चर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आजकाल काय झालंय कुणास ठाऊक, पण काही म्हणता काही कविता सुचंत नाहीत. Proud (कोण ते 'बरंय! छळवाद कमी!!' म्हणालं?) कविता स्फुरावी म्हणून संत्र्याच्या झाडाखाली (सकाळ, दुपार आणि संध्याकाळ) बसून बघीतलं, पण ढीम्म!!! काय करावं? फ्लोरिडात मेला मेपल गावंत नाही!!!!
विचारात पडले असतानाच 'घर' नावाची कविता वाचली : http://www.maayboli.com/node/4004#comments
त्यावरून 'चर' सुचली. तरी विशाल कुलकर्णींनी मला क्षमा करावी. (आणि वाचकांनी मूळ कविता दुसर्‍या खिडकीत उघडून पाठोपाठ वाचावी.) Happy

चर

तुझ्या
एका चरण्यानं
फ्रिजातलं
सारं अन्न
संपून गेलंय.
वरच्या...
खालच्या...
रॅक्स ओढून
तू
दिसेल ते
हाणलंय.
रिकामपणी
खाण्यासाठी
भलंमोठं...
सँडविच
ठेवलंय
ते
सावकाश खा
तुझ्या
पोटासाठी
एक
पुदीनहरा
गावलंय.
पीशील ना?

प्रकार: 

मॄ
अजून हरिकेनचे दिवस संपले नाहीत अन तुझा फ्रीज रिकामा करून कसं चालेल? आपातकालीन परिस्थितीची तयारी , शिवाय तुझ्या गावातल्यांसाठी इमर्जंसी शेल्टर वगैरे कसं चालेल अशाने. ते काही नाही! विमनस्कता दे झुगारून अन ग्रोसरी आणायला जा पाहू.
मग
क, को, हि मी, लिं, कां, ब, ब्रे , द या आद्याक्षरांवरुन अजून एक कविता सुचेल तुला.

आजकाल खाण्यावर तुझ फार बारीक लक्ष दिसतय. Proud

Happy Happy

Lol झकासला अनुमोदन Happy

    ***
    Cole's Law : Thinly sliced cabbage salad rules.

    ही कविता मृण्मयीच्या समस्येवरची ....

    ताजी ताजी सकाळ
    संत्र्याच्या झाडाखाली
    कागद कोरेच ||१||

    कंटाळवाण्या दुपारी
    संत्र्याच्या सावलीत
    प्रतिभेची वामकु्क्षी ||२||

    झाडावरची संत्री प्रेमळ
    रिकामी संध्याकाळ
    वाट कुणाची? ||३||

    बापू करन्दिकर

    बापू, मस्तच!

    हायकु ? Happy

    'झाडावरची प्रेमळ संत्री' Proud

    झकास, 'खाण्यावर बारिक लक्ष' न्हाय काय, 'बारिक होण्यासाठी खाण्यावर लक्ष'! Proud

    ..............
    कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud