Submitted by शाम्भवी on 14 December, 2012 - 06:00
अर्थहीन जीवनाचा अर्थ मी शोधते आहे
कळतच नाही
अर्थात हीन होते आहे की..
हीनतेत अर्थ शोधते आहे
चुकलेले गणित परत सोडवते आहे
कळतच नाही
योग्य पध्द्तीने सोडवते की..
बरोबर आलेल्या दोन चार पार्याही
चुकवते आहे
तु दुर गेलास तरी
तुझीच वाट पाहते आहे
कळतच नाही
नवे स्विकारायला घाबरते आहे की..
जुनेच सावरते आहे
जाणते अजाणतेपणी तु दिलेले
स्वप्न सत्यात उतरवते आहे
कळतच नाही
स्वप्नाला मी आकार देते आहे की..
स्वप्न आकार घेताना मला घडवते आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कळतच नाही नवे स्विकारायला
कळतच नाही
नवे स्विकारायला घाबरते आहे की..
जुनेच सावरते आहे>>>>>>>>>नवे महित नसल्याने त्याची ती भीती काय .भीती जुन्याचीच असते ...इति. जे.कृष्णमुर्ती (विषयांतर )
स्वप्न्न>>>.स्वप्न
ले शु.