Submitted by यशस्विनी on 7 January, 2013 - 00:31
- Daler Rowney Acid Free Paper A3 220 g/m2
- Staedtler, Faber Castell, Derwent Colour Soft Pencils
- Background : Daler Rowney Cryla Artists's Acrylic
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तय!
मस्तय!
छान. आवडलं.
छान. आवडलं.
एक चित्र म्हणून जरी हे चांगले
एक चित्र म्हणून जरी हे चांगले असले तरी, एक पारंपारीक वेशातील जापानी स्त्री म्हणून बारकाव्यात खूपच चुका आहेत.
१) स्त्रीचे डोळे आणि चेहरा - जॅपनीज धाटणीचा चेहरा नाही वाटत हा.
२) वेशभुषा - तिने जो "किमोनो" घातला आहे तो तर बिलकुल पारंपारीक किमोनोसारखा वाटत नाही. किमोनोमध्ये एवढे खांदे आणि "क्लिवेज" नाही हो दिसत.
३) केशभुषा - तिची केशभुषा अगदिच पक्ष्याच्या घरट्यासरखी दिसत आहे. डोक्याच्या क्लिपा अगदी नाजुक असतात, चित्रात दाखवल्या प्रमाणे अशा काड्या नसतात आणि अशा प्रमाणाबाहेर तर अजिबात डोकावत नाहीत.
४) हातात शक्यतो जापानी पंखा असतो, तिच्या हातात काय दाखवले आहे माहीत नाही.
५) उजवा हात अगदीच गंडलाय.
क्रुपया राग नसावा. चित्रात जे खटकलय ते मोकळेपणाने सांगितलेय. अजुन थोडी सरावाची गरज आहे.
वरच्या मताशी २००% सहमत.
वरच्या मताशी २००% सहमत. किमोनो असा गबाळा कधीच नसतो, क्लिवेज कधीच दिसत नाही. अश्या ढिगाने क्लिपा बघितल्या नाहीत.
नाही आवड्लं अजिबातच
आजम, ह्यांना सहमत. नाजूकपणा
आजम, ह्यांना सहमत.
नाजूकपणा दिसत नाही.
आजम, माझा स्वतःचा जपानी
आजम, माझा स्वतःचा जपानी पारंपारिक वेषभुषेबद्दल काही अभ्यास नाही. मुळ रेफरन्स चित्र मला आवडले ते काढायचा मी प्रयत्न केला. त्या चित्रात जशी वेशभुषा,केशभुषा, हातातील वस्तु दाखविली आहे तेच मी काढले.
१. स्त्रिचे डोळे - चाइनीज, जापनीज डोळे बारीक व थोडे वरील दिशेन गेलेले असतात. त्या प्रमाने मी ते काढले.
२. वेशभुषा - मी जे चित्र रेफर करुन काढलय त्यात तर खांदे खुपच ओपन दाखवले आहेत. त्यामानाने मी खांदे खुप कव्हर केले आहेत.
३. केशभुषा - हे मान्य.... मुळ चित्रातील केशभुषादेखील पक्ष्याच्या घरटयासारखीच वाटते. मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाने क्लिपा थोडया नाजुक दिसतात ज्या माझ्या चित्रात लांब आल्या आहेत.
४. हातातील पंख्याविषयी - मुळ चित्रातदेखील पंखा न दाखवता हिच वस्तु दाखविली आहे. आता ती वस्तु नेमकी काय आहे हे मला माहित नाही.
धन्यवाद माझे चित्र इतक्या डिटेलमध्ये पाहुन चुका काढल्याबद्दल
मला पण अजयप्रमाणेच वाटले.
मला पण अजयप्रमाणेच वाटले. विशेशतः १,२, ५. मला बघीतल्या बघीतल्या चेहर्याबद्दल जाणवले. हनुवटी एकदम पाश्च्यात्य वाटत आहे.
व्वा!!! छानच आवडल...
व्वा!!! छानच आवडल...
मस्त कलाकारी जमलीये superb
मस्त कलाकारी जमलीये superb
प्रयत्न बराच चांगला आहे.
प्रयत्न बराच चांगला आहे.
जपानी भाषेत हाराकिरी नावाचा
जपानी भाषेत हाराकिरी नावाचा शब्द आहे
ती जपानी स्त्री , हे चित्र पाहून हाराकिरी करेल!!
रंगीत चित्र म्हणून प्रयत्न चांगला आहे
Thanks to all for positive ,
Thanks to all for positive , negative reply
सुरेख.. माझ्याकडे असेच जपानी
सुरेख.. माझ्याकडे असेच जपानी स्त्रीचे स्केच आहे त्यामानाने हे चित्र फ़ारच छान काढलेयस! डोळे, मान ,हात, केस रचना अगदी बेस्टच
छान चित्र रेखाटले. रंगसंगती
छान चित्र रेखाटले. रंगसंगती मस्तच आहे. काही लोक विनाकारण चुका काढत असतात.त्यांना तेवढ तरी येत की नाही माहित नाही बुवा