Submitted by श्यामली on 16 January, 2013 - 08:04
सेल लागलासे एक दिवसाचा
पाउलास ओढ लागली मॉलाची
वाटे आगत्याचे आम्हा आमंत्रण
स्वारीच्या खिशास बसू दे चाट
फिरताना दिसती आणखिन सेल
कसा हा टाळावा सांग मोह
मधेच आठवे, पर्स ना मॅचिंग
डिझायनर चप्पल खूणावते
ड्रेसास, पर्स, पर्सेला, चप्पल
मनास चंचल म्हणोनिया झाले
ज्वेलरीही आता जंकच घेऊ
ख-याची दुनिया राहिली नाही!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
छान कविता आवडली यमकमुक्त हे
छान कविता
आवडली
यमकमुक्त हे विशेष (तरी अवडली )
(No subject)
आवडला हा फॉर्म. मस्त लिहीता
आवडला हा फॉर्म. मस्त लिहीता हो श्यामली तुम्ही.