Submitted by पारिजाता on 10 January, 2013 - 04:21
मी कामं लौकर करते पण मला organize करायला अवघड वाटते. एका वेळी खूप गोष्टी अंगावर घ्यायची सवय आहे आणि मला त्या करायला आवडत असतात पण मग organization becomes and issue! विसरणे, procrastinate करणे, काहीतरी dependency असेल तर सोडून देणे, कंटाळा येणे अशा गोष्टी लक्षात आल्यात पण तुम्हाला माहीत असलेले, अनुभवातले, वाचलेले उपाय असतिल तर प्लिज सांगा. इथे ऑफिस आणि personal life दोन्हीसाठी उपयोगी येतील किम्वा general कुठल्याही गोष्टीचे organization करताना फायदा होईल अशा गोष्टी प्लिज शेयर करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
organisation की organization
organisation की organization
गंमत करते आहे.. चांगला धागा
मला माहित नाही हे इथे योग्य
मला माहित नाही हे इथे योग्य आहे की नाही ते, पण "वेळ पाळणे" हे स्वत:ला ऑर्गनाईझ्ड करण्यामधली एक अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे...
थँक्स अंकु. सांग ना मग . तू
थँक्स अंकु. सांग ना मग . तू कशी organize करतेस एखादी गोष्ट?
organizationमध्ये सगळ्यात
organizationमध्ये सगळ्यात महत्वाचे गोष्ट म्हणजे वेळ आणि निटनेटकेपणा.... तुम्ही तुमच्या कामाची वेळ निश्चीत करा .बरोबर ह्या वेळेत हे काम झालेच पाहिजे..असे ध्येय ठेवले की....आपोआप सगळे काम होतात... वस्तु जागच्या जागेवर ठेवणे... हे पण ऑर्गनाईझ करण्यामधील अत्यंत उपयोगी गोष्ट आहे .:स्मित:
१. प्रायॉरीटीज सेट करा. जास्त
१. प्रायॉरीटीज सेट करा. जास्त नाही निदन प्रत्येक सोमवारी एका आठवड्याचं वेळा पत्रक बनवा
२. हाता खाली लोक असतिल तर डेलीगेट करा
३. प्रत्येक गोष्ट मीच करणार हा अट्टाहास सोडायचा प्रयत्न करा
४. प्रत्येक सोमवारी जर एखादी गोष्ट त्याच त्या लिस्ट मधे वारंवार यायला लागली की समजावे "इट्स हाय टाईम" आणि पहिले ती गोष्ट पूर्ण करा... मग त्याचा क्रम कुठलाही असु दे...
५. शक्य असल्यास कामाच्या ठीकाणी / घरी एखादा व्हाइट बोर्ड/ फळा असु दे. त्या वर रोजची टारगेट लिहायची.
६. घरात कामाचे नियोजन करताना, कुठली कामे इतरांच्या गळ्यात मारता येतिल ते पहावे
७. दर शनीवारी राहिलेल्या कामां ची एक यादी बनवा "नीगेटिव्ह लिस्ट" म्हणजे मग सोमवारी प्लॅनिंग सोपे जाइल...
सध्या येवढच!!!
१. नोट करुन ठेवणे. आउटलूक
१. नोट करुन ठेवणे. आउटलूक सारखी अनेक PIM मॅनेजर्स सॉफ्टवेअर्स आहेत.
२. प्रायॉरीटीज ठरवणे (१. अर्जन्ट अॅन्ड ईम्पॉर्टन्ट, २. अर्जन्ट बट नॉट ईम्पॉर्टन्ट, ३. नॉट अर्जन्ट बट ईम्पॉर्टन्ट, ४. नॉट अर्जन्ट नॉट ईम्पॉर्टन्ट ह्या चार क्वाड्रन्टस् मध्ये कामांची विभागणी करणे)
३. वरची विभागणी तपासणे व त्यावर काम करणे.
४. क्वाड्रन्ट ३ व ४ मधली कामे वेळेवर न केल्यास ती १ व २ मध्ये येऊन बसतात हे लक्षात ठेवणे.
५. ८० / २० रुल वापरणे.
६. रीझल्ट ओरीएन्टेड काम करणे.
७. दिलेल्या वेळा व वचने पाळणे.
८. डेलीगेट करायला शिकणे.
चांगल्या organization साठी
चांगल्या organization साठी काय करावे?
>>
'काम आणि वेळ ह्यांचे नियोजन' असे करता येईल का हे शीर्षक? आत्ताच्या शीर्षकावरून काहीच बोध होत नाहीये नीट.
बाबु, पुस्तकी फंडे
बाबु, पुस्तकी फंडे
कामच करु नका............. न
कामच करु नका............. न रहेगा बांस न बजेगी बांसुरी
ऊप्स लिहिलिहीपर्यंत मोकीमींची
ऊप्स लिहिलिहीपर्यंत मोकीमींची पोस्ट पडलीही.
अॅन्ड्रॉईड / स्मार्टफोन्सकरीता बरीचशी अॅप्लिकेशन्स आहेत.
प्लान - अॅक्शन - चेक ही सायकल चालवणे
निंबे, खरय अगदी. पण वाचून
निंबे, खरय अगदी. पण वाचून स्वत: आचरणात आणून मगच लिहिल्येत ईथे.
आया, स्मितु, मीरा, बाबु
आया, स्मितु, मीरा, बाबु थॅंक्स
बाबु निंबुडा म्हणते आहे तसं हे थोडं मॅनेजमेंट पुस्तकातलं वाटतंय. मला खरंच रोजच्या रोज काय करता येईल ते हवं आहे.
निंबुडे हो गं मी फार विचार केला पण सुचलं नाही नीट. आता बदललं.. थँक्स.
पण ते क्वाड्रंट ३,४ चे अगदी
पण ते क्वाड्रंट ३,४ चे अगदी खरे.
मला पण सध्या घर आणी ऑफिस
मला पण सध्या घर आणी ऑफिस manage करण अवघड जातय
त्यात घरी बाई मिळाली नाही अजुन [कपडे आणी भांडी मोठी प्रश्न आहे पिल्लु ला संभाळुन]
पारे, एक काम कर. सगळ्यात आधी
पारे, एक काम कर. सगळ्यात आधी लिस्ट बनव आ णि त्याची विभागणी कर. फार फार तर आठवडाभर हे कागदावर (फोनमध्ये) करावं लागेल. नंतर मनातल्या मनात करता येईल. हे रोजच्या रोज का करता येणार नाही तुला ?
काही टास्क्स दिवसातून दोनदा तर काही गोष्टी महिन्यातून एकदा करता येतील. मी माझ्या बिल्सचे मंथली रीमाईन्डर्स लावल्येत. डेली टास्क लिस्ट डेस्कटॉपवर टाकलीये. खाजगी कामं फोनवर फीडलीयेत. बध्धा मज्जांनु लाईफ
पुस्तकी.... नाही... ट्राईड &
पुस्तकी.... नाही... ट्राईड & टेस्टेड आहेत हे फंडे.... कधी कधी कंटाळा येतो, पण खुप उपयोग होतो. ऑफिसातल्या माझ्या व्हाईट बोर्ड ला सगळे "मॅडम का चाबुक" म्हणतात... त्या वर त्यांचं / त्यांच्या पोर्ट्फोलिओ चं नाव गेलं की कामाला लागतात... माझ्या पेक्षा त्यांनाच घाई असते नाव पुसलं जायची. ( सध्या राजीनामा दिला आहे, हँड ओव्हर स्टेज मधे आहे, त्या मुळे "चालली कैदाशीण" असं कोण म्हणतय रे!!!!)
घरातही अनेकदा नीट नियोजन करुन बरीचशी कामं होतात. एखादा दिवस सफाई .. म्हणजे फक्त सफाइ... एक दिवस बँकांचा... बीलं सगळी ऑनलाइन भरायची... एक दिवस घरातलं सामान, बाकी मुलीचा अभ्यास रोज म्हणजे रोज करायचाच,,,, माझं पण धंदा नु वाचन करायलाच लागतं... पण घरी सगळेच काम करतात... त्या मुळे सगळं एका वर पडलय असं होत नाही....
मुख्य म्हणजे प्रायोरीटीज वर भर दे.... खुप फायदा होइल...
क्रेडीट कार्डची बिले, वीजेचे
क्रेडीट कार्डची बिले, वीजेचे बिल, टेलीफोनचे बील ECS/ ऑटो पेमेंट मध्ये कन्वर्ट करून घेणे. अधून मधून त्यावर फक्त चेक (लक्ष) ठेवणे. ऑटो पेमेंट होण्यासाठी मेल्/मोबाईलवर रीमाईंडर्स येतात तसेच ऑटो पेमेंट झाल्यावर नोटिफिकेशनही येते.
बाबु कस्ला भारी आहेस तू.
बाबु कस्ला भारी आहेस तू. तुझ्याकडं ट्युशन लावते आणी मीराचे नोटस रिफर करते.
बिल्स चे मन्थली रिमाईंडर्स मी पण लावलेत पण मी ते snooze करते no jokes
खाजगी कामं फोनवर फीडलीयेत ( ) मी पण, पण काही काही तशीच रहातात क्वाड्रन्ट १ मधे येईपर्यंत
मला बहुतेक खुप जास्त काम झाले आहे. खूप वैताग आला की अति झालं हसू आलं सारखं मी सगळं सोडून निवांत टीपी करत बस्ते. मग अकरा वाजले (11th hour) की जाम टेन्शन येतं .सॉरी वाचताना तुम्हाला हसू येइल पण खरंच I am so pathetic
मोकीमी, लईच अनुमोदन. पुस्तकात
मोकीमी, लईच अनुमोदन. पुस्तकात वाचूनच सापडले होते हे फंडे मला तरी. पण खूप कामाचे आहेत. स्वतःचा व्हाईट बोर्ड हवाच, पण त्यावर लक्षही हवं. त्याशिवाय मल्टिटास्किंग शक्य नाही. शिवाय ओव्हरव्ह्यू घेतल्याशिवाय ८०/२० कळणारही नाही ना.
जवळच्या व्यक्तींना
जवळच्या व्यक्तींना ख्यालीखुशालीचे फोन करायचे झाल्यास मी प्रवासा दरम्यान करते. जेणे करून ऑफिसमधल्या / घरातल्या वेळेवर / कामावर त्या संभाषणाने खाल्लेल्या वेळेचा ताण येणार नाही.
घरात जमेल तितके पॅरेलल वर्क. उदा. सकाळी उठल्या उठल्या चहाचे आधण गॅसवर चढवून एकिकडे ब्रश करायला घ्यायचं आणि बाथरूम मध्ये गरम पाण्याचा गीझर चालू करून ठेवायचं. कुठकुठची कामे अशी पॅरेलली जमवता येतील ते आपलं आपण ठरवून त्या प्रमाणे पार पाडायचं.
बिल्स चे मन्थली रिमाईंडर्स मी
बिल्स चे मन्थली रिमाईंडर्स मी पण लावलेत पण मी ते snooze करते
>>
अरेरे no jokes
>> okey.. no jokes...
निंबु ने म्हंटलय तसं.... जी
निंबु ने म्हंटलय तसं.... जी कामं नुसती मॉनीटर करुन होतात, त्या वर श्रम वाया घालवायचे नाहीत. आजकाल ओनलाईन, इसी.एस, हे मंत्र आहेत ते जपायचे...
ऑफिस मधे फायलिंग वेळच्या वेळी करायचं, तसच मेल ला उत्तर लागोलाग द्यायच, एखाद्या पत्राचं उत्तर लगेच पाथवायच, रुटीन कामांचं वेळापत्रकच बनवायच, नेहेमी लागणारे रीपोर्ट्स चहा पिता पीता डाउनलोड/ कंपाइल करायचे. शक्यतो रीपोर्ट्चं स्वरुप/ आराखडा बदलायचा नाही, फिल इन द गॅप्स किंवा कॉपी पेस्ट केलं की झालं, काही काही फॉर्मॅट फावल्या वेळात करायचे.
घरात जमेल तितके पॅरेलल
घरात जमेल तितके पॅरेलल वर्क.
>> घरातच नाही, जिथे जमेल तिथे... मज्ज्जा येते असं करायला
व्हाईट बोर्ड बाबत माझेही
व्हाईट बोर्ड बाबत माझेही अनुमोदन. घरात तर लावला आहेच, पण मोकिमी प्रमाणे हापिसातही मीच पुढाकार घेऊन मोठ्ठा व्हाईट बोर्ड पूर्ण टीम साठी बसवून घेतला आहे.
ऑफिसातल्या माझ्या व्हाईट बोर्ड ला सगळे "मॅडम का चाबुक" म्हणतात >> माझ्याकडेही थोडेफार असेच आहे. आता टीमचे बरेचसे प्रोसीडिंग्स वेळच्या वेळी होत असल्याने मॅनेजर साहेब लईच खुश आहेत आमचे!
मीरा तुला नाही गं पुस्तकी
मीरा तुला नाही गं पुस्तकी म्हणलं. तुझे वाचूनच वाटतायेत जालिम उपाय आणी फार उपयोगी
मी पण white board वापरते थांब आता.
निंबुडा हो गं.
मी financial management च्या बाबतीत पण फार निवांत आहे. मला कुणीतरी परवा CTC विचारला तर आठवेचना मग मागचं appraisal letter शोधलं तर ते पण मिळेना. मग boss कडून मागवलं परत
तेंव्हा कळलं की फार लोचा कअरतेय मी एकूण आणि फार गरज आहे organization ची
पारी, जर तू सांगत्येस ते खरच
पारी, जर तू सांगत्येस ते खरच खर असेल तर रीलॅक्स. टाईम स्लॉट पाडून बघ. तूला काम मॅनेज न झाल्याने त्यांचा कंटाळा आलाय असं मला वाटतंय. मग ती मॅनेज झाल्याशिवाय तो कंटाळा जाणारही नाही हे लक्षात घे.
छोटी प्लानिंग्ज कर आणि ती पूर्ण कर. उत्साह वाढेल
organisation की
organisation की organization
पहिला ब्रिटिश. दुसरा अमेरिकन.
हो अरे. एक मोठ्ठा कंटाळ्याचा
हो अरे. एक मोठ्ठा कंटाळ्याचा ढग तरंगतोय डोक्यावर. आणि खुप उपाय करून जातच नाहीये. पूर्वी मी बर्यापैकी organized होते.
आया, निंबुडा हो पॅरलल वर्क effective खरं पण मग मी नुसती चॅनेल बदलत बसते. जसं एक रिपोर्ट रन करायला लावला आणि मेल ला उत्तर द्यायला लागले कि नंतर रिपोर्ट झाला की नाही हे बघायचं विसरूनच जाते. मग खरंतर तो लौकर होऊन पण उशिरा पाठवते कधीकधी
>> ऑफिस मधे फायलिंग वेळच्या वेळी करायचं, तसच मेल ला उत्तर लागोलाग द्यायच, एखाद्या पत्राचं उत्तर लगेच पाथवायच, रुटीन कामांचं वेळापत्रकच बनवायच, नेहेमी लागणारे रीपोर्ट्स चहा पिता पीता डाउनलोड/ कंपाइल करायचे. शक्यतो रीपोर्ट्चं स्वरुप/ आराखडा बदलायचा नाही, फिल इन द गॅप्स किंवा कॉपी पेस्ट केलं की झालं, काही काही फॉर्मॅट फावल्या वेळात करायचे.
थँक्स मीरा.
>> छोटी प्लानिंग्ज कर आणि ती पूर्ण कर. उत्साह वाढेल
थँक्स बाबू.
घरात जमेल तितके पॅरेलल वर्क.
घरात जमेल तितके पॅरेलल वर्क. उदा. सकाळी उठल्या उठल्या चहाचे आधण गॅसवर चढवून एकिकडे ब्रश करायला घ्यायचं आणि बाथरूम मध्ये गरम पाण्याचा गीझर चालू करून ठेवायचं. कुठकुठची कामे अशी पॅरेलली जमवता येतील ते आपलं आपण ठरवून त्या प्रमाणे पार पाडायचं.>>>
हे तर खुपच... त्या शीवाय पर्यायच नाही.....
आया, निंबुडा हो पॅरलल वर्क
आया, निंबुडा हो पॅरलल वर्क effective खरं पण मग मी नुसती चॅनेल बदलत बसते. जसं एक रिपोर्ट रन करायला लावला आणि मेल ला उत्तर द्यायला लागले कि नंतर रिपोर्ट झाला की नाही हे बघायचं विसरूनच जाते. मग खरंतर तो लौकर होऊन पण उशिरा पाठवते कधीकधी
>> वरील प्रतिसाद पाहता मी यात तज्ज्ञ अथवा अनुभवी नाहीये अजून हे कळतंय, पण सतत प्रयत्न करत रहा, हळूहळू नक्की जमेल तुला हे सांगावसंही वाटतंय..
Pages