हौस भागवून घेत असलेली मंडळी..
वेलकम टू अमेरिका
न्यूयॉर्क न्यूयॉर्क
नायगारा
जागोजागी रस्त्याच्या कडेने असलेल्या वाहत्या कनाल्स मधे खादाड मासे सोडलेले आहेत.. तिथेच त्यांच्यासाठी ब्रेड,काहीबाही धान्य विकायला असतं. ते टाकलं की शेकड्यांनी हे मासे धावून येत होते
अर्र आता तर त्यांचा कुंभ मेळा चाललायशी गर्दी झाली..
अतिशय देखणे मासे होते.. (हळूच जागू ची आठवण आली )
आयफिल टॉवर- इथे वरपर्यन्त जाण्याची लिफ्ट द्वारे सोय केलेली आहे.
वेस्टमिन्स्टर पॅलेस्/पार्लमेंट
युरोपभर फिरवून आणणारी छोटुशी झुकझुकगाडी
अजूनही बरेच फोटो काढलेत पण इथे थोडे टाकलेत , या जागेचा फील येण्यापुरते
युरोप भागातील बर्फ नगरी.. इथे स्कीईंग ची सोय आहे, बर्फांच्या घरातून हिंडता येतं. भाड्याने -० टेंपरेचर ला लागणारे जॅकेट्स, बूट्स उपलब्ध आहेत
व्हॉट अ ट्रीट,,,.... ऑसम
व्हॉट अ ट्रीट,,,.... ऑसम फोटो....
चायनीज नूरजहाँ की अनारकली..![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मासे आणि जागूची आठवण..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त प्रचि.
थांकु डॉक.
थांकु डॉक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! इंटरेस्टींग जागा
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंटरेस्टींग जागा वाटत्ये..
छानच! चायनीज अनारकली ही ही
छानच! चायनीज अनारकली ही ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहमीप्रमाणेच सुंदर परिचय.
नेहमीप्रमाणेच सुंदर परिचय. आवडला.
ते मासे तर बेहद्द आवडले!!
वा अफलातूनच आहे सर्व....
वा अफलातूनच आहे सर्व....
पराग्,कुलु,नरेंद्र काका,जिवेश
पराग्,कुलु,नरेंद्र काका,जिवेश ..धन्स..
चीनी लोकं स्वतः चिटुकले असले तरी त्यांना लहानसहान काही आवडत नसावं. त्यांच्या इमारती, बागा, थीम पार्क्स .. सर्व काही भव्य आणी स्वच्छ!!!
छान फोटोज वर्षु , मस्तच आहे
छान फोटोज वर्षु , मस्तच आहे विंडो ऑफ द वर्ल्ड, आम्ही २००६ साली गेलो होतो तिथे , खुप छान मेंटेन केलयं.
श्री.. मग तुम्ही बाजूचा '
श्री.. मग तुम्ही बाजूचा ' स्प्लेंडिड चायना' हा पार्क ही पाहिला असेल ना??
आता इंटरलाकेन म्हणून नवीन अॅडिशन केलीये या पार्कजवळच.. स्विस इन्स्पायर्ड थीम पार्क
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाही हो स्प्लेंडिड चायना नाही
नाही हो स्प्लेंडिड चायना नाही पाहिलेलं. नवीन झालयं का ?
मस्त आहेत सगळे फोटू....आणि
मस्त आहेत सगळे फोटू....आणि अनारकली तर सगळ्यात छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळेच फोटो मस्त...आणि जागाही
सगळेच फोटो मस्त...आणि जागाही interesting आहे.
वा वर्षुदी, काय काय आहे
वा वर्षुदी, काय काय आहे तुमच्या चीन मधे !! तू पण अगदी आवर्जून इथे देत असतेस....
लै भारीए हे सर्व......
वर्षु फोटो मस्त. मासे यक्क
वर्षु फोटो मस्त.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मासे यक्क
मस्त फोटो आनि मस्त माहीती
मस्त फोटो आनि मस्त माहीती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे सगळेच फोटो युरोप
मस्त आहे सगळेच फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
युरोप खासच
सही! अगदिच miniature नाहीये.
सही! अगदिच miniature नाहीये.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम आहे हे
अप्रतिम आहे हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.
मस्त.
जबरदस्तच अनेक अनेक धन्यवाद हे
जबरदस्तच
अनेक अनेक धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल
धन्यवाद
सही आहे हे !
सही आहे हे !
मस्त फोटो. चायना लवकरच
मस्त फोटो.:)
चायना लवकरच पर्यटनात सर्वाना मागे टाकेल अशी चिन्हं आहेत.
मस्तच! सगळीकडे किती स्वच्छता
मस्तच!
सगळीकडे किती स्वच्छता आहे!!
झक्कास वर्ड टूर वर्षूतै.
झक्कास वर्ड टूर वर्षूतै.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे व्वा, सही आहे हे. चायनीज
अरे व्वा, सही आहे हे.
चायनीज अनारकली कसली इष्टाइल मध्ये बसलीये...
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
हे छान ना ! आता जगभर
हे छान ना ! आता जगभर फिरण्याऐवजी वर्षू कडे गेले, कि झाले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. विंडो ऑफ द वर्ल्ड,
मस्त. विंडो ऑफ द वर्ल्ड, त्याचे फोटो आणि त्यावरच्या वर्षूच्या comments!!!
Pages