Submitted by kaaryashaaLaa on 8 October, 2008 - 00:08
कुणी कुरवाळले नाही, कुणी रागावले नाही
कधी अस्तित्वही माझे कुणाला बोचले नाही
दुराव्याचा, अबोल्याचा किती करतोस कांगावा
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?
वहीमध्ये कश्या दिसतात नोंदी फक्त पुण्याच्या?
गुन्हा मी करत असतांना कुणीही पकडले नाही!
जिथे वळते, तुझा रस्ता! जिथे बघते, तुझी मूर्ती!
अशी जादू कधी झाली, मलाही समजले नाही
कुठे आहेस तू देवा किती मी शोधते आहे
(स्वत:च्या अंतरी का मी, कधी डोकावले नाही?)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुराव्याच
दुराव्याचा आणि मक्त्याचा शेर आवडला.
मस्तय. गुन्
मस्तय.
गुन्ह्याचा शेर बहुत आवडला
माझे ६
-----------------------------------------------------
फिर मुझे दीद-ए तर याद आया
दिल, जिगर तश्न-ए फरियाद आया
५ माझे.
५ माझे.
दुरावा आणि
दुरावा आणि गुन्हा हे शेर फार आवडले!
माझे गुण - ६
गुन्हा आणि
गुन्हा आणि मक्ता आवडले. माझे ४ गुण.
तिसर्या
तिसर्या शेरात उला मिसरर्यात 'पुण्याच्या' वाचल्यावर्,सानी मिसर्यात
सांगली येते की अजून कोणते कृषणाकाठचे नगर येते असा विचार करत असतांनाच गुन्हा आल्याने पुण्याच्या मध्ये पुणे नसून पुण्य असल्याचा साक्षात्कार झाला.
पुणे मधले पुण्याच्या असते तर लगागा झाले असते मात्र पुण्य असल्याने गा गा गा झालेय!
'आज आपने क्या सीखा? खोजिए आपकी दुनिया हमारे साथ'!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.
दुरावा आणि
दुरावा आणि गुन्हा खासच!
गिरी मलाही पुण्याचा उल्लेख वाटला तो प्रथम वाचताना!
'जादू' आणि
'जादू' आणि शेवटचा हे शेर छान आहेत. गिरिराज सारखेच 'पुण्यात' अडखळायला झाले. अर्थात ही काही कवीची चूक नाही. 'वहीमध्ये' यातही 'म' चा 'गा' करण्यासाठी सवलत घेतलेली आहे असं वाटलं.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश
गिर्या
गिर्या
दुराव्याचा, अबोल्याचा किती करतोस कांगावा
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?
-आवडला.
७ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
मलाही
मलाही पुण्याचा (पुणे) उल्लेख वाटला तो प्रथम वाचताना!
माझे ५ गुण!
दुसरा शेर
दुसरा शेर सहीच आहे.. पुण्य ही मस्त.. माझे ७ गुण...
तुझ्यामाझ
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?>>>हे नाही जबरी बसलंय इथे, आवडेश
६ गुण
६ गुण
दुराव्याच
दुराव्याचा, अबोल्याचा किती करतोस कांगावा
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?
तुझ्यामाझ्यातले नाते कधीच संपणारे नाही? असं म्हणायचं आहे बहुधा !!
काहीही असलं तरी मांडणी छान आहे. प्रत्येक शेरातून अजूनही कांही अर्थ निघताहेत.
८ गुण
माझे गुण
माझे गुण ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
दुराव्याच
दुराव्याचा आणी देवाचा शेर आवडला....
१० पैकी १०...
छान
छान छान.
गुणः ६
मला तर
मला तर सगळीकडे विदर्भच दिसतं
जिथे वळते, तुझा रस्ता! जिथे बघते, तुझी मूर्ती!
अशी जादू कधी झाली, मलाही समजले नाही
मस्त आहे हा शेर.
माझे ८ गुण.
छान आहे ५
छान आहे
५ गुण
छान
छान आहे.
माझे ६
मतला मक्ता
मतला मक्ता छान.
माझे ६ गुण
कुणी
कुणी कुरवाळले नाही, कुणी रागावले नाही
कधी अस्तित्वही माझे कुणाला बोचले नाही
अगदी सुरेख!
५ गुण.
५ गुण.
माझे ५
माझे ५