पुन्हा एकदा मागचीच विनंती, हलकेच घ्या !
****************
तो कधीतरी येणार होताच मला याची कल्पना होतीच. तसा तो आला, आगदी रात्री मस्त बटाटेवडे झोडून ताणुन झोपलेलो असताना आला. सभ्यपणे दरवाजावर टकटक करुन आला. त्याला बघताच मी त्याचे तोंडभर स्वागत करुन त्याच्या सोबत गच्चीत आलो.
" तुम्ही ब्रम्हरा़क्षस ना?" मी त्याला ओळखलेय हे पाहुन तो जरा चमकलाच
" हो, पण तुला कसे........... बरोबर आत्ता मला कळले की मला का हायर केले ते" तो म्हणाला.
" तुम्ही काय घेणार म्हणजे चहा, कॉफ़ी कोल्डींक्स वगैरे म्हणतोय मी जनरली तुम्ही रक्त वगैरे पीता असं ऐकलेय म्हणुन क्लियर करुन ठेवतोय" मी सुऱक्षीत अंतरावरुन चौकशी केली.
" अरे, माणसा तु मला घाबरायचे सोडून मला चहा कॉफ़ी कसली विचारतोयस?"
" आता घाबरायच काय त्याच्यात, भुतांसारखी भुतं तुम्ही. झपाटण्याशिवाय काय करणार?"
" अरे? मी घाबरण्यासारखा दिसत नाही का?"
" दिसताय खरे जरा वेगळे पण माणसांमधे तुमच्यापे़क्षा भयानक चेहरा असलेली माणसे आहेतच ना ! शिवाय तुमची शिंगही कुठे दिसत नाहीत ती?"
" शिंग माझ्या एका दोस्त भूताने उसनी नेलीत"
" उसनी ? का बरं ?"
" तुमचा तो आय.डी. आहे ना `टोणगा' म्हणुन त्याच्याकडे गेलाय तो जर वेळ पडलीच तर मारामारी करायला उपयोगी पडतील. त्याची साईन वाचलीय ना त्याने "
" अरेच्च्या म्हणजे आणखी आय.डी. कडे भूतं गेलीत का?"
" मग ! ठरलच होतं तसं"
" कोण कोण गेलय कुणा कुणाकडे?"
" माझी बहीण गेली होती ‘पियापेती’ कडे त्या जुळ्या बहीणींमधली मायबोलीवरची कोण हे न समजल्यामुळे वैतागुन परत आली"
"आणि कोण गेलं होतं"
" एक तरुण भूत पाठवलं होतं ‘शोनु’ कडे तर तिच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ वाचुन तिच्याच प्रेमात पडलं म्हणे, आता दोघे मिळून ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ चा पाचवा भाग लिहीतायत असं कळल"
"पुढे"?
"त्या ‘राज्या’ कडे गेलेल्या भूताचे हाल विचारु नको एकतर तो पुण्याच्या पत्त्यावर सापडे ना! आणि सापडला बंगळूरात, तर पुन्हा त्याने ऐकवलेल्या मराठी हींदी शायरीने आमच्या भूताच्या डोक्यावर परीणाम झाला तो आता मिर्जा गालिबच्या भूताच्या शोधात फ़िरतोय"
"आणि कुणी भेटले की नाही?"
" भेटला ना ‘कुलदीप ’भेटला पण त्याने भारतातील आणि परदेशातील भूतांची आर्थीक परीस्थीती या विषयावर परीषद घ्यायची कल्पना मांडली आणि आमच्या भूताला सभासद करुन घेतलाय ! ‘कौतुकशिरोधर’ या आय.डी. ने भूताला मी नक्की डावरा की उजवा असला काही भलताच प्रश्न विचारुन गोंधळात पाडलेय त्याचे सारखे फ़ोन येत असतात " गार्हाणं जोरात चालु होतं.
" अरे असा प्रयत्न तुम्ही आधीपण केला होतात ना?"
" हो, पण तेव्हाचे अनुभव ल़क्षात घेता यावेळी नव्या आय.डी. ना सुध्दा सामील करुन घेतलेय लिस्ट मधे नाहीतर ते जुने झाले की तुमच्या सारखेच तापदायक होणार"
" बरं आणखी कोणाकडे गेलात तुम्ही?"
" तो ‘यो_रॉक्स’ कदे गेलेल्याची अवस्था बघवत नाही तो बहुतेक नृत्यदिग्दर्शक असावा त्याच्या बरोबर नाचताना आमच्या भूताच्या हातापायांची हाडं एकमेकांत गुंतलीत ती सोडवायला चार भूतं पाठवलीत"
"आणि कुणी भेटले की नाही?"
" कसचं काय ‘देवनिनाद’ आय.डी. कडे जायला आधी कुणी तयार होईना नावात देव ना त्याच्या! गेला एक जण भितभीत तर त्याला त्याने एक नवकविता ऐकवली मग त्यावर प्रतिसाद मागितला परीणाम भलताच झाला ना ! आता ते भुत साधे साधे वाक्य पण प्रत्येक अ़क्षरापुढे पुरवण्या लावत बोलते रे "
"संपली का यादी?"
" नाही रे त्या ‘जागोमोहनप्यारे’ चा पण अनुभव वाईट आला तो आपला झपाटल्यासारखाच बोलतो, मागच्यावेळी बोबडे बोलत होता आता तोही नवकविता ऐकवतो तरी बरं, गेलेलं भूत शहाणं होतं ताबडतोब पळालं"
" अरे मागच्यावेळी तो डॉ. उमेशची नक्कल करत होता म्हणुन बोबड बोलत असेल त्या डॉ. उमेश कडे आधी नाही का जायच"
" गेलं होतं, एक भूत तिकडेपण गेलं होतं पण परत आल्यापास्न ते पन गोन्धललय दोक्तरान्नी त्याला बरेच विनोद ऐकवले म्हणे ते न कलल्याने त्याचि अशी अवस्था जालि आहे असं काहीतरी म्हणतय"
" तुमच्या बोलण्यावरुन ल़क्षात आलं माझ्या नक्की कसे विनोद असतील ते, पुढे काय मग?"
" त्या ‘साजिरा’ कडे गेलेल्याची तर्हा निराळी, त्याने जे कॉमेंट्स केले त्या भूतावर, तो नक्की आपली टींगल करतोय की कौतुक हे न कळल्याने तेही भ्रमिष्ट झालेय".
" ‘इंद्रधनुष्य’ कडे कुणी पाठवले होते की नाही?" मागच्यावेळीची आठवण होती मला.
" गेल्यावेळी पाठवले होते एक भूत तिकडे ते नीट काही सांगायला तयार नाही म्हणुन आता दुसरे पाठवले तर ते परत आले"
" काही न करताच?"
" काय करेल बिचारे तो तिकडे डोंगर दर्यातुन उधळत असतो त्याच्या पाठोपाठ जायचे तर त्या एरीयातली भूतं राडा करतील ना !" माणसाचा मुळ स्वभाव मेल्यावर पण जात नाही बहुतेक.
" आणि कोण राहीलं का?"
" त्या ‘प्रिंसेस’ कडे सरळ एक जोडी पाठवली भूत आणि हडळीची तर तिला वाटलं कुणी पाहूणे आलेत, तिने त्यांना चायनिज फ़्राईडराईस खायला घातला, तो चिकट गोळा झालेला फ़्राईडराईस खाल्याने दोघांचीही बोलती बंद झालीये, त्याच भीतीने मग ‘मंजुडी’ ,‘प्राची’, `मनुस्विनी, ‘दिनेशव्हीएस’ यांच्याकडे कुणी जायलाच तयार नाही"
"आहो पण दिनेशदा तर पुरुषमाणुस तो कशाला कुणाला नविन काही करुन खायला घालेल?"
" तुला काय वाटत? आमचे ल़क्ष नसते काय आजुबाजुला? हा आय.डी. पाककलेच्या बी.बी. वर जास्तवेळा सापडलेला आहे. आता विषाची परी़क्षा घ्या कशाला म्हणुन कुणी जात नाही तिकडे."
" आणि कुणी राहीलं असेल तर लवकर सांग उगीच सकाळ झाली तर तुमचेच जायचे वांधे होतील"
" गेल्यावेळी ‘मिल्या’ने विडंबन केल्याने विनोदी दिसणारे भूत ‘मृण्मयी' कडे पाठवत होतो. पण ते जायलाच तयार नाही कारण विचारले तर म्हणे, ती मला खाउन टाकेल"
" अरे ‘मृण्मयी’ तर शांत स्वभावाच्या आहेत नावातच दिसतय ना ! त्या कशाला खाउन टाकतील?"
" हेच, हेच मी त्याला विचारले तर त्याने त्या आय. डी. ची साईन दाखवली `बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी'. जरा भित्रेच झालेय ते भूत आजकाल. बरं लेखिका पी.एस. जी. कडे जा म्हणालो तर त्या म्हणे मला बरा म्हणतात "
"त्या कशा काय ?"
" त्यांची जुनी साईन नाही का? ` कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरा' "
"बापरे ! तुम्ही आणि शत्रु? बरं बाकी आय.डी. संपले का?"
" थांब त्या ‘झुळूक’ या आय.डी. ने काय केलेय कुणास ठाउक पण तिच्याकडे गेलेले भूत आता परप्रांतीय भूतांचा मुद्दा उपस्थीत करतय."
" अहो काहीतरी गैर समज असावा तसे नेहमी ‘जयमहाराष्ट्र’ आय.डी. म्हणत असतो. झुळूक चा काय संबंध त्याच्याशी?"
" वा ! म्हणे संबंध नाही, तो उत्तरप्रदेश/बिहार विरुध्द महाराष्ट्र बी. बी. कुणी चालु केला?" आयला, भरपुर वावर दिसत होता या लोकांचा मायबोलीवर.
"हे बघा आता पहाट होईल तुम्ही आपले निघा"
" अरे पण मी तुला घाबरवायला आलोय ना !"
" मला तुम्ही काय घाबरवता आता हे संभाषण असेच्या असे लिहीणार मी मायबोलीवर तेंव्हा काय घाबरवायचे आणि कुणाला ते मायबोलीकर बघुन घेतील."
" अरे पण......."
"आता निघा नाहीतर दोनचार भयकथा ऐकवीन आणि मग त्यांचा शेंडा बुडखा शोधण्यात वेड लागेल तुम्हाला त्याने नाही भागले तर नंदीनीची `मोरपिसे' शोधायला लावेन"
मी इतके बोलायचा अवकाश तो ब्रम्हरा़क्षस असा काही गायब झाला म्हणताय की विचारुन सोय नाही जाताना काहीतरी खविस.. खविस असे बडबडत होता खरे. पण एक गोष्ट नक्की मायबोलीवर भूतांचा वावर वाढला असावा.
मागच्या
मागच्या वेळे सारखच मस्त रे

भूत झाली , ब्रम्ह राक्षस झाला आता त्रस्त समंध उरलाय रे
असली कसली
असली कसली भुतं ही?? भित्री?? हॅट्!!
मजा आली रे!
मजा आली रे! अजून येऊन देत!

*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी चालेल्..पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
चाफ्फ्या
चाफ्फ्या मस्तच रे

repeat झालयं >>>>"आणि कुणी भेटले की नाही?"
दिसलीस तू...फुलले ॠतू..................
(No subject)
हातापायां
हातापायांची हाडं एकमेकांत गुंतलीत ती सोडवायला चार भूतं पाठवलीत
तो नक्की आपली टींगल करतोय की कौतुक हे न कळल्याने तेही भ्रमिष्ट झालेय
त्या एरीयातली भूतं राडा करतील ना >>>>>
छान नवकथा
छान नवकथा आहे. प्रत्येक नवगोष्टीचं खरं तर मला फार कौतूक वाटतं. हे असं 'नव' सगळ्यांना जमत नाही.

नवकथेच्या दिंडीमध्ये चाफा सगळ्यांत पुढे नवटाळ घेऊन नवभजने गाताहेत असं नवचित्र मला दिसतं आहे. सुखद चित्र.
पण ते टिंगल म्हणजे काय असते रे? नवटिंगल असा काही नवप्रकार आहे का??
--
ग्रेट रे चाफ्फ्याभौ..
--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!
मस्त.
मस्त. हवाहवाईच्या कुजबुजची आठवण झाली.
(No subject)
आवडल.
आवडल.
मस्तच रे
मस्तच रे चाफ्फ्या.
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
****************
****************
मस्त!
मस्त!
कुजबुजचीही आठवण झाली खरी!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
चाफ्या
चाफ्या धन्य आहेस...................
‘कौतुकशिर
‘कौतुकशिरोधर’
चाफ्या 'कौतुक शिरोडकर' असं आहे रे ते. पण हे शिरोधर ही आवडलं. लवकरच तुलाही घाबरवतो बघ मी.
नाही रे
नाही रे त्या ‘जागोमोहनप्यारे’ चा पण अनुभव वाईट आला तो आपला झपाटल्यासारखाच बोलतो, मागच्यावेळी बोबडे बोलत होता आता तोही नवकविता ऐकवतो तरी बरं, गेलेलं भूत शहाणं होतं ताबडतोब पळालं"
" अरे मागच्यावेळी तो डॉ. उमेशची नक्कल करत होता म्हणुन बोबड बोलत असेल त्या डॉ. उमेश कडे आधी नाही का जायच"
............
जळलं मेलं
जळलं मेलं ते भूत माझ्याकडे आलंच नाही. त्याच्यासाठी छान भेळ करून ठेवली होती, 'एक बार खायेगा तो बार बार आयेगा' अश्शी फस्क्लास भेळ झाली होती. तुला खोटंच सांगितलं त्या ब्रम्हराक्षसाने....
मस्त--- मजा
मस्त--- मजा आली.
------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
चाफ्फ्या,
चाफ्फ्या, हा ही भाग मस्त आहे
हे हे.. आता
हे हे.. आता दरवेळी फ्राइडराइस खाताना तुझी आठवण येईल बघ.:)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चम्हांलातु चगतोसां चमी चकए चष्टगो...:)
अरे चाफा
अरे चाफा मी तुझ्या बहुतेक कथा वाचल्या पन आज खुप मनापासुन हसावेसे वाट्ते. मी फक्त एक प्रेक्षक आहे. लिखान जमत नाही म्हणुन फक्त वाचन करते.
तुझी पंखा.
पुन्हा
पुन्हा एकदा मनापासुन धन्यवाद ! खरतरं भाग २ साठी अनेक मंडळींनी आग्रह केला त्यामुळे लिहील्या गेला.
आणि मी वाट पहातोय घाबरायची.
) नाही रे !
कौतुक, अरे ते आडनावाचं माझ्या उशीरा लक्षात आलं पण आणखी एक मोठी चुक होती ती निस्तरताना ते राहून गेल पण एकंदरीत कौतुकशिरोधर हा ID मस्त वाटतो.
>>>>>>>>कुजबुजचीही आठवण झाली खरी!
लिंब्या त्यात इश्यु असायचे रे! मी इतका सर्वदर्शी ( सर्वभक्षी सारखं
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
चाफ्या,
चाफ्या, छान जमून आलय.
मस्त
मस्त जम्या!
"ये" म्हणावं! नाही खायची मी!! डाएटवर आहे सध्या!

..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!!
मृण
मृण
चाफ्फ्या, न
चाफ्फ्या,
नेहमीप्रमाणेच, सुप्परहिट्ट्..
अरे भुत
अरे भुत माझ्याकडे यायला विसरल वाटत.
चाफ्फ्या
चाफ्फ्या मस्त रे
आज वाचले
आज वाचले हे. मजा आली. देवनिनाद मस्त

'त्या
'त्या ‘प्रिंसेस’ कडे सरळ एक जोडी पाठवली भूत आणि हडळीची तर तिला वाटलं कुणी पाहूणे आलेत, तिने त्यांना चायनिज फ़्राईडराईस खायला घातला, तो चिकट गोळा झालेला फ़्राईडराईस खाल्याने दोघांचीही बोलती बंद झालीये' - ह. ह. पु. वा.
चफ्फ्या, सहीच आहे कथा. मी आधीचा भाग ह्या भागा नंतर वाचला. तो पण आवडला. आय-डी या मस्तच आहे.
भूतांना अगदी हैराण केलय मा.बो. करांनी... म्हशींना घाबरून बहुतेक माझ्याकडे भूत पाठवायचा विचार रद्द केला असावा....
Pages