Submitted by सत्यजित on 18 December, 2012 - 22:36
अजुनही आपसूक वळते
नजर त्या खिडकी पाशी
फरक इतकाच की
आता प्रश्न पडतात
तेंव्हा वादळं उठायची
आता नकोशी उत्तरं असलेले
नको ते प्रश्न
तेंव्हा हवीहवीशी असणारी
नको ती वादळं...
तशी खिडकी सामान्यच
पण ह्या खिडकीत, "भुरळ" होती
पाडगावकरांच्या कवितेतला बकूळ होता
नाधोंच्या कवितांतला पाऊस होता
बोरकरांच्या कवितांतला 'पहिला' रोमांस होता
ग्रेसांच्या कवितांतली हुरहुर होती
त्या पलिकडे जाऊन
शब्दां शिवाय मनात रेंगाळत
रहाणारी 'एक' कविता होती
काही गोष्टी सवयीने
किती सवयीच्या होतात
तर काही गोष्टी
सवयी लावून जातात
मी इतकी वर्ष बघतो आहे
त्या खिडकी कडे
पण कधीच थांबलो नाही
पण...काल अचानक मनात विचार आला
की खिडकीतुनही कोणी बघत असेल का
इतकी वर्ष...? मी थांबायची वाट पहातं...
मगाशी म्हंटलं ना..
नकोशी उत्तरं असलेले... नको ते प्रश्न
-सत्यजित.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आवडली..
आवडली..
पण...काल अचानक मनात विचार
पण...काल अचानक मनात विचार आला
की खिडकीतुनही कोणी बघत असेल का
इतकी वर्ष...? मी थांबायची वाट पहातं...<<< वा वा! अतिशय सुंदर पद्धतीने या प्रश्नापर्यंत आणते कविता.
धन्यवाद!
शब्दां शिवाय मनात
शब्दां शिवाय मनात रेंगाळत
रहाणारी 'एक' कविता होती>>>क्या बात है सत्याभाय! मस्त वाटल सकाळी सकाळी ही कविता वाचून
सुरेखच.
सुरेखच.
व्वा वा व्व्वा! सत्यजित, मस्त
व्वा वा व्व्वा!
सत्यजित, मस्त जमली आहे..
मैफलीमध्ये वाचनासाठी उत्तम आहे ही
मस्तच रचना मला माझ्या कवितेची
मस्तच रचना
मला माझ्या कवितेची आठवण झाली
http://www.maayboli.com/node/28428
आता नकोशी उत्तरं असलेले नको
आता नकोशी उत्तरं असलेले
नको ते प्रश्न
तेंव्हा हवीहवीशी असणारी
नको ती वादळं... >> ह्म्म!
आख्खी आवडली.
धन्यवाद!
धन्यवाद!
खूप आवडली. काही गोष्टी
खूप आवडली.
काही गोष्टी सवयीने
किती सवयीच्या होतात
तर काही गोष्टी
सवयी लावून जातात >>> मस्त!
मस्त रे... रेंगाळणही सापडत
मस्त रे... रेंगाळणही सापडत नाही खिडकिही वेगळ्याच वाटे कडे तोंड कऋन बसते... पाउस असला तर ' साला अजुन विसेक मिनिटे उशिर' चा वायपर मनाच्या (?) काचेवर हलायला लागतो ...
सत्यजीत.. <<की खिडकीतुनही
सत्यजीत..
<<की खिडकीतुनही कोणी बघत असेल का>>
माझ्यासाठी कविता इथेच संपली...
अत्यंत सुरेख.
अतिशय सुंदर कविता ! आख्खी
अतिशय सुंदर कविता ! आख्खी आवडली पण शेवट कमालच.
मस्त
मस्त
शुगोल, जय, शलाका, कविन मनीमाऊ
शुगोल, जय, शलाका, कविन मनीमाऊ खुप आभार...