फ्लॉवरची 'सा. खि.' भाजी

Submitted by नीधप on 21 December, 2012 - 04:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक फ्लॉवर
एक छोटा बटाटा (ऑप्शनल आहे)
तूप (फोडणीसाठी) - २ छोटे चमचे किंवा फ्लॉवरच्या क्वांटिटिप्रमाणे
जिरे, हिरवी मिरची, मीठ, लिंबू
दाण्याचे कूट
किंचित साखर
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवर व्यवस्थित बघून मग बारीक चिरून, धुवून घेणे.
साखर, मीठ, लिंबू आणि दाण्याचे कूट याच वेळेला फ्लॉवरमधे मिक्स करायला हरकत नाही.

बटाट्याच्या पातळ काचर्‍या करून घेणे.
कढईत तूप घेणे, वितळवणे
फोडणीत जिरे, तडतडल्यावर हिरवी मिरची घालणे
त्यात बटाट्याच्या काचर्‍या परतून किंचित वाफ.
काचर्‍या शिजल्या की बारीक चिरलेला फ्लॉवर (साखर, मीठ, दा कू आणि लिंबू मिश्रीत) कढईत घालणे. परतणे.
साखर, मीठ, दा कू आणि लिंबू हे आधी घातले नसल्यास आता घालणे.
मिक्स करणे, परतणे, फ्लॉवर शिजेपर्यंत एक वाफ काढणे...

भाजी तय्यार!
वरून सढळ हाताने बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवणे

वाढणी/प्रमाण: 
साधारण २ माणसांसाठी दोन भाजी पोर्शन्स प्रत्येकी.
अधिक टिपा: 

ज्या मुलांना फ्लॉवरच्या नेहमीच्या भाजीचा वास आवडत नाही ती मुले ही भाजी मिटक्या मारत खातील.
डब्यात देण्यासाठी, पोळीभाजीचा रोल करून देण्यासाठी म्हणून एकदम उत्तम भाजी.
ही भाजी दह्याबरोबर अप्रतिम लागते.
पोळीबरोबरच खायची गरज नाही. नुसती प्लेटमधे साबुदाणा खिचडीसारखी घेऊन वरून घट्ट दह्याची कवडी आणि उपासाचे लिंबू लोणचे... अहाहा स्वर्ग!!

माहितीचा स्रोत: 
माझ्या आईची रेसिपी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!

<<पोळीबरोबरच खायची गरज नाही. नुसती प्लेटमधे साबुदाणा खिचडीसारखी घेऊन वरून घट्ट दह्याची कवडी आणि उपासाचे लिंबू लोणचे... अहाहा स्वर्ग!!<<
हे आवडलं आपल्याला.:) उद्याच करुन बघते.

फ्लॉवर जाडसर किसला तर आणखी छान ! <<<
जनरली फ्लॉवरला माती असते ना अडकलेली. त्यामुळे बारीक चिरून धुवून घेतलेले बरे पडते. किसल्यावर धुता येणे जरा अवघड. आणि किसताना रस निघून जातो वस्तूचा असं वाटतं मला.

आता स्कोअर २/७ <<
Happy

येस्स दाणकुटाचा रंग आणि मधून मधून पांढरी.

आमच्या स्वैपाकाच्या बाई दरवेळेला चुकून यात कढीपत्ता घालतात आणि पाणी घालून मेणचट शिजवतात. एकदम अ-प्रेक्षणीय दिसते. आता मी करेन तेव्हा फोटो टाकेन.

तो वास जाणवत पण नाही बिलकुल.
कल्पना, कृतीचे सगळे श्रेय माझ्या आईला (किंवा तिच्या आईला)
माझ्या घरी फ्लॉवरची भाजी अशीच असायची आणि आताही अशीच असते Happy

अरे वा, छान आहे. करण्यात येईल Happy
रस्सा असेल तर गोष्ट वेगळी नाहीतर फ्लॉवरची परतून भाजी नुसत्या तेलावर परतूनच छान लागते ( पाणी अजिबात न घालता ) मी फ्लॉवर-बटाटा-मटार परतून करते. फोडणी, थोडा किचन किंग मसाला आणि भरपूर कोथिंबीर अशी. ती आम्हा तिघांनाही खूपच आवडते.

मस्त कृती.
रच्याकने सा.खि. अव्हनमध्ये खूप सोपी अन छान होते, हमखास आवडते सर्वांना , कढईत खूप परतत रहाण्याचे कष्ट वाचतात.

नीधप, मस्त असेल चव या भाजीची. साखि खूप प्रिय आहे. त्यामुळे हा प्रयोग आवडेल असे वाटते.

रच्याकने, मा. वे. सा. खि. ची ही रेस्पी नेहमी हिट्ट होते. साबुदाणा नीट भिजवणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे.
http://onehotstove.blogspot.com/2007/09/microwave-sabudana-khichdi.html

<< पाणी घालून मेणचट शिजवतात >> आधीच फ्लॉवर, त्यात पाणी ! Wink
फ्लॉवरच्या वासावर उपाय म्हणून मीं बारीक चिरून थोडं आलं घालतों. आतां वरील रेसिपी करून पहातो. [ गैरसमज नको; बायकोची नजर चुकवून किचनमधे मी अशी कधीमधी लुडबूड करतो. Wink ]

Pages