ओट्सचा उपमा

Submitted by saakshi on 5 December, 2012 - 23:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओट्स - पाऊण वाटी
कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून
हिरवी मिरची - १-२ बारीक तुकडे करून (आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता)
काळा मसाला - १/२ चमचा
मीठ चवीनुसार
हळद १-२ चिमूट
तेल - १ छोटा चमचा
पाणी - १ पेला

क्रमवार पाककृती: 

१. ओट्स कोरडेच खमंग भाजून घेऊन बाजूला ठेवावेत.
२. मग तेल तापवून त्यात कांदा, मिरची चांगले परतून घ्यावे. हळद टाकून आणखी परतावे.
३.मग पाणी टाकून चांगली उकळी येऊ द्यावी मग त्यात काळा मसाला टाकून उकळू द्यावे.
४. मग ओट्स टाकावे. ओट्स टाकताना सतत हलवत रहावे अन्यथा कढईला चिकटण्याची शक्यता.
५. झाकण ठेऊन शिजवावे. अधून मधून हलवत रहावे. पाणी पूर्ण आटून द्यावे.
मस्त गरमागरम उपमा तयार!!!!!!

वाढणी/प्रमाण: 
एका व्यक्तीसाठी भरपूर...
अधिक टिपा: 

खायला काढून घेतल्यावर कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. गरमच गट्टम करावे..

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल, मामींची diet recipies मधली पाकॄ यांपासून स्फूर्ती घेऊन स्वप्रयोग.....
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी रॉक्स ! मी इतकी कंटाळले होते पॉरिज खावुन. मामीची ओट्सची रेसिपी वाचल्यापासुन रोज एक बोअल ओट्स-उपमा विनातक्रार फस्त करते. तिने सांगितलेल्या रेसिपीजमधे भरपुर वेरिएशन्स ट्राय केली आहेत. Happy

सफोलाने पण मामीची रेसिपी ढापुन रेडी टु कुक ओट्सची पॅकेट्स आणली आहेत की काय? Wink

धन्स गार्गि... :स्मितः

>>>सफोलाने पण मामीची रेसिपी ढापुन रेडी टु कुक ओट्सची पॅकेट्स आणली आहेत की >>>>>> मनिमाऊ Happy
हो गं असू शकतं... कालच मसाला ओट्स ची जाहिरात पाहिली...

कालच ई. टीव्ही. च्या मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये बघितली या प्रकारे केलेली. एक प्रश्न- याची चव पोहयांसारखी लागेल का. मी अजून ओट्स खाल्ले नाही म्हणून विचारते आहे. काल बघितल्यापासून विचार करत होते आणि आज रेसीपी इथे पहिली.

चव नुस्त्या ओटमीलपेक्षा चांगली लागते. तेल जास्त घालावं लागत' असं मला वाटतं.
माझी मुलं मजेत खातात म्ह्णुन ं ंमी खूश Happy

एक प्रश्न- याची चव पोहयांसारखी लागेल का. मी अजून ओट्स खाल्ले नाही म्हणून विचारते आहे..>>> चव मस्त लागते. पोह्यांसारखी नाही. पण थोड्या जाडसर रव्याचं उप्पीट केलं की कशी लागेल तशी लागते बहुतेक Wink

वेका, कमी तेलातही मस्त होतो गं. Happy

अरे वा, ओटसचा उपमा! छान आहे हे इम्प्रोवायझेशन, saakshi .

मी आताच ओटस करतेय. मला तर हल्ली ओटसचं क्रेव्हिंग होतं, इतकं ओटस आवडतं. आज मी भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, मीठ आणि आल्याचा तुकडा मिक्सरमधून वाटून घातलंय. बघुया कसं लागतंय ते. खाल्ल्यावर सांगेनच इथे.

दिनेशदा, शेंगदाणे घातले पण त्यामुळे नेहमीची चव बिघडल्यासारखी वाटली. मी नेहमीच्या पद्धतीनंच करणार यापुढे. आज मिरच्या पण तिखट नव्हत्या त्यामुळे चटपटीत लागलं नाही.

नक्की आठवत नाही, पण मामीने कि अजुन कोणी तरी लिहिलं होतं कि ओट्स शिजवायला पाण्याऐवजी ताक घालायचं. एकदा ते पण ट्राय केलं. फार यम्मी होतं. शिवाय भाज्या घालुन, लसणाचा तडका देवुन, मॅगी मॅजिक क्युब्ज घालुन असे वेगवेगळे प्रकार करुन बघितले.
मी एका आठवड्यात बेसिक रेसिपी (म्हणजे तडक्यामधे ओटस भाजुन ठेवणे) करुन फ्रीजमधे ठेवली. नंतर दररोज सकाळी ब्रेफा बनवणं फार सोपं पडलं. ऐन वेळी कधी थोड्याशा उकडलेल्या भाज्या, कधी पाण्यात शिजवुन त्यामधे कर्ड आणि जिंजर पेस्ट, कधी बॉइल्ड एग व्हाइट घालुन खाल्लं. मावेमधे पाणी/ताक मिक्स करुन ओट्स ठेवले कि ५ मिनिटात तयार.

आम्ही असा उपमा नेहमी बनवतो. छान लागतो. Happy ओट्स भाजण्यापुर्वी थोडे चाळून घेतल्यास त्यातली बारिक पूड वेगळी होते (जी वेगळी ठेवून कणकेत मिक्स करता येते कींवा पिठीसारखी पोळ्यांना लावता येते.) न चाळता भाजल्यास ती पुड करपून थोडी कडवट चव येण्याचा संभव असतो.

मी जिरे राईची फोडणीही देते.काळा मसाला नाही घालत. थोडेसे गाजर किसून घातल्याने आणखी हेल्दी होतो.

मनिमाऊ, आता तुम्हि सांगितलेल्या प्रकारांनी करून बघेन.
>>>>मावेमधे पाणी/ताक मिक्स करुन ओट्स ठेवले कि ५ मिनिटात तयार.>>> हे करायची भिती वाटतेय थोडी, उतू नाही ना जाणार??

बरं मामी, शेंगदाणे वेगळे खाईन.

इथल्या मिरच्यांचे आणखीन एक प्रकरण आहे. गोर्‍या लोकांसाठी आणि काळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या मिरच्या असतात. गोर्‍या लोकांच्या असतात त्या काकडी एवढ्याच ( ?) तिखट असतात आणि काळ्या लोकांच्या असतात, त्या तर आपण हाताळू देखील शकत नाही. त्यामूळे सध्या मी वर्ध्याच्या आश्रमात जसे पदार्थ होत असतील, तसे जेवतोय. Happy

ओटस रात्रभर पाण्यात भिजवून. ते पाणी प्यायले तरी फायदा होतो. हवे तर त्यात लिंबू वगैरे पिळायचे. भिजवलेल्या ओट्स चाही वापर करता येतोच. आमच्याकडच्या टिनवर हे लिहिलेले आहे.

साक्षी, ५ मिनिटं म्हणजे अगदी तेवढीच नाही गं. २-३ मिनिटं करुन बघायचं मग गरज वाटली तर परत १-२ मिनिटं लावायचं. शिवाय बोअलचा साइझही केवढा आहे त्यावर अवलंबुन असतं.

बरं मामी, शेंगदाणे वेगळे खाईन. >>> दिनेशदा, Biggrin

इथल्या मिरच्यांचे आणखीन एक प्रकरण आहे. गोर्‍या लोकांसाठी आणि काळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या मिरच्या असतात. गोर्‍या लोकांच्या असतात त्या काकडी एवढ्याच ( ?) तिखट असतात आणि काळ्या लोकांच्या असतात, त्या तर आपण हाताळू देखील शकत नाही. त्यामूळे सध्या मी वर्ध्याच्या आश्रमात जसे पदार्थ होत असतील, तसे जेवतोय. >>> Lol

असं काय ते! एकतर हे टोक नाहीतर ते टोक. आपल्याला हाताळताही येणार नाहीत अशा मिरच्या ते खातात? जगातल्या सगळ्यात जास्त तिखट मिरच्यांचा मान या मिरच्यांकडे जात असेल. काय म्हणतात या मिरच्यांना?

जगातल्या सगळ्यात जास्त तिखट मिरच्यांचा मान या मिरच्यांकडे जात असेल>>तोमान भारताच्या मिरचीकडे आहे. भूत ढोलकिया ही असाममधली मिरची सर्वात तिखट मानली जाते.

मी हल्ली रव्याचा उपमा करतो त्यातपण दोन तीन चमचे ओट्स टाकते. नुसत्या ओट्सचा उपमा केला तर काळा मसाला आणि हळद घालत नाही. चमचाभर दही घालते. हि. मिरची ऐवजी फोडणीत लाल मिरच्या टाकते. शिवाय कढीपत्ता आणि उडीद्-चणाडाळ देखील घालते. गाजर्-कोबी-बटाटा-फ्लॉवर्-टोमॅटो-मटार अशा भाज्या पण घालते.

अरे व्वा! बरेच ओट्स रेसिप्या कळायला लागल्यात इथे..
Happy

इथल्या मिरच्यांचे आणखीन एक प्रकरण आहे. गोर्‍या लोकांसाठी आणि काळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या मिरच्या असतात. गोर्‍या लोकांच्या असतात त्या काकडी एवढ्याच ( ?) तिखट असतात आणि काळ्या लोकांच्या असतात, त्या तर आपण हाताळू देखील शकत नाही.>>>> Lol दिनेशदा, एकुणात interesting दिसतय हे

इतक्यात केला नाही पण आता इथेच लिहिते.

१ वाटी उडीदडाळ + १ चमचा हरभरा डाळ भिजवणे ४-५ तास ( + एक टीस्पून मेथ्या ऑप्शनल )

मिस्करमधून वाटून घेणे, चांगली पेस्ट झाली की त्यातच ३.५ वाट्या ओट्स घालून परत एकदा मिक्सरमधून फिरवणे ( थोडं पाणी घालून ). डोस्याच्या बॅटर सारखं झालं की ४-५ तासांनी डोसे करायचे. ओट्सचे आहेत हे सांगितल्याशिवाय ओळखू सुद्धा येत नाहीत.

अपर्णा, येत्या रविवारी करून बघेन गं. ओटसचे डोसे... Happy

शिर्षक बदलून "ओट्स च्या पाककृती - संग्रहित " असं ठेवावं का? एका जागी सापडतील सगळ्या पाकृ Wink

अजून एक आळशी रेसिपी..ओट्स पटकन मायक्रो मधे शिजवायचे, त्यात थोडे मीठ आणि लोणच्याचा खार टाकून मिसळून खायचे..छान लागतात.

वर नंदिनी लिहिलेय तेच, जगातल्या सगळ्यात जहाल मिरच्या मेक्सिको मधल्या नाहीत तर आपल्या असम मधल्या.. त्यांचे नाव " भूत ". हो खरेय.

इथल्या जहाल मिरच्यांना इंग्लिशमधे पेपर आणि पोर्तुगीजमधे, पिमेंटो म्हणतात.

मिरच्यांच्या एक भाग वाटणात कितीपट पाणी घातल्यावर ते मिश्रण तिखट लागत नाही, यावर त्यांचा जहालपणा ठरतो. मला नवल वाटते कि हे मिरच्यांचे पाणी कुणी चव घेऊन बघितले असेल ? नागपूर / आंध्र / असम मधलाच असणार तो.

>>वर नंदिनी लिहिलेय तेच, जगातल्या सगळ्यात जहाल मिरच्या मेक्सिको मधल्या नाहीत तर आपल्या असम मधल्या.. त्यांचे नाव " भूत ". हो खरे>><<

नवीन शोधानुसार.. तो मान नागा वायपर मिरचीला जातो, ( ईंग्लंड मधल्या शोधात नुसार .. भुत धोलकियाची हायब्रिड आहे). Happy

Pages