Submitted by -शाम on 7 January, 2013 - 07:43
रोज स्वप्ने पावलांना भूल देती
रोज वाटाही नव्याने हूल देती
भेटता ती बोलणे विसरून जातो
केवढे झोके मनाला डूल देती
ही अघोरी रीत प्रेमाची कळेना
का फुलाला तोडलेले फूल देती
ही कशी आली सुखे घरट्यात माझ्या
सारखी दु:खा तुझी चाहूल देती
जाहले सत्कार माझेही जसे की
राबत्या बैलास कुणबी झूल देती
निर्मुखी जेथून कोणीही न गेला
'शाम' आजीची मला तू चूल दे"ती"
............................................................. शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला झक्कास! ही कशी आली सुखे
मतला झक्कास!
ही कशी आली सुखे घरट्यात माझ्या
सारखी दु:खा तुझी चाहूल देती...वा !
जाहले सत्कार माझेही जसे की
राबत्या बैलास कुणबी झूल देती...क्या बात!
ही अघोरी रीत प्रेमाची
ही अघोरी रीत प्रेमाची कळेना
का फुलाला तोडलेले फूल देती
निर्मुखी जेथून कोणीही न गेला
'शाम' आजीची मला तू चूल दे"ती"<<<
वा
सगळे शेर खूप खूप आवड्ले
सगळे शेर खूप खूप आवड्ले कोणताही एक शेर वेगळा काढू शकत नाही आहे
तरीही मक्ता , रदीफेच्या हट्के शब्दरचने मुळे जरा अधिक खुलला आहे ..त्यामुवळे त्यात जरा जास्त मजा आली असे म्हणतो
गझल आवडली. फुलाचा शेर गमंत
गझल आवडली.
फुलाचा शेर गमंत आणणारा.
मक्ता मस्त, कुणबीही छान.
मस्त
मस्त
झकास
झकास
वाह! नेहमीप्रामाणेच!
वाह!
नेहमीप्रामाणेच!
ही अघोरी रीत प्रेमाची
ही अघोरी रीत प्रेमाची कळेना
का फुलाला तोडलेले फूल देती >>>> आहाहा!! मार डाला!
जाहले सत्कार माझेही जसे की
राबत्या बैलास कुणबी झूल देती>>> सुरेखच!!
गझल खूप आवडली.
ही अघोरी रीत प्रेमाची
ही अघोरी रीत प्रेमाची कळेना
का फुलाला तोडलेले फूल देती
व्वाह्ह!!
सुंदर!
सुंदर!
मस्त आहे गझल.. रोज स्वप्ने
मस्त आहे गझल..
रोज स्वप्ने पावलांना भूल देती
रोज वाटाही नव्याने हूल देती
सुंदर मतला..
ही अघोरी रीत प्रेमाची कळेना
का फुलाला तोडलेले फूल देती
ही कशी आली सुखे घरट्यात माझ्या
सारखी दु:खा तुझी चाहूल देती
व्वा... खयाल फारच सुंदर आहेत ..
गझल सुरेख आहे, काही भरीचे शब्द (दोन-तीन वेळा 'ही' ) वगळता आल्यास अजून ते शेर प्रभावी होतील ( सहजच सांगितले,कृ गै. न.)
पुलेशु.
खुप छान! फार आवडले!!
खुप छान! फार आवडले!!
छान
छान
धन्यवाद , दोस्तांनो. @वैभव
धन्यवाद , दोस्तांनो.
@वैभव मलाही जाणवले ते पण तुर्तास बदल सुचत नाही.. तुला सुचल्यास विपु कर. नाहीतर इथे आग लागली की विरंगुळ्यात पडीक असणार्यांना ठसका जातो
मस्त जमली आहे आवडली
मस्त जमली आहे आवडली
कुणबी झूलीचा आवडला
कुणबी झूलीचा आवडला
नाहीतर इथे आग लागली की
नाहीतर इथे आग लागली की विरंगुळ्यात पडीक असणार्यांना ठसका जातो <<<
फूल आणि झूल मस्तच. आणि आजीची
फूल आणि झूल मस्तच. आणि आजीची चूल म्हणजे अगदी 'वीक पॉइंट' शेर!!!
शामराव, मस्त गझ॑ल!!
नाहीतर इथे आग लागली की
नाहीतर इथे आग लागली की विरंगुळ्यात पडीक असणार्यांना ठसका जातो <<<:हाहा: