मनाची कविता

Submitted by तुषार जोशी on 12 December, 2012 - 08:24

मी हरलो म्हणू नकोस
यावेळी हरलोय म्हण
पुन्हा जग जिंकण्यासाठी
येतील कितीतरी क्षण

एकटा उरलो म्हणू नकोस
सध्या एकटा आहे म्हण
आयुष्य संपले नाही अजून
भेटतील किती तरी जण

मी थकलो म्हणू नकोस
जरा दम घेतोय म्हण
पुन्हा झेप घेण्यासाठी
पेटून उठेल एकेक कण

तुषार जोशी, नागपूर
१७ आगस्ट २०१०, ०९:००

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आज माझ्या फेसबूकवालवर (www.facebook.com/gangadharmute) या कवितेचा उल्लेख झाला. कविता खूप आवडल्याने कवितेचा कवी कोण असेल हे शोधण्यासाठी गुगलत गुगलत इथपर्यंत येऊन पोचलो.

ही कविता तुमची आहे हे बघून अवाक झालो आहे.

महान आहे ही कविता आणि ही कविता लिहिणारा कवी!

मान झुकवून, नतमस्तक होऊन या कवितेसाठी मानाचा मुजरा करत आहे! Happy

धन्यवाद मुटे जी. आपण शोधल्यावर आपल्याला ही सपडली हे माझेच भाग्य म्हणायचे नाहीतर लोक कवितेला नाव वगळून मस्त छापणे सोडत नाहीत.

ही कविता आता माझ्या दुसर्‍या कविता संग्रहात आहे आणि त्या दुसर्‍या संग्रहाचे नावच मुळी 'मनाच्या कविता' आहे, या कवितेवरून ठेवलेले.

पुनश्च धन्यवाद!