Submitted by तुषार जोशी on 11 December, 2012 - 14:13
बेन टेन मला आवडत नाही
शिनचॅन पाहू देत नाही आई
बारबी आणि मॅड पाहण्याची
मला नेहमिच होते घाई
छोटा भीमही खूप आवडते
जेवणही मग पटकन संपते
बारबी सिनेमांची गाणी मला पाठ
म्हणून दाखवेन मी लागोपाठ
अशी दुनिया आमची कार्टूनची
शाळेतून आल्यानंतरची
तुषार जोशी, नागपूर
(कविता चिंगूचिंटू साठी)
भुर्रध्वनी: +९१ ९८२२२ २०३६५
१२ नोव्हेंबर २०१२, १३:३०
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा