प्रवेशिका - २८ ( mi_abhijeet - ती केवळ सोबत होती... )

Submitted by kaaryashaaLaa on 8 October, 2008 - 00:11


ती केवळ सोबत होती , सहवास म्हणालो नाही
गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही

तू वागलीस तो सारा व्यवहार जगाचा होता
अपराध कधीही माझा केलास म्हणालो नाही

राखेत निखार्‍यासम मी, धग आहे अजून बाकी
तव हाती आहे जगणे, वार्‍यास म्हणालो नाही

ऐकतो इथे भरलेला आहे बाजार व्यथेचा
मी विकेन तरिही माझ्या दुःखास म्हणालो नाही

खांद्यावर या विश्वाच्या परिघास कसे पेलू मी ?
ज्या रेषेवरती जगलो तिज व्यास म्हणालो नाही

श्वासांच्या घेउन कुबड्या आहेत जिवंतच सारे
मी जीवन ऐसे नुसत्या जगण्यास म्हणालो नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! आवडली!

भले! अख्खी आवडली.
माझे ८
-----------------------------------------------------
फिर मुझे दीद-ए तर याद आया
दिल, जिगर तश्न-ए फरियाद आया

वा! वारा आणि व्यास शेर विशेष!!
माझे - ७.

शेवटचे दोन अगदी जबरदस्त!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

पूर्णच गजल आवडली.. मस्तच! छानच झालीये.
अपराध.. विशेष आवडला!

वा उस्ताद वा.. शेवटचे दोन शेर तर कातिल एकदम ...

मस्त!
सगळेच शेर आवडले. त्यातही मतला आणि 'निखारा' हे विशेषच!
शेवटच्या शेरात 'जिवंतच' मधला 'च' जरासा टोचला, म्हणून माझ्या मते ८ गुण.
-सतीश

खूपच मस्त...!!
सगळेच शेर आवडले Happy

लय भारी.
माझे ८ गुण!

क्या बात है?? अप्रतिम.. प्रत्येक शेर जमलाय..

राखेत निखार्‍यासम मी, धग आहे अजून बाकी
तव हाती आहे जगणे, वार्‍यास म्हणालो नाही

व्वा ! क्या जिगर है.. माझे ९ गुण..

'निखारा...' जबरी आहे.
७ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

आहा! एकदम यो! गझल Happy
खंदे फलंदाज उतरलेले दिसतायत.

मतला जबरदस्त....
अपराध, व्यास हे ही आवडले...
माझे गुण ७
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

वा! पहिला शेर फार आवडला, गझल आवडली.

छान आहे.
माझे ७

सुंदर गझल

७ गुण

तिसरा आणी शेवटचा शेर अतिशय सुंदर...माझे ७ गुण