मस्त लाल गाजरं - ५-६
लसूण पाकळ्या ५-६
मीठ चवीप्रमाणे
गूळ - चवीप्रमाणे
लिंबाचा रस - चवीप्रमाणे
केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून
फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर
मोहरी
हिंग
१. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं ! गाजरं जितकी बारीक आणि एकसारखी चिरल्या जातील तितकं लोणचं छान लागतं आणि दिसतं.
२. लसूण पाकळ्या सुद्धा बारीक चिरुन घ्या.
३. त्यात मीठ, लिंबाचा रस, गूळ आणि लोणच्याचा मसाला घालून मस्तपैकी मिसळायचं.
४. फोडणी तयार करुन त्यात मोहरी आणि हिंग घालून ते तेल गरमच ह्या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं.
एकदम रसरशीत गाजराचं लोणचं तय्यार
फोडणी घालायच्या आधी सगळं मिश्रण चमच्याने नाही तर हाताने कालवायचं. म्हणजे मस्त छान पाणी सुटतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लागतो.
ह्यात जर पातीचा लसूण मिळाला तर बेस्ट.
आपली नेहेमीची गाजरं मिळाली तर उत्तम पण केशरी गाजराचं लोणचं सुद्धा झकास लागतं.
गाजरं चिरायच्या ऐवजी किसायची मात्र नाही....मज्जा येत नाही !! थोडी मेहेनत करुन बारीक चिरुनच करायचं लोणचं
माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे.
अरे..पण फोटू कसा टाकायचा इथे ??
.... .....
.... .....
यम्मी वाटतय. करके देखा जायेगा
यम्मी वाटतय. करके देखा जायेगा
गेल्या वर्षी मी एका काकुंच्या घरी असं फ्लॉवरचं लोणचं खाल्लेलं प्रोसिजर सेम फक्त फ्लॉवर किसून घातलेला त्यांनी.
आईग! फोटो पाहून तोंपासु.
आईग! फोटो पाहून तोंपासु. गाजरं घरी आहेत, जमलं तर आजच करेन
एक्दम तोंपासु ताई जरा विपु
एक्दम तोंपासु
ताई जरा विपु पहा
गाजरं घरी आहेत, जमलं तर आजच करेन >> नशीब घरी आहेत.. नाहीतर सॅलड म्हणुन आणली असती तर ऑफिसमधेच केले असते
अरे काय लाळगाळु दिसतंय हे!!
अरे काय लाळगाळु दिसतंय हे!! खरंच रसरशीत अगदी
स्लर्रप स्लर्रप!!
स्लर्रप स्लर्रप!!
वर्षा...........धन्यु
वर्षा...........धन्यु गं......आता फोटू टाकता आला
मस्त. अगदी रसरशीत दिसतंय.
मस्त. अगदी रसरशीत दिसतंय.
मस्तच आज करायलाच पाहिजे. काही
मस्तच आज करायलाच पाहिजे. काही गाजरांच्या मधे सफेद कडक भाग जास्त असतो. तो पण घ्यायचा का?
आई ग! काय मस्त दिसत आहे गाजर
आई ग! काय मस्त दिसत आहे गाजर लोणचं
ट्टॉ! मस्त! तोंपासू!
ट्टॉ! मस्त! तोंपासू!
मस्त. मला वाटतं श्यामलीनेही
मस्त. मला वाटतं श्यामलीनेही सेम रेसिपी टाकली होती गाजराच्या लोणच्याची.
मस्त दिसतय लोणचं. सगळं
मस्त दिसतय लोणचं. सगळं साहित्य घरात असल्याने आजच करणार
काय मस्त दिसते आहे. अगदी
काय मस्त दिसते आहे. अगदी तोंपासु!!
लसुण्,लिंबू,लोणचे
लसुण्,लिंबू,लोणचे मसाला--व्वा..मस्त चटकदार लोणचे.
जयवी, एकदम खासच आहे हे लोणचे.
जयवी, एकदम खासच आहे हे लोणचे. ह्या पध्दतीने सध्या इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये मिळणार्या ताज्या हळदीचे केले तर टिकेल का?
तोंपासु!!!
तोंपासु!!!
वॉव! मस्त दिसतय एकदम.
वॉव! मस्त दिसतय एकदम.
मनापासून धन्यवाद लोक्स
मनापासून धन्यवाद लोक्स
सामी...... मधला भागही टाकला तरी चालेल.....सगळं छान लागतं
दीपा हे लोणचं फार टिकत नाही. फ्रिज मधे ठेवावं लागतं. पण खरं तर असं ठेवायची वेळंच येत नाही.....त्या आधीच संपतं हळदीचं टिकेल असं वाटतं.
खरंच रसरशीत तोपांसु
खरंच रसरशीत तोपांसु
मस्त दिसताहेत्.सोपी अन छानच
मस्त दिसताहेत्.सोपी अन छानच रेसिपी.
काल केले लोणचे! सगळ्यांना खूप
काल केले लोणचे! सगळ्यांना खूप आवडले. धन्यवाद.
मी ही काल केलं. रंग, चव मस्त.
मी ही काल केलं. रंग, चव मस्त. धन्स ग
(No subject)
काल घरी हे लोणचे करण्यात आले.
काल घरी हे लोणचे करण्यात आले. चव, रंग सारेच मस्त!
अरे वा.....
अरे वा.....
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स ट्ट्टक
लसूण कच्चाच ठेवायचा का? की
लसूण कच्चाच ठेवायचा का? की फोडणीत घालायचा?
सही दिसतय लोणचं. आजच करणार.
सही दिसतय लोणचं. आजच करणार. धन्यवाद जयश्री.
मागे श्यामलीनेही एक पाकृ टाकली होती तिची आठवण आली. फक्त त्यात लोणच्याचा मसाला नव्हता.
यम्म्म्मी
यम्म्म्मी
Pages