बालुशाही (फोटोसह)

Submitted by madevi on 17 December, 2012 - 07:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मेदा -१ वाटी
सोडा बाय कार्ब -१/२ छोटा चहाचा चमचा.
दही - २ चमचे
ऑलीव्ह ऑईल - २ चमचे + तळण्यासाठी
एकतारी पाक

क्रमवार पाककृती: 

प्रथम मेदा, सोडा,ऑ ऑ,दही एकत्र करुन घ्या.लागेल तस थोडं थोडं कोमट पाणी घाला आणि जास्त मळून न घेता तसेच ३० मिनीटं झाकुन ठेवा.
अर्ध्या तासानंतर जास्त न मळता थोडे मळून एकसारखे करुन घ्यावे.पेढ्यासारखा आकार देऊन मध्यभागी थोडा दाब द्यावा.
अश्या सगळ्या बालुशाही करुन घ्या.मंद आचेवर ऑ ऑ मध्ये तळुन घ्या.
बालुशाही थंड झाल्यावर पाकात सोडाव्यात ३० मिनीटं ठेवाव्यात. पाकातुन काढ्ल्यावर त्याच्यावरचा पाक सुकल्यावर त्यावर पिस्त्याचे काप घालुन सजवावे

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांना पुरतील.एवढ्या प्रमाणात सहा ते सात बालुशाही होतात्.
अधिक टिपा: 

संजीव कपुरच्या रेसीपीज बहुतेक ऑ ऑ च्या असतात आणि मी पण रोजचा स्वयंपाक ऑ ऑ तच करते म्हणुन मी ऑ ऑ वापरले.

माहितीचा स्रोत: 
थोडी संजीव कपुरच्या रेसीपीवरुन आणि थोडे माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पाकृ.. पण बालुशाही थंड झाल्यावर त्यात पाक आतपर्यंत मुरतो का?

बाकी ते...
संजीव कपुरच्या रेसीपीज बहुतेक ऑ ऑ च्या असतात आणि मी पण रोजचा स्वयंपाक ऑ ऑ तच करते म्हणुन मी ऑ ऑ वापरले.>> हे वाक्य त्या ऑ ऑ मुळे वाचायला मजेशीर वाटतेय! Happy

बालुशाही गरम असताना पाकात घातली तर त्यात पाक मुरतो.दुसर्‍या तळुन झालेल्या पाकात घातल्या कि आधीच्या निठळुन बाहेर काढायच्या.तळण्यात "मेख "असते..

निर्जरा,ऑऑ कुठले वापरायचे?सध्या टि.व्हीवर ३ प्रकारच्या बाटल्यांची जाहिरात दाखवतात म्हणून विचारतेय.