गझल
तुझ्या कृपेची किरणे, माझ्यावरती का रुसलेली?
का वाट्याला माझ्या आली? वाट अशी चुकलेली!
मलाच मी देताना खांदा, हाय किती थकलेलो....
ऐन यौवनी सुद्धा माझी पाठ पहा झुकलेली!
हरेक दिवशी घरून निघतो, पुसून माझी पाटी....
घरी परतताना ती असते प्रचंड बरबटलेली!
चार दिवस बाहेर काय मी गावाला गेलेलो....
कळीकळीचा म्लान चेहरा...बाग पूर्ण सुकलेली!
कुणास आता नको तेवणे हे माझे नित्याचे!
मी म्हणजे कंदील जयाची काचच धुरकटलेली!!
रदीफ अन् काफिया छान, पण, चिंतन सखोल नाही!
म्हणून त्यांची गझल वाटते निव्वळ फरफटलेली!!
चुरगळलो मी, सुरकुतलो मी, फक्त चुकांनी काही....
घडी माझिया आयुष्याची अजून विस्कटलेली!
त्या स्वप्नांशी पुन्हा आमचे कधीच जमले नाही!
तरुणपणी बोलणी आमची, स्मरते, फिसकटलेली!!
वापरून एवढे घेतले दुनियेने मजला की;
दुनियेला वाटतो जणू मी चादर मळकटलेली!
पुन्हा एकदा जन्म घेवुनी इथे जगावे वाटे!
या जन्मी जिंदगी उभी मज दिसते ओघळलेली!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
चार दिवस बाहेर काय मी गावाला
चार दिवस बाहेर काय मी गावाला गेलेलो....
कळीकळीचा म्लान चेहरा...बाग पूर्ण सुकलेली!
फार सुंदर
हरेक दिवशी घरून निघतो, पुसून माझी पाटी....
घरी परतताना ती असते प्रचंड बरबटलेली!
छान.
धन्यवाद समीर! असाच लोभ असावा!
धन्यवाद समीर!
असाच लोभ असावा!
रदीफ अन् काफिया छान, पण,
रदीफ अन् काफिया छान, पण, चिंतन सखोल नाही!
म्हणून त्यांची गझल वाटते निव्वळ फरफटलेली!!>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>.ह्याशेरात इतरांच्या गझलेबाबत आपण घेतलेली भूमिका अवडली नाही
हा शेर सोडून अख्खी गझल छान आहे . आवडली!!
का वाट्याला माझ्या आली? वाट अशी चुकलेली!>>>>>>>>>>>माझा एक शेर आठवला
मी चालतोच आहे जन्मांतरे कधीची
मी तोंडपाठ केल्या होत्या चुकार वाटा
धन्यवाद
आवडली...
आवडली...
सर, आवडली गझल
सर,
आवडली गझल
व्व्वा!! कळ्यांचा म्लान
व्व्वा!!
कळ्यांचा म्लान चेहरा... सुंदर!
<<रदीफ अन् काफिया छान, पण,
<<रदीफ अन् काफिया छान, पण, चिंतन सखोल नाही!
म्हणून त्यांची गझल वाटते निव्वळ फरफटलेली!!>>
हे १००% पटले
छान्.....आवडली.........
छान्.....आवडली.........
तुझ्या कृपेची किरणे,
तुझ्या कृपेची किरणे, माझ्यावरती का रुसलेली?
का वाट्याला माझ्या आली? वाट अशी चुकलेली!
मलाच मी देताना खांदा, हाय किती थकलेलो....
ऐन यौवनी सुद्धा माझी पाठ पहा झुकलेली!
हरेक दिवशी घरून निघतो, पुसून माझी पाटी....
घरी परतताना ती असते प्रचंड बरबटलेली!
चार दिवस बाहेर काय मी गावाला गेलेलो....
कळीकळीचा म्लान चेहरा...बाग पूर्ण सुकलेली!<<<
वा वा, शेर आवडले
धन्यवाद भूषणराव! असाच लोभ असू
धन्यवाद भूषणराव!
असाच लोभ असू द्या!
सर्व प्रतिसाद दात्यांचा आभारी
सर्व प्रतिसाद दात्यांचा आभारी आहे!
असाच लोभ असू द्या!
चार दिवस बाहेर काय मी गावाला
चार दिवस बाहेर काय मी गावाला गेलेलो....
कळीकळीचा म्लान चेहरा...बाग पूर्ण सुकलेली!
उत्तम शेर.
धन्यवाद विजयराव!
धन्यवाद विजयराव!