Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 10 January, 2013 - 09:32
कसे रामराया तुम्हाला पाहावे
गुणांच्या गुढाला कसे आकळावे || १
कळेना तरी शोधण्या मीच धावे
पडोनी प्रयासी पुन्हा नी झटावे || २
असे का हि क्रीडा कुणाची कळेना
अश्या थोर काजा कुणी का धजेना || ३
कशी भ्रांती कैदाशिणी घोर माया
गुंडाळूनि ठेवे पदासी जगा या || ४
असे या जगाचे तुम्ही राम स्वामी
तरी का भिकारी तुझे भक्त आम्ही ||५
अहो धाव घाला जना वाचवावे
तुची सांग आम्ही कुणा बोलवावे || ६
पडो देह आता तुला शोधतांना
असे लांछना भोग ते भोगतांना ||७
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पडो देह आता तुला शोधतांना
पडो देह आता तुला शोधतांना >>>> अशी कळवळ पाहिजे -मनापासून....
सुरेख रचना - भुजंगप्रयात चांगले जमलेय......
धन्यवाद शशांक .
धन्यवाद शशांक .