नमस्कार,
आजच पुणे विमानतळाबद्दल माहिती वाचली.
चाकणला विरोध झाल्याने तो बारगळला. राजगुरुनगरला विरोध होतोय. तो बारगळणार अशी चिन्हे आहेत.
यात राजकारण किती आहे आणि खरच शेतकर्यांवर अन्याय किती होणार आहे?
समजा राजगुरुनगरला नाही बनवला तर भु सर्वेक्षण करुन जिथे अशी बागायती जमीन नाही अशी जमीन पुण्यात्/पुण्याजवळ नाही का? आधी अशी जमीन निवडायची कि जिथे विरोध होइल मग नव्याने सुरुवात करायची आणि परत तशीच जमिन निवडायची..हे चक्र कधी तुटणार? इथे राजकीय इच्छा शक्ती नाही असे म्हणायचे का कॉमन सेन्स नाही म्हणायचे. श्री. शरद पवार यानी मनात आणले तर काय होणार नाही.. मग ते या बाबतीत रस का घेत नाही आहेत? (मी शरद पवारांचे नाव घेतलय इतरांचे नाही..विशेषतः विरोधी पक्षांचे कारण त्यातील कोणातही एवढी क्षमता दिसत नाही आहे आणि त्याना सत्ता मिळेल अशी काही चिन्हे नाहीत.)
काय कारणे असु शकतील? काय वाटते तुम्हाला?
इथे शेतकर्यांच्या बाजुबद्दल कोणाला सविस्तर माहिती असेल ती दिलीत तर वाचायला सोयीचे होइल.
(कृपया इथे जनरल मते.. उदा अमक्याला पैसे खायला मिळणार नाहीत, आजच्या राजकारण्याना अक्कल नाही , सगळे भ्रष्ट आहेत इ.इ. टाळावीत.)
धन्यवाद.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
राजगुरुनगर येथील प्रस्तावित विमानतळाला पाइट , रौंधळवाडी , धामणे , कोये , आसखेड या पाच गावांनी विरोध केला असून तसा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. या विमानतळामुळे बाराशे कुटुंबे विस्थापित होणार असल्याचा दावा विमानतळ हटाव कृती समितीने केला आहे.
चाकणऐवजी राजगुरुनगर येथे विमानतळ प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी रौंधळवाडी , कोये , पाइट , धामणे , आसखेड , कुरकुंडी या गावांतील जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र या गावांनी विमानतळाला विरोध केला. या गावांचे बागायती क्षेत्र पाच हजार एकरांपेक्षा अधिक आहे. तसेच २४ हजार फळबागा , ४५ हजार सागाची झाडे , २५० विहिरी , ५० शेततळी आहेत. विमानतळामुळे ही शेती नष्ट होणार आहे , असा दावा गावच्या सरपंचांनी केला आहे.
भामाआसखेड धरणात पाइट , रौंधळवाडीमधील जमीन संपादित झाली आहे. त्यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. असे असताना पुन्हा विमानतळासाठी जमीन द्यावी लागत आहे. त्यामुळे याला विरोध होत आहे. याबाबत आज (ता. १६) विमानतळ हटाव , शेतकरी बचाव असा नारा देऊन त्याबाबत सभा बोलविण्यात आली आहे. माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील या सभेत विमानतळाला विरोध करणार आहेत , असे कळविण्यात आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
पुण्यात का नाही बर? खरतर
पुण्यात का नाही बर? खरतर पुण्यातच गरज आहे विमानतळाची........लोकसंख्या, स्थळमहत्व आणि एकूणच सर्व दृष्टीने पुणे हेच योग्य स्थळ आहे.
नवी मुंबईला होणार आहे ना?
नवी मुंबईला होणार आहे ना? तिथून दोन तासावर पुणे.
>>नवी मुंबईला होणार आहे ना?
>>नवी मुंबईला होणार आहे ना? तिथून दोन तासावर पुणे.
बरोबर, त्यामुळे पुण्यात होण्याची काही गरज नाहीये.
एकाच एकाच भागात काय एकवटताय या सोयी ?
महाराष्ट्रात डॉमेस्टिक विमान वाहतूक वाढवणे जास्त गरजेचे आहे.
पुणे, मुंबई, नागपुर बरोबरच, नाशिक, नांदेड, कोल्हापुर, सोलापुर, कोकणातली काही गावे, इ. ठिकाणी विमानतळ डेव्हलप करून वाहतूक चालू केली तर फार मोठा प्रतिसाद मिळेल.
नवी मुंबईला होणार आहे ना?
नवी मुंबईला होणार आहे ना? तिथून दोन तासावर पुणे.
>>बरोबर. नवी मुंबईचा एअरपोर्ट बनवतानाच मुळात मुंबई-पुणे-नाशिक या शहरांना सोयीचा होईल असा बनवण्यात येईल.
सध्या एअरपोर्ट बनवण्यामधे विलंब होतोय त्याचे कारण आहे जमिन अधिग्रहण. अधिक्माहितीसाठी http://www.business-standard.com/india/news/wait-for-navi-mumbai-airport...