Submitted by बागेश्री on 17 January, 2013 - 08:41
एखाद्या भावनेने उच्चांक गाठला,
की मेंदूवरची पकड सुटण्याचीच भिती जास्त!
ते क्षणच मोहक.
कधी आनंदाचे, कधी निराशेचे..
कधी हा मोह इतका लोभसवाणा की,
सारासार विचारांना तेव्हा सरळ बाजूला सारून आनंदाने त्यापुढे शरण जावं..
तर कधी,
काळवंडलेली उदासीनता व्यापून उरते...
तिचा गडदपणा घेरून टाकतो,
अशा वेळी त्यातून बाहेर पडण्याची उसनी धडपडही न करण्याचा मोह!!
मात्र हा 'मोह' आपल्यापासून वेगळा होताना काहीतरी घेऊन जातो... काहीतरी खूप जपलेलं!
मग वाटतं,
असे मोहाचे क्षण टोलवता आले पाहीजेत..
म्हणजे त्यांचा आपल्याला स्पर्श तर होईल
पण परिणाम नाही....!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बागेश्रीची परत एकदा मनाच्या
बागेश्रीची परत एकदा मनाच्या अंतरंगात खोल उडी
छानच
सचिन
सचिन
वा! पण तुझा मोह वाचुन मलाही
वा!
पण तुझा मोह वाचुन मलाही माझ्या मोहाची आठवण झाली.. आणि झब्बु द्यायचा मोह झालाच
http://www.maayboli.com/node/40350
म्हणजे त्यांचा आपल्याला
म्हणजे त्यांचा आपल्याला स्पर्श तर होईल
पण परिणाम नाही....! >>>> हीच तर स्थितप्रज्ञता. (माझ्यामते)
खरंचंच खूपच अप्रतिम विचार, सुंदरपणे मांडलेत..
सुंदर
सुंदर
आवड्ली
आवड्ली
सुंदर!
सुंदर!
खूप छान! मोह हा शब्दच किती
खूप छान!
मोह हा शब्दच किती मोहक आहे
दोनच अक्षरात नशा, धुंदी नि बहक आहे!
मग वाटतं,
असे मोहाचे क्षण टोलवता आले पाहीजेत..
>>>
मनाचा कितीही निग्रह केला तरीही प्रत्येक वेळी हे टोलवणे, डावलणे जमेलच असं नाही. संयम आणि मोहाचे आरोह-अवरोह अव्याहत राहणार! त्यातच मजा
आभारी आहे मित्रांनो, निंबे
आभारी आहे मित्रांनो,
निंबे तुझ्या दोन्ही कविता मस्त आहेत!
आणि वर्षा, अगं स्फुटाला झब्बू कवितेचा?
आवडली
आवडली
बागेश्री, मस्त उतरलंय. सूर
बागेश्री, मस्त उतरलंय. सूर गवसलेला सचिन जसा सगळेच चेंडू उचलून चोपायला जात नाही. काही नुसते कट करायचे असतात तर काहींना सोडून देऊन कानशिलाजवळून जाताना लागलेल्या वाऱ्यावरच समाधान मानायचं असतं.
वाह धनंजय, आवडली कमेंट
वाह धनंजय,
आवडली कमेंट तुमची..
उदासीनेतून बाहेर न पडण्याचा
उदासीनेतून बाहेर न पडण्याचा मोह..
आणि
त्यांचा आपल्याला स्पर्श तर होईल
पण परिणाम नाही....!
कवितेतला हा भाग आवडला.
आवडली कविता
आवडली कविता
अशा वेळी त्यातून बाहेर
अशा वेळी त्यातून बाहेर पडण्याची उसनी धडपडही न करण्याचा मोह!!
सुंदर उतरलेय पुन्हा एकदा......!
निराशेच्या क्षणातूनही बाहेर न पडण्याचा मोह __________/\_________
कविता फार आवडली.
कविता फार आवडली.
मोहुनीया तुज संगे नयन खेळले
मोहुनीया तुज संगे नयन खेळले जुगार - या गाण्याची आठवण झाली.
छानै...आवडली
छानै...आवडली
सुंदर कविता. मनाच्या
सुंदर कविता. मनाच्या कोठल्यातरी खोल, गूढ, पण त्याच वेळी दुखर्या कोपर्यातून थेट उमटलेली कविता – जणू काही एखाद्या जखमेवरची खपली निघाल्यावर मनात आलेले विचार विनासायास शब्दबद्ध व्हावेत !!!!
छान उतरलेय ...... अगदी
छान उतरलेय ...... अगदी सहज.
"कधी हा मोह इतका लोभसवाणा की,
सारासार विचारांना तेव्हा सरळ बाजूला सारून आनंदाने त्यापुढे शरण जावं.." >>> हे सर्वाधिक आवडलं.