Submitted by विनायक उजळंबे on 16 January, 2013 - 23:58
गझलियत गवसते थोर खाशी ,
ठेच सानीत जेव्हा तळाशी
झेप मी घेतली उंच गगनी
जोडता नाळ माझी तुझ्याशी !!
प्रश्न नाही कुणाचा मनाशी
उत्तराची अपेक्षा जनाशी ..!!
मागणे हेच आता कृपाळा
बोलणे होऊ दे अंतराशी ..!!
थंड रक्तास ऐकव विनायक ,
षंढ नाते तुझे 'निर्भया'शी !!
------------------------------------------------
घोर माझ्या शिडाचा कशाला ?
माझिया (होडिचा) तू खलाशी !!
विनायक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला नाही आवडला निर्भयाचा शेर
मतला नाही आवडला
निर्भयाचा शेर खूप आवडला
होडी कंसात का ठेवली आहे ?
ठेच सानीत जेव्हा तळाशी>>>> ओळ सर्वाधिक आवडली
माझा एक शेर आठवला................सहजच !
नका रे मला त्या अनंतात शोधू
जिथे शेर होतो ....तिथे संपतो "मी"
धन्यवाद
छान.
छान.
होडी कंसात का ठेवली आहे
होडी कंसात का ठेवली आहे ?
>>>>>>>
नमस्कार ,
या प्रश्नातच उत्तर आहे !!
होडी ->> गागा
मी वापरताना होडि ->> गाल वापरले सूट घेतली म्हणून
दोन गोष्टी केल्या
१) मुळ रचनेत तो शेर समविष्ट नाही केला
२) आणि होडी कंसात ठेवली !!
सुंदर.
सुंदर.
प्रश्न नाही कुणाचा
प्रश्न नाही कुणाचा मनाशी
उत्तराची अपेक्षा जनाशी ..!!
मागणे हेच आता कृपाळा
बोलणे होऊ दे अंतराशी ..!!
थंड रक्तास ऐकव विनायक ,
षंढ नाते तुझे 'निर्भया'शी !!<<< सुंदर शेर, प्रभावी खयाल
धन्यवाद
षंढ नाते हा शेर आवडला.
षंढ नाते हा शेर आवडला.
मतला वगळता सगळे शेर आवडले.
मतला वगळता सगळे शेर आवडले.
धन्यवाद आपण<< (होडिचा)
धन्यवाद
आपण<< (होडिचा) ....असे का केलेत ते समजले पटले की नाही हा भाग वेगळा
असो
धन्यवाद
प्रश्न नाही कुणाचा मनाशी
प्रश्न नाही कुणाचा मनाशी
उत्तराची अपेक्षा जनाशी ..!!
व्वा..! मस्त शेर आहे विनायक.
धन्यवाद सा-यांचे !!
धन्यवाद सा-यांचे !!