Submitted by रेव्यु on 16 January, 2013 - 12:15
मी १६ एप्रिल १३ ला सकाळी ९ वा अॅमस्टरडॅमला पोहोचत आहे. ३ दिवस मोकळा आहे.
१९ एप्रिलला सकाळी ९ वाजता पुढील विमान आहे.
या कालावधीत काय काय पहाता येईल? तसेच जवळपास- बेल्जियम वगैरेला जाता येईल का? केवळ पर्यटन या दृष्टीने सांगाल का?
कंडक्टेड टूर्स चालतील.
मी या पूर्वी मदुराडॅम ( की मज्युरा डॅम??) व कुकेन्हॉफ पाहिले आहे. म्युजियम्स व नाईट लाईफ मध्ये स्वारस्य फारसे नाही. निसर्गसौंदर्य तसेच इतिहास, ग्रामीण भाग पहायला आवडेल.
हॉटेल मध्यवस्तीत बूक्ड आहे.
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
झॅन्डॅम किंवा झान्सेस्खॅन
झॅन्डॅम किंवा झान्सेस्खॅन नावाचे ठिकाण आहे अॅम्स्टरडॅमजवळ, जिथे पवनचक्क्या आहेत.. काही चालू आहेत... चीज फॅक्टरी आणि वुडन शू फॅक्टरी आहे.
डॅम स्क्वेअर जवळून कॅनाल टूर निघतात.. त्यातली एक टूर हॉप ऑन प्रकाराची आहे ज्यात अॅन फ्रॅन्कचे घर आणि एका चित्रकाराचे काम पहाता येते (नाव सपशेल विसरले
)
प्राणीमात्रात रस असेल तर डॉल्फिनेरीअमला भेट द्या .. छानच शो असतो.
रॉत्ररदामला देखिल थोडा फार इतिहास आहे.. त्याजवळ द्वेल्फ्त नावाचे शहर आहे ति थे निळ्या विशिष्ठ रंगाचे शाईकाम केलेल्या वस्तू मिळतात.. ब्लाऊ म्हनजे निळा रंग.. थोडे गुगललेत तर काही तरी तिथेही पहाण्यासारखे सापडेल.
अजुन काही कळवते, आठवले तर!
एप्रिल म्हणजे एखाद दिवस
एप्रिल म्हणजे एखाद दिवस तुम्ही हुगा वेलंला (छोटे नॅशनल पार्क आहे) जाउ शकाल.. ऑर्टेल्लं नावाचं एक छोटसं गाव आहे हुगावेलंच्या काठावर. तिथे वीनेंडालहून बस जाते. एखाद दिवस त्या गावात बेड अँड ब्रेकफास्ट मध्ये राहू शकाल. आर्न्हेममध्ये एखाद दिवस घालवता येईल.
माझा हॉलंड प्रवासाचा लेख बघुन
माझा हॉलंड प्रवासाचा लेख बघुन घे. (बघितला असशिल असं वाटतय)
बाकी जाईजुईला विचार असं सांआयला आलो होतो... तिनी आधिच प्रतिसाद दिलाय, तेंव्हा all the best आणि फोटो/लेख जरुर टाक.
रेव्यु, जाजुने सांगितलेली
रेव्यु, जाजुने सांगितलेली कॅनाल टूर नक्की घ्या.
Belgium is strongly recommeded! खूप सुंदर आहे.
झॅन्डॅम किंवा झान्सेस्खॅन
झॅन्डॅम किंवा झान्सेस्खॅन नावाचे ठिकाण आहे अॅम्स्टरडॅमजवळ >> हे खूप छान आहे. तिथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चीज विकतपण घेउ शकता.
ज्यात अॅन फ्रॅन्कचे घर आणि एका चित्रकाराचे काम पहाता येते >> व्हॅन गॉफ म्युझियम
अॅमस्टरडॅमहून बेल्जियम मधलं अँटवर्प १.५ तासाच्या अंतरावर आहे(ट्रेन). खूप सुंदर आहे. एका दिवसात बरेचसे बघून होइल. तिथंही 'हॉप ऑन हॉप ऑफ' बस टूर्स आहेत.
अॅमस्टरडॅमहून जवळच ब्रजेस
अॅमस्टरडॅमहून जवळच ब्रजेस आहे... तिथे नक्की जा... खुप सुंदर आणि छोटेखानी शहर आहे.
A must visit...
बेल्जियम बद्दल मनीष आणि वेडा
बेल्जियम बद्दल मनीष आणि वेडा +१. ब्रजेस खूपच सुंदर शहर आहे. शिवाय एका दिवसात धावत पळत बघावे लागत नाही.
अॅन फ्रँकची डायरी वाचल्यास घर नक्की बघा. म्युझियम पण पहा. पॅरीसला जायचा प्लॅन असेल तर लूव्रे म्युझियम बघाच. हे मात्र एका दिवसात पाहून होईल की नाही शंकाच आहे.
अॅमस्टरडॅम मधे सुद्धा बरच
अॅमस्टरडॅम मधे सुद्धा बरच बघण्यासारख आहे.
जर तुम्हाला clubs आणि disco party मधे interest असेल तर खालिल लिन्क बघा.
http://www.guardian.co.uk/travel/2011/jun/18/amsterdam-10-best-clubs
Red Light District चि सफर चुकवु नका.
Amsterdam is Sex capital of the world.
धन्यवाद मंडळी असं प्लॅन केले
धन्यवाद मंडळी
असं प्लॅन केले आहे
दि १६ - सकाळी मुंबईहून आगमन - ७ वा - १० ते ११ च्या सुमारास - पूर्ण दिवसाची ( अॅमस्टर्डॅम व कंट्री साईड टूर) उशीर झाल्यास अर्धा दिवस/http://www.viator.com/tours/Amsterdam/Amsterdam-Super-Saver-3-City-Tour-...
दि १७- ब्रजेस व इतर कंट्री साईड
http://www.viator.com/tours/Amsterdam/Bruges-Day-Trip-from-Amsterdam/d52...
दि १८ _ बेल्जियम,ब्रुसेल्स , अँट्वर्प इ.
http://www.viator.com/tours/Amsterdam/Brussels-and-Antwerp-Day-Trip-from...
दि. १९ - प्रयाण
रोज सायंकाळी क्रूज इ.
काय वाटते?