Submitted by madevi on 17 December, 2012 - 07:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
मेदा -१ वाटी
सोडा बाय कार्ब -१/२ छोटा चहाचा चमचा.
दही - २ चमचे
ऑलीव्ह ऑईल - २ चमचे + तळण्यासाठी
एकतारी पाक
क्रमवार पाककृती:
प्रथम मेदा, सोडा,ऑ ऑ,दही एकत्र करुन घ्या.लागेल तस थोडं थोडं कोमट पाणी घाला आणि जास्त मळून न घेता तसेच ३० मिनीटं झाकुन ठेवा.
अर्ध्या तासानंतर जास्त न मळता थोडे मळून एकसारखे करुन घ्यावे.पेढ्यासारखा आकार देऊन मध्यभागी थोडा दाब द्यावा.
अश्या सगळ्या बालुशाही करुन घ्या.मंद आचेवर ऑ ऑ मध्ये तळुन घ्या.
बालुशाही थंड झाल्यावर पाकात सोडाव्यात ३० मिनीटं ठेवाव्यात. पाकातुन काढ्ल्यावर त्याच्यावरचा पाक सुकल्यावर त्यावर पिस्त्याचे काप घालुन सजवावे
वाढणी/प्रमाण:
तीन जणांना पुरतील.एवढ्या प्रमाणात सहा ते सात बालुशाही होतात्.
अधिक टिपा:
संजीव कपुरच्या रेसीपीज बहुतेक ऑ ऑ च्या असतात आणि मी पण रोजचा स्वयंपाक ऑ ऑ तच करते म्हणुन मी ऑ ऑ वापरले.
माहितीचा स्रोत:
थोडी संजीव कपुरच्या रेसीपीवरुन आणि थोडे माझे प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
छान दिसताहेत. ( मुख्य म्हणजे
छान दिसताहेत. ( मुख्य म्हणजे वर साखरेचा थर नाही !)
मस्त पाकृ.. पण बालुशाही थंड
मस्त पाकृ.. पण बालुशाही थंड झाल्यावर त्यात पाक आतपर्यंत मुरतो का?
बाकी ते...
संजीव कपुरच्या रेसीपीज बहुतेक ऑ ऑ च्या असतात आणि मी पण रोजचा स्वयंपाक ऑ ऑ तच करते म्हणुन मी ऑ ऑ वापरले.>> हे वाक्य त्या ऑ ऑ मुळे वाचायला मजेशीर वाटतेय!
बालुशाही गरम असताना पाकात
बालुशाही गरम असताना पाकात घातली तर त्यात पाक मुरतो.दुसर्या तळुन झालेल्या पाकात घातल्या कि आधीच्या निठळुन बाहेर काढायच्या.तळण्यात "मेख "असते..
अंजली पाक गरम असतो ना
अंजली पाक गरम असतो ना त्यामुळे छान मुरतात.
निर्जरा,ऑऑ कुठले
निर्जरा,ऑऑ कुठले वापरायचे?सध्या टि.व्हीवर ३ प्रकारच्या बाटल्यांची जाहिरात दाखवतात म्हणून विचारतेय.