ही सुरांची बिल्वपत्रे
वाहतो मी भक्तिभावे
दे मला सामर्थ्य ऐसे
वेदनेचे गीत व्हावे..
भैरवीच्या सुरांनी या सुंदर मैफलीची सांगता झाली आणि अवघे सभागृह भारुन गेले..
निमित्त होते फाईन आर्ट्स सोसायटी चेंबूर येथील हिंदुस्थानी संगितोत्सवाचे...
पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने काल दिनांक २१ डिसेंबर संध्याकाळी सुरुवात झाली. राग शुद्ध कल्याण ने मैफिलीची सुरुवात झाली. आपल्या सुश्राव्य गायनाने पं संजीवजींनी समस्त श्रोतुवर्गाची मने केव्हांच जिंकली.
राग चंद्रकंस मधिल बंदिश.., मेघ मल्हार मधील मीरा भजन.., रामदास स्वामींचे एक गोड भजन आणि शेवटी
पुण्याच्या संगिता जोशी रचित आणि केदार पंदित यांनी संगीत दिलेले..
ही सूराची बिल्वपत्रे.. हे अतिशय सुंदर भक्तिभावगीत पंडितजींनी सादर केले..
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे..
शनिवार २२ डिसेंबर.. पं. सतीश व्यास... संतूर
रविवार २३ डिसेंबर.. श्री चिराग कट्टी..सतार वादन
सोमवार २४ डिसेंबर..श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे...गायन
बुधवारी २६ डिसेंबर..श्रीमती धनश्री पंडित राय गायन..
गुरुवारी २७ डिसेंबर श्रीमती देवकी पंडित..गायन
शनिवार २९ डिसेंबर पं अजय पोहनकर..गायन
असे कार्यक्रम आहेत.
स्थळ शिवस्वामी ऑडिटोरीयम, चेंबूर
संपर्कः फाईन आर्ट्सः २५२२२९८८
सर्वांना हार्दिक आमंत्रण
इथे
इथे नोंदवा
http://www.maayboli.com/node/22439
धन्यवाद भरतजी.. धागा मला
धन्यवाद भरतजी.. धागा मला सापडला नव्हता सकाळी.. आता तिथे ही माहिती डकवली आहे.