Submitted by रीया on 2 January, 2013 - 01:04
एक लाडकासा मित्र माझा
माझ्यावर कविता कर म्हणायचा
नाही रे जमत म्हणल्यावर
चिडव चिडव चिडवायचा
इतकं का ते सोप्प आहे
तुच सांग राजा आता
मुर्तीमंत काव्यावरती
कशी रचावी मी कविता?
तुझी मैत्री, तुझी साथ
काय काय इथे मांडू ?
तुझं असणंच लाख मोलाचं
त्याला चार शब्दात कसं बांधू ?
आणि करावाचं म्हणला छोटासा प्रयत्न
तर उघडावी लागेल आठवांची कुपी
मग कदाचित तुझ्यावरली
कविता होईल सहज सोप्पी
पण मी म्हणते हवीच कशाला
इतकी सारी उठाठेव
तुझं असणं माझ्यासाठी,
माझ्यापुरतंच राखुन ठेव
आणि समजा तुझ्या वर्णना
ओवलेच मी शब्द जर
न जाणो तुझ्या अचानक
कविताच प्रेमात पडली तर?????
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शमा थँक्स निक्स धन्स मला
शमा थँक्स
निक्स धन्स
मला पुढच्या प्रतिक्रियेसाठी नेमकी कोणती स्मायली देऊ ते न कळल्याने दोन्ही देत आहे
हवी ती घे
आणि समजा तुझ्या वर्णना ओवलेच
आणि समजा तुझ्या वर्णना
ओवलेच मी शब्द जर
न जाणो तुझ्या अचानक
कविताच प्रेमात पडली तर?????
पण मी म्हणते हवीच कशाला इतकी
पण मी म्हणते हवीच कशाला
इतकी सारी उठाठेव
तुझं असणं माझ्यासाठी,
माझ्यापुरतंच राखुन ठेव>>>>>>
खुपच मस्त ओळी, कुछ हटके, आवडेश..
तुझं असणं
तुझं असणं माझ्यासाठी,
माझ्यापुरतंच राखुन ठेव>> मस्त ओळी!!
अजय सारू , बाग्स खुप सारे
अजय
सारू , बाग्स खुप सारे धन्स
तुझी मैत्री, तुझी साथ काय काय
तुझी मैत्री, तुझी साथ
काय काय इथे मांडू ?
तुझं असणंच लाख मोलाचं
त्याला चार शब्दात कसं बांधू ? >>>>>>>>.
सुंदर
नक्की प्रेमात नाही ना पडलीस
अप्रतिम कविता... सहज, सुंदर
अप्रतिम कविता... सहज, सुंदर आणि खुप प्रामाणिक.. !!!
प्रि त्याला पण इकडे घेवुन
प्रि त्याला पण इकडे घेवुन ये.. आम्हाला आवडेल त्याची स्पेशल प्रतिक्रिया वाचायला
मया सत्यजित धन्स मयू
मया
सत्यजित धन्स
मयू
आणि समजा तुझ्या वर्णना ओवलेच
आणि समजा तुझ्या वर्णना
ओवलेच मी शब्द जर
न जाणो तुझ्या अचानक
कविताच प्रेमात पडली तर????? >>> व्वा ... मस्तच.
छान कविता
छान कविता
Pages