Submitted by kaaryashaaLaa on 9 October, 2008 - 23:46
प्रार्थना माझी कधीही, एव्हढी फळलीच नाही!
फाटले आभाळ इतके, झोपडी उरलीच नाही!
भेकडांच्या घोळक्याने,ओळखावे ना मलाही,
ज्यांस माझी झुंज कसली? का? कधी कळलीच नाही!
दुःख घ्यावे का कुणाचे? का व्यथेचीही उधारी?
आसवे माझी मलाही, ढाळण्या पुरलीच नाही.
का तुझे इतके दिवाणे! आज हे कळले मलाही,
'एक जखमी!' ही अता तर, बातमी उरलीच नाही.
ऊठ, फिरुनी घाल तूही, घाव रे ताज्या दमाने,
आस जगण्याची अजूनी, का कशी सरलीच नाही!
हाय! थकवा काय वर्णू, जीवघेण्या यौवनाचा,
धुंदलो इतका तरीही, कामना मिटलीच नाही!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झुंज आणि
झुंज आणि व्यथा हे शेर आवडले.
गजल लिहिली
गजल लिहिली छान पण हा विषय खूप जुना .. हे असे दु:ख ह्यात फारसे वैविध्य नाही. त्यामुळे माझे ६ गुण.
छान गझल... ७
छान गझल...
७ गुण...
५ माझे.
५ माझे.
जखम छान
जखम छान आहे. बाकीचे ठीक. माझे ५
८ गुण
८ गुण
५
५ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
ठीक आहे.
ठीक आहे. माझ्या मते ५ गुण.
-सतीश
पहिला शेर
पहिला शेर छान आहे
४ गुण
का तुझे
का तुझे इतके दिवाणे! आज हे कळले मलाही,
'एक जखमी!' ही अता तर, बातमी उरलीच नाही.
सुंदर..
माझे गुण ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
दुसरा शेर
दुसरा शेर छान आहे.. माझे ४ गुण..
मतला छान
मतला छान आहे. बाकी शेर ठीक.
माझे - ५.
६ गुण
६ गुण
अवघड पण
अवघड पण चांगली. माझे ८
का तुझे
का तुझे इतके दिवाणे! आज हे कळले मलाही,
'एक जखमी!' ही अता तर, बातमी उरलीच नाही.
हा आवडला.
माझे ६
जखमी चा
जखमी चा शेर आवडला. अगदी बातमी सांगितल्यासारखा तो 'एक जखमी' सहज आलाय. तरीही त्यातली 'अता' ची सूट... सूट म्हणत नसावेत त्याला हल्ली
माझे ६
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
माझे ६ गुण
माझे ६ गुण
ठीक आहे. ५
ठीक आहे. ५ गुण.
छान माझे ७
छान माझे ७