फ्लॉवरची 'सा. खि.' भाजी

Submitted by नीधप on 21 December, 2012 - 04:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक फ्लॉवर
एक छोटा बटाटा (ऑप्शनल आहे)
तूप (फोडणीसाठी) - २ छोटे चमचे किंवा फ्लॉवरच्या क्वांटिटिप्रमाणे
जिरे, हिरवी मिरची, मीठ, लिंबू
दाण्याचे कूट
किंचित साखर
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवर व्यवस्थित बघून मग बारीक चिरून, धुवून घेणे.
साखर, मीठ, लिंबू आणि दाण्याचे कूट याच वेळेला फ्लॉवरमधे मिक्स करायला हरकत नाही.

बटाट्याच्या पातळ काचर्‍या करून घेणे.
कढईत तूप घेणे, वितळवणे
फोडणीत जिरे, तडतडल्यावर हिरवी मिरची घालणे
त्यात बटाट्याच्या काचर्‍या परतून किंचित वाफ.
काचर्‍या शिजल्या की बारीक चिरलेला फ्लॉवर (साखर, मीठ, दा कू आणि लिंबू मिश्रीत) कढईत घालणे. परतणे.
साखर, मीठ, दा कू आणि लिंबू हे आधी घातले नसल्यास आता घालणे.
मिक्स करणे, परतणे, फ्लॉवर शिजेपर्यंत एक वाफ काढणे...

भाजी तय्यार!
वरून सढळ हाताने बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवणे

वाढणी/प्रमाण: 
साधारण २ माणसांसाठी दोन भाजी पोर्शन्स प्रत्येकी.
अधिक टिपा: 

ज्या मुलांना फ्लॉवरच्या नेहमीच्या भाजीचा वास आवडत नाही ती मुले ही भाजी मिटक्या मारत खातील.
डब्यात देण्यासाठी, पोळीभाजीचा रोल करून देण्यासाठी म्हणून एकदम उत्तम भाजी.
ही भाजी दह्याबरोबर अप्रतिम लागते.
पोळीबरोबरच खायची गरज नाही. नुसती प्लेटमधे साबुदाणा खिचडीसारखी घेऊन वरून घट्ट दह्याची कवडी आणि उपासाचे लिंबू लोणचे... अहाहा स्वर्ग!!

माहितीचा स्रोत: 
माझ्या आईची रेसिपी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळी कृती छान आहे. दुसरी महाबोअरिंग भाजी कोबी वापरून पण असे काही करता येते का ते बघायला हवे.

कोबीच्या वासावर पचडी हा कमी त्रासदायक उपाय सोडला तर मला तरी अजून दिसलेला नाही. सापडल्यास प्लीज प्लीज शेअर कर. Happy

नीरजा...आत्ता माझ्याकडे साखि कोबीची भाजी तयार आहे. चक्क चांगली वगैरे लागतीये. तुला नोबेल्/मॅगसेसे/भारतरत्न वगैरे काहीतरी द्यायला हवे. बारामहीने तेराकाळ दिसली की नकोश्या वाटणार्‍या कोबीच्या भाजीला खाणेबल बनवण्याबद्दल Happy असेच कोणीतरी दुधीचे पुनर्वसन करा आता.

तुला नोबेल्/मॅगसेसे/भारतरत्न वगैरे काहीतरी द्यायला हवे. <<
माझ्या मातेला. ही तिची रेसिपी आहे.

दुधीचे पुनर्वसन नको भिजवलेली ह डाळ, जोरदार आलं आणि गोडा मसाला घालून धम्माल लागते.

मस्त! मलाही सा.खि.म्हणजे काय हा बाळबोध प्रश्न पडला होता पण माधुरीने उत्तर दिले!
नीधप तू नंतर नावचे कारण दिल्याने पूर्णच शंका मिटली Happy

हाय नीधप, एक अप्रतिम रेसीपी शेअर केल्याबद्दल धन्स.
फ्लॉवर नसल्याने मी शिमला मिरचीची अशी भाजी केली क्लासी झाली.. एकदम तोंपासू
पुन्हा एकदा धन्स.. Happy

आजच्या डब्यासाठी अशीच केली होती. छान लागते. फ्लॉवरची व्हरायटी म्हणून आवडली. टिपीकल फ्लॉवरचा वास अजिबात येत नाही भाजीला. फ्लॉवर (भाजीकरता) फारसा आवडीचा नसलेल्या माझ्यासारखीला बेस्ट ऑप्शन मिळालं Happy

नेक्स्ट टाइम डब्यात या भाजीबरोबर जमलं तर का ची को/ ख का घेऊन जा. थोडीशी मिक्स कर भाजीत.
अजून भारी लागेल Happy

मी केली या पद्धतीने आज. नुसती खायलाच चांगली आहे असे वाटले.
पोळी बरोबर फार नाही आवडली. पण एकुण हा तोच फ्लॉवर आहे का असा प्रश्न पडला Happy

साबुदाणा खिचडी कुकर मध्ये पण मस्त होते… जास्त लोकांसाठी करायचा असे तर हमखास कुकरचा वापर करावा आणि सोफ्ट-टेस्टी खिचडीचा आस्वाद घ्यावा

ही भाजी मस्त झाली. नेहमी 'कर,, करू, करेन' चालायच, काल केली. पोळी केली होती बरोबर पण नुसती भाजीच खाल्ली गेली Happy आता आज फोडणीची पोळी.

ओह वॉव... उन्हाळ्यात पोळी भात खायला किती कंटाळा येतो तेंव्हा ही भाजी मस्त लागेल नुस्तीच खायला..

कॉलीफ्लॉवर नॉत वेरी फेव.. पण आता अशी बनवेन लौकरच..

थांकु नी.. Happy

Pages