मस्त लाल गाजरं - ५-६
लसूण पाकळ्या ५-६
मीठ चवीप्रमाणे
गूळ - चवीप्रमाणे
लिंबाचा रस - चवीप्रमाणे
केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून
फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर
मोहरी
हिंग
१. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं ! गाजरं जितकी बारीक आणि एकसारखी चिरल्या जातील तितकं लोणचं छान लागतं आणि दिसतं.
२. लसूण पाकळ्या सुद्धा बारीक चिरुन घ्या.
३. त्यात मीठ, लिंबाचा रस, गूळ आणि लोणच्याचा मसाला घालून मस्तपैकी मिसळायचं.
४. फोडणी तयार करुन त्यात मोहरी आणि हिंग घालून ते तेल गरमच ह्या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं.
एकदम रसरशीत गाजराचं लोणचं तय्यार
फोडणी घालायच्या आधी सगळं मिश्रण चमच्याने नाही तर हाताने कालवायचं. म्हणजे मस्त छान पाणी सुटतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लागतो.
ह्यात जर पातीचा लसूण मिळाला तर बेस्ट.
आपली नेहेमीची गाजरं मिळाली तर उत्तम पण केशरी गाजराचं लोणचं सुद्धा झकास लागतं.
गाजरं चिरायच्या ऐवजी किसायची मात्र नाही....मज्जा येत नाही !! थोडी मेहेनत करुन बारीक चिरुनच करायचं लोणचं
माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे.
अरे..पण फोटू कसा टाकायचा इथे ??
धन्यु रामी लसूण कच्चाच टाक.
धन्यु

रामी लसूण कच्चाच टाक. फोडणीत नको. मिळाला तर पातीचा लसूण घाल....मग आणखी छान लागतं आणि दिसतंही
आज केले...खूप आवडले
आज केले...खूप आवडले सगळ्याना...अत्यंत आभारी आहे .
(No subject)
मी करुन पाहिले. एक्दुम
मी करुन पाहिले. एक्दुम मस्त!!!
ध्न्अवाद!
यम्मी. खुपच टेम्प्टींग आहे.
यम्मी. खुपच टेम्प्टींग आहे.
जयवी: मी कधी कुठल्याही
जयवी:
मी कधी कुठल्याही प्रकरचं लोणचं घालेन ( घालण्याइत्पत) सुगरण होईन ) अस वाटलं नव्हतं..
ही सोपी रेसिपी बघून , घातलं...मस्त झालय..
धन्यवाद.
दुसरी बॅच संपत आलेय. एकदम
दुसरी बॅच संपत आलेय. एकदम हिट्ट झालय हे लोणचं. आता तिसर्या बॅचला पातीचा लसूण घालून बघेन. ह्यावेळी मी एका आवळ्याचे बारिक तुकडे पण घातले होते. तसही छानच लागतय.
मी पहिल्यावेळी २ मोठ्या गाजरांचं लोणचं केलेलं - जेमतेम ४-५ दिवस पुरलं. विकांत टू विकांत ताज लोणचं ते ही झटपट म्हणून लगेच दुसरी बॅच पण झाली. आता ते ही संपत आलय.
बिनू...कविन..... क्या बात
बिनू...कविन..... क्या बात है....
झालं, एकदम मस्त आणि
झालं, एकदम मस्त आणि रसरशीत!!
आता झालंय करून आणि अगदी फोटोतल्यासारखं दिसतंय त्यामुळे सांगायला हरकत नाही.. माझ्या सुगरणपणाबद्दल फाजिल विश्वास असल्यामुळे मी पहिल्यांदा हे केलं तेव्हा गूळच घालायला विसरले
मग वाट बघत बसले की फोडणी घातल्यावर रस सुटेल वगैरे. छे! काऽऽही नाही! मग लिंबू पिळलं, तरी ढिम्म! तोवरही आपलं काही चुकलं असेल वगैरे शक्यता लक्षातच नाही!! मग पार दुसर्या दिवशी ट्यूब पेटली. अर्थात, तेही मस्तच लागतं. पण ते 'रसरशीत' नाही होत, नुसतंच लोणचं ते!! काल न विसरता गूळ घातला आणि त्याला रस सुटायला लागला तेव्हा जीव भांड्यात पडला! 
सुगरणपणाबद्दल फाजिल
आईशप्पथ! कस्लं तोंपासू दिसतंय
आईशप्पथ! कस्लं तोंपासू दिसतंय लोण्च!! नक्की करून बघणार!
हा माझा झब्बू - सगळ्यांना खूप
हा माझा झब्बू - सगळ्यांना खूप आवडले - संपलेही......
आधीच फोटो काढला..

वाँव मस्तच
वाँव मस्तच
गाजराचं लोन्चं कसं काय होऊ
गाजराचं लोन्चं कसं काय होऊ शकतं बॉ. म्हणजे असू शकतं हेच मला अजून झेपलेलं नाही. आम्ही खेड्यातले लोक लोन्च म्हणलं की कैर्याचं लोन्चं, मिर्च्याचं लोन्च, इथपर्यंतच आमची मजल.
पण, हेबी करुन पाहू. हाय काय आन नाय काय.
-दिलीप बिरुटे
प्रोफेसर.......... अहो आहात
प्रोफेसर.......... अहो आहात कुठं...... आजकाल चिकन च्या लोणच्यापासून सुरवात होते
जयावी, आज हे लोणचं करून
जयावी, आज हे लोणचं करून पाहिलं. बेस्ट झालं. धन्यवाद!
Pages