श्रीगणेशा - विजयादशमीच्या शुभेच्छा!!
नमस्कार,
सगळ्यांचे या रंगीबेरंगीच्या पानावर स्वागत आहे.
मायबोलीच्या गणेशोत्सवात यंदा हातभार लावल्याबद्दल मायबोलीने प्रेमाने ही रंगीबेरंगीची भेट देवुन सुखद धक्का दिला :).
दसर्याच्या शुभमुहूर्तावर श्रीगणेशा करतेय. शाळेत असतांना नवीन पाटी किंवा नवीन वही आणली की खूप वेळ नुसता तिला निरखण्यात जायचा, मग विचार करुन सुवाच्य अक्षरात काही तरी छान लिहुयात असे मी ठरवायचे. ते छान म्हणजे नक्की काय ते मला कधीच सुचले नाही. मग मी पाटी/वही घेवुन तशीच विचार करत बसुन रहायचे तसेच आत्ता पण होतय म्हणुन मग नुसताच श्रीगणेशा.
मायबोलीवर माझा आत्तापर्यंत लिखाणातला सहभाग म्हणजे इतरांच्या लेखनाला प्रतिसाद देणे आणि वाहत्या बीबींवर जावुन टवाळक्या करणे इतका मर्यादीत होता. आता इथे (वाचणीय) लिहीण्याची जबाबदारी खांद्यावर आलीये ती पेलवेल ही अपेक्षा.
सर्व मायबोलीकरांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वतःच्या
स्वतःच्या रंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन!
विजयादशमीच्या खूप सार्या शुभेच्छाही.
लिहा आता पटपट... आहोतच आम्ही वाचायला..
ओह... म्हणजे
ओह... म्हणजे 'रंगीबेरंगी' हे मायबोलीकडून मिळते.... मला हे माहितीच नव्हतं...
विजयादशमीच्या आणि पुढील लिखाणासाठी तुम्हाला शुभेच्छा!
अरे आ
अरे आ केलीस वाटतं सुरुवात..
तूला पण दसर्याच्या शुभेच्छा.
रुनि,
रुनि, अभिनंदन आणि दसर्याच्या शुभेच्छा
अभिनंदन! दस
अभिनंदन!
दसर्याच्या तुला आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
रूपाली अभि
रूपाली
अभिनंदन आणि दसर्याच्या शुभेच्छा! लिहीत रहा!
अभिनंदन
अभिनंदन आणि दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
अभिनंदन!!! आ
अभिनंदन!!!
आता ल्याहायला कधी घेणार?.
.............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!!
अभिनंदन
अभिनंदन आणि दसर्याच्या शुभेच्छा रूनी! 'सरस्वती' मस्त आली आहे!
रुनी....
रुनी.... रंगेबिरंगी पानाबद्दल अभिनंदन!
आणि लिखाणासाठी शुभेच्छा!
रुनि,
रुनि,
अभिनंदन आणि विजयादशमीच्या शुभेछ्छा! सुरुवात तर चांगलि झालिये पण इथे सारख काहितरि दिसायला किंवा वाचयला हव आहे आम्हाला :).