फेसलेस एन्काऊंटर - दीपा म्हेत्रे

Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2012 - 13:33

ए पी टूरिझम मधील ए पी हे आंध्र प्रदेशसाठी आहे हे मला बरेच नंतर समजले. मला ते ऑक्वर्ड पोझिशन टूरिझम वाटायचे. मागे रेललो तर मागचा कोकलतो आणि पुढे पाय केले तर पुढचा वळवळतो. अगदी तसाच योग असल्यास साईडलाही रेलू शकतो हे नोव्हेंबर २००८ मध्ये समजले. नाहीतर साडे सातशे रुपयांचे तिकीट पुण्यात काढून बसमध्ये बसले की सकाळी हैदराबादला उतरल्या उतरल्या गुडघेदुखीवर पेन कीलर घ्यायची हे ठरलेले. नशीब जे काय पिक्चर दाखवायचे ते निदान हिंदी तरी असायचे. तेलगु चित्रपटात मला हिरॉईनची फिगर सोडून काहीही समजत नाही. हिरो आणि व्हीलन यांच्यात एकच फरक असतो तो म्हणजे हिरो चांगला असतो आणि व्हीलन वाईट. अन्यथा दिसायला दोघेही तितकेच क्रूर वाटतात.

"ये लेडिज सीट है"

"तो?"

हा संवाद कोणात झाला असेल? गाडीबरोबर जो अटेंडंट येतो तो एका सीटवर बसलेल्या एका मुलीलाच हे म्हणाला होता. तिने गोंधळून 'तो?' विचारेपर्यंत आपला प्रश्न चुकला हे त्याला कळले असावे, म्हणून सारवासारवी करत म्हणाला 'सॉरी, मेरेको आपका नंबर चाहिये था'! पब्लिक फस्सकन हासले ते हासलेच. मला हसू आले नाही. इतर लोक हासतात तेव्हा काय हसायचे? इतर लोक मख्खासारखे बसतील तेव्हा आपण खदाखदा हसावे.

मी लांबच्या प्रवासाला सुरुवात करताना अर्धी क्वार्टर घेऊन सुरुवात करतो. किती पिणार माणूस? परत ढाब्यावर बस थांबते तिथे घ्यावीच लागते. आगामी गुडघेदुखीवरील जालिम उपाय एक रात्र आधीपासून सुरू केल्यास वेदना कमी जाणवतात. सकाळी उठल्यावर नवविवाहितेच्या सर्वांगाला प्रणयी गंध यावा तसा बसमध्ये एसीचा गंध पसरला होता. काहीतरी आपले म्हणायचे. नुसता 'एसी लावला होता' हेही चालेल. पण मग ते रुक्ष होईल, मग रुक्ष असा शिक्का बसेल, मग एकाच गोष्टीकडे सर्वांगाने पाहण्याची हातोटी नसल्याचा शिक्का बसेल आणि शेवटी म सा प चं सभासदत्व घ्यावं लागेल.

व्होल्व्हो असल्याने इंजिनचा आवाज जाणवत नसला तरी डगमग, डचमळ होतच होती बसची! नवरा बायको काहीही न करता नुसते शेजारी झोपले तरी मुले होतील असे धक्के बसतात या थांबलेल्या व्होल्व्हो बसेसमध्ये.

प्रवासी चढत होते. सीट नंबर नुसार सीट हुडकेपर्यंत रिझर्व्हेशन असूनही आपल्याला जागा पकडायची आहे अश्या हावभावात भिजलेले चेहरे पाहून उबग येत होता. कोणी बॅग वर टाकत होते, त्याचा पाय तिसर्‍यालाच लागत होता. त्या बॅग वर टाकणार्‍यामुळे मागचे चौघेपाचजण अडकलेले होते. ते एक्स्क्यूज मी म्हणतानाचे त्यांचे त्रासणे पोटातल्या व्हिस्कीमध्ये भिजून डायल्यूट होत मेंदूकडे जात होते. कोणीतरी पार पुढून पार मागच्याशी संदेश देवाणघेवाण करताना बसक्या आवाजात तेलगुत करत असल्यामुळे सन्यासी व्हावेसे वाटू लागले होते. त्यातच अटेंडंट ऐल्समधून फिरून तिकिटे तपासून कशावर तरी काहीतरी खुण करून मागे मागे सरकत चालला होता. तो इतका आत रुतलेला होता की हैदराबादपर्यंत पुढे येऊ शकणार नाही असे वाटत होते. त्यातच टीव्ही ऑन झाला आणि तेलगु जाहिरातींनी कलकलाटातील त्यांचे योगदान देणे सुरू केले. एक एक आत येणारा चेहरा पाहून निराशा होत होती. एक जरी बरा चेहरा असता तर निदान ढाब्यावर तो चेहरा पुन्हा दिसेल इतके तरी प्रवासाचे कारण मिळाले असते. मोबाईल फोनवर गेम्स खेळून बॅटरी अर्ध्यावर आलेली होती व वाकुल्या दाखवत होती. आय सी यू मध्ये व्हेन्टिलेटरवर ठेवलेला जख्खड वृद्ध काही आजची रात्र काढणार नाही म्हणतात तशी बॅटरीची अवस्था झालेली होती. दोन तासात ए पी टूरिझमच्याच चार बसेस अर्ध्या अर्ध्या तासाने सुटत असल्याने ही बस साडे सातचीच होती की आठची की साडे आठची असा प्रश्न पडावा इतका वेळ लागत होता निघायला. आणि माझ्या डाव्या दंडाला सौम्य धक्का बसला. मी खिडकीतून नजर आतमध्ये अजिबात वळवली नाही. कारण शेजारी बसलेला प्रवासी बघून आगामी नऊ तासांची निराशा आत्ताच मनात निर्माण व्हावी असे वाटत नव्हते. कोणीका असेनात! मी ढिम्म राहिलो. पण कधीतरी बघावेच लागणार होते. शेवटी नजर गेलीच तर एखाद्या कंपनीत सिनियर मॅनेजर वगैरे असावा तसा एक मॅन! ज्याच्यादृष्टीने करीअर, मुलांची शिक्षणे आणि बायकोचे वजन या बाबी सोडल्या तर काहीही प्राधान्ये नसावीत असा! त्यानेही घेतली होती की मला माझ्याच तोंडाचा वास येत होता हे मला समजले नाही कारण समोरून दीपा म्हेत्रे बसमध्ये चढली होती.

एखादा श्रीमंत माणूस मनानेही मोठा असावा तसा दीपाचा टी शर्ट गळ्याने मोठा होता. पाणी पीत पीत बसमध्ये चढणे ही तिची क्रिया पाहून मला 'के मयखानेमेभी गये पीते पीते' ही ओळ आठवली पंकज उधासची. मग तीच तोंडात बसली. तीन दिवस हैदराबादमध्ये सारखे 'न समझो के हम पीगये पीते पीते' हेच तोंडात बसलं होतं.

हैदराबादचे एक आहे. जाताना जावेसे वाटते आणि येताना यावेसे वाटते तिथून! कितीही वेळा गेलो तरी. शहर या असेही म्हणत नाही आणि नका ना जाऊ असेही म्हणत नाही. जाडीभरडी माणसे, बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेने वसवलेले सौंदर्य, रणरणते ऊन, तेलकट सावळ्या आणि स्वतःच्याच रंगाची साडी नेसणार्‍या बायका आणि उत्कृष्ट बिर्याणी व इडली वडा टिफिन्स यांचे मिश्रण म्हणजे हैदराबाद! पंधरा रुपयात नाश्ताही होऊ शकतो आणि पंधराशे रुपयात अर्धे पोटही भरत नाही असे सर्व काही तिथे आहे. वाईन शॉप्स आणि बार्स भरून वाहात असतात. साड्यांच्या दुकानात खाली दाखवायला काढून ठेवलेल्या साड्यांची घडी करायची वेळच येऊ शकत नाही. दर तीन माणसांमधील एक मुसलमान धर्मीय माणूस असतो. मॉल्समध्ये आलेली तरुणाई पाहून वाटते की यांच्यापैकी कित्येकजण हिरो हिरॉईन म्हणून चित्रपटात अधिक शोभतील. 'आंध्रा मील्स'च्या कळकट पाट्या पाहून आत पाय टाकायची इच्छा होते. कारण भाताबरोबर अकरा वाट्या आणि प्रत्येकीत भाताबरोबरच खावा असा वेगळा पदार्थ आणि शेवटी ताक! जातो, तिथे तितका भातही जातो. रस्त्याच्या कडेने भिंतींवर लांबलचक पोस्टर्समध्ये मादक अदा दाखवणार्‍या अभिनेत्री आणि कर्कश्श हॉर्न्स वाजवल्याशिवाय आपले अस्तित्व जाणवणारच नाही या तत्वावर विश्वास असलेली गर्दी! तसा उर्वरीत आंध्रही चांगलाच आहे. विजयवाडा अन त्यापेक्षा विशाखापट्टणम तर चक्क सेक्सीच आहे. पण हैदराबाद व सिकंदराबाद या ट्विन सिटीजमध्ये जीव अडकतो हे मात्र खरे!

मी एकदा हैदराबादच्या डान्स बारला गेलो होतो. मुंबईसारखा नव्हताच तो. तिथे चक्क ऑर्केस्ट्रा होता आणि त्यावरच तिथल्या मुली स्टेजवरच नाचत होत्या. त्यांच्याजवळ जाऊन हातात नोटा धरून त्या उडवणे हा प्रकार कोणीही करू धजत नव्हते याचे कारण मुंबईत पैसेवाल्यांना माज आहे तसा साऊथमध्ये नसतो. टीप द्यायची झाली तर वेटरकडे द्यायची आणि तो नेऊन देणार ती त्या मुलीला. ती मुलगी ती नोट कोणी दिली आहे हेही न विचारता बॉक्समध्ये टाकणार. गाणी तेलगु आणि हिंदी! एकंदर प्रकार विनोदीच!

हैदराबाद हे खरे तर संध्याकाळीच फिरण्याचे शहर आहे. सूर्य दिसेनासा झाला की तेथे माणूस स्वतःला सूर्य समजू लागतो. पॅराडाईजची मटन बिर्याणी खाल्यावर बकरी या प्राण्याला उद्देशून 'तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुझे बनाया' हे गाणे म्हणावेसे वाटते. दीपा म्हेत्रे परत दिसली तर 'तारीफ करूं क्या तेरी, जिसने मुझे बनाया' म्हणावेसे वाटेल. दोन्ही गाण्यांमधील 'बनाया'चे दोन वेगवेगळे अर्थ आहेत.

"हं? धिस इज माय सीट"

दीपा म्हेत्रेने सिनियर मॅनेजरला जनरल मॅनेजरच्या थाटात सांगितले.

"ओ मॅडम आपके लिये ये लेडिज सीट रख्खी है"

मागून अटेंडंटने स्त्रीदाक्षिण्य दाखवले. पुरुषांना साले कोणी उजवीण्य वगैरे नाही दाखवत! गरीब जमात! मुका बिचारा कुणी हाकावा!

"मै पीछे क्यूं बैठूं लेकिन?"

"इधर एकही सीट है मॅडम, आपके पासकी सीट खाली है"

"हां लेकिन पीछे क्यूं बैठूं? मैने आगेका टिकिट लिया है ना?"

"वो उधर जेन्ट्स है ना?"

"तो इनको दोनोंको उधर बिठाओ ना?"

"ये दुसरी सीट गीली है मॅडम यहाँ नही बैठ सकता कोई"

"तो इसलिये मै उधर बैठूं?"

सिनियर मॅनेजरला शेजारी रात्रभर ओलावा असण्याची सवय असावी. तो मुकाट उठला आणि मागे जाऊन बसला. दीपाने तोंडभर हासत त्याला थँक्यू म्हंटले. मीही त्याला थँक यू म्हणणार होतो, पण राहिलेच ते! असे सिनियर मॅनेजर प्रत्येक प्रवासात मिळोत मला, अशी प्रार्थना करून मी सज्जनपणाचा दिड इंची मुखवटा चेहर्‍यावर धारण करून आणि तोंडाचा वास फार येऊ नये याची काळजी घेत खिडकीबाहेर तोंड वळवले.

डचमळणारी व्होल्व्हो एकदाची हालली आणि मंडईच्या गणपतीच्या गतीने जहांगीर नर्सिंगपाशी स्टेशनकडे वळली.

अटेंडंटने दीपाच्या उदारमतवादी गळ्याचा अधिक आढावा न घेता बोर्डिंग पास तपासला आणि माझ्याकडे एक आरोपीकडे टाकतात तसा कटाक्ष टाकून तो पुढे गेला. माझ्या अपेक्षेप्रमाणे दीपाची चुळबुळ सुरू झाली कारण तिला अल्कोहोलचा वास आवडावा अशी माझीही अपेक्षा नव्हती. बहुधा पुढेमागे रिक्तस्थान नसावे कारण शेवटी ती सैलावत स्थिरावली. आणखी एक कारण म्हणजे हेराफेरीही लागला होता टीव्हीवर! आजवर माझ्या गाठीशी असे कित्येक अनुभव असल्याने कशाचा अर्थ काय याची मला कल्पना होती. त्यानुसार, एक शब्दही न बोलता प्रवास होणार आणि रात्री ती आपले ब्लँकेट घेऊन पलीकडे डोके करून मुटकुळे या अवस्थेत दिसेनाशी होणार हे मी तोवर ताडलेले होते. यामुळे ढाब्यावर ड्रिंक घेतले तर बोंबाबोंब होणार नाही येथपर्यंत मी निष्कर्ष काढू शकलो. आपण डोळे मिटून झोपून गेलो की सहप्रवासी जरा कंफर्टेबल होतो हा अनुभव असल्याने मी बसच्या धक्यांबरोबर माझ्या श्वासांचा रिदम बसवून आणि तान्ह्या मुलाची पडते तशी मान पाडत झोपू पाहू लागलो. च्यायला खरंच झोप लागली.

"हाफॅनर्डिनऽ हाफॅनर्डिनऽ"

घोषणेने मी दचकून जागा झालो तेव्हा अटेंडंट 'हाफ अ‍ॅन अवर डिनर' असे 'तिंग्लिश'मध्ये किंचाळत होता. दहा पाच माणसे तर आपापल्या पँटच्या चेनवर एक बोट ठेवून गवताकडे धावलेलीही दिसली. शेजारी पाहिले तर दीपा म्हेत्रे माझ्या बाजूला डोके झुकवून बेशुद्ध पडल्यासारखी झोपली होती. टीशर्टचा गळा नेमका किती मोठा आहे याची इतक्या जवळून कल्पना आल्याने मी जेवायला उतरावे की उतरूच नये यावर क्षणभर विचार केलाही. पण तेवढ्यात तिलाच जाग आल्याने तो प्रश्न सुटला. पाय बाजूला घेऊन तिने मला जाऊ दिले. मी मागे वळून विचारले.

"डिनर?"

"आय विल कम"

'तू पुढे हो' या तीनऐवजी तिने तीन वेगळे समानार्थी परभाषिक शब्द वापरून माझा अपमान वाचवला असे मानून मी जेवायला गेलो. पाच एक मिनिटांनी दीपा आत आली आणि एका टेबलवर एकटीच बसली व सॉफ्ट ड्रिंक घेतले.

माझे गुडघे थोडे दुखायला लागले होते पण डोळे सुखावत असल्याने तो इफेक्ट नलिफाय होत असावा. 'मी तुझ्या टीशर्टचा गळा असतो तर' अशी एक ओळही मला सुचू पाहात होती. पण अजून काहीच घडलेले नसल्याने 'तर मी इतका लहान राहिलोच नसतो' अशी दुसरी अध्यात्मिक ओळ सुचत होती.

मला आजही आठवते की त्या दोन ओळी मी माझ्या दोन जिवश्च कंठश्च मित्रांना एस एम एस ही केल्या होत्या. त्यातील एकाचे तर 'सो यू गॉट द कंपनी आफ्टर सो लाँग' असे डोळा मारलेले उत्तरही आले.

तिची माझ्याकडे पाठ होती. जगातल्या प्रत्येक माणसाचे दुसर्‍याकडे काहीतरी असतेच. तिच्या टीशर्टच्या पाठीवर 'विनर' असे लिहिलेले होते. पुढे काय लिहिलेले आहे हे वाचायची उत्सुकता निर्माण झाली. मी बिल देताना वळून वाचायचा प्रयत्न केला, पण पुढील भागावरील तीव्र चढ उतारांमुळे अक्षरे मिक्स झालेली होती. काय अक्षरांचे पण नशीब! 'मी तुझ्या टीशर्टवरची अक्षरे असतो तर' या ओळीला अनुरुप ओळ सुचली तेव्हा मी बसमध्ये बसलेलो होतो. 'तर ती पुढच्याच बाजूची असतो'!

"चलो र्र्र्र्र्र्र्र्र्र्राईट"

र या अक्षरावर एकट्यानेच गँगरेप करत अटेंडंटने ड्रायव्हर बदलला असल्याची खात्री करून बस सोडायला सांगितले तेव्हा दीपा म्हेत्रे बॅग वर ठेवायला उभी राहिली आणि मला टीशर्टवरची पुढची अक्षरे सलग पद्धतीने दिसली.

'धिस इज व्हाय आय अ‍ॅम अ......'

'ते मलाही माहितीय', हा माझ्या मनात आलेला पहिला नैसर्गीक विचार होता. तू कशामुळे सदा जिंकत असशील हे अगदी नेमक्या जागी नोंदवून ठेवायची काही गरज आहे का? आणा स्त्रीमुक्तीवाल्यांना आणि दाखवा हा टीशर्ट अन त्याचा गळा जो प्रत्यक्ष गळ्यापासून बराच खाली घसरलेला आहे. नुकत्याच घेतलेल्या तीर्थामुळे आलेले पावित्र्य बोलत होते.

"विच इज धिस प्लेस?"

दीपा म्हेत्रेने कोणाकडेही न बघता हवेत विचारलेला हा प्रश्न माझ्यासाठी आहे असे गृहीत धरून मी उत्तर दिले.

"टेंभुर्णी"

"हाऊ फार इज सोलापूर?"

"थ्री अ‍ॅन्ड अ हाफ अवर्स, मे बी, व्हाय? यू आर गेटिंग डाऊन अ‍ॅट सोलापूर?"

माझे काही ठोके चुकलेल्या अवस्थेत मी थरथरलो.

"नो नो, हैडराबॅड"

"यू बिलाँग टू पुणे ऑर?"

"लोनावला"

'लोणावळा' या खणखणीत मराठी नावातील 'ण' आणि 'ळ' या अक्षरांचा त्याग करणार्‍यांचा मला राग येतो. पण ते 'लोनावला' म्हणताना तिचे ओठ आणि जीभ असे काही हालले की 'सेकंदात दोन किस घेऊन दाखवा' स्पर्धेत तिला प्रथम पारितोषिक मिळेल असे वाटले. तिला एकदा ओरांगउटांग, गौडबंगाल किंवा मुजफ्फरपूर हे शब्द म्हणायला लावावेत असे मला वाटू लागले.

"ब्युटिफुल प्लेस अ‍ॅन्ड ब्युटिफुल पीपल"

दीपा म्हेत्रे सुंदर नव्हती पण नीटस आणि शार्प होती. या काँप्लिमेन्टवर ती किणकिणली.

हेराफेरी सुरू झाला. तिला हेराफेरी 'स्क्रीनवर बघण्यात' स्वारस्य नसावे कारण ती मला म्हणाली.

"इफ यू वॉन्ट टू वॉच द मूव्हि सीट हिअर ना?"

आत्ता खिडकीतून बाहेर बघण्यासारखे काही नव्हते. बाहेरून आत बघण्यासारखे सुरू व्हायला वेळ होता. मी उठलो आणि आसने बदलली. ती आत जाताना माझ्या दुखर्‍या गुडघ्यांना झालेल्या गुबगुबीत स्पर्शामुळे संधिवाताच्या पुरूष रुग्णांसाठी नवे औषध शोधल्याचा सांशोधकीय आनंद मला मिळाला. पण आता गळा खिडकीकडे गेला. मी फक्त 'विनर' बघू शकत होतो, कशामुळे विनर ते दिसत नव्हते. काय पण नशीब... खिडकीचे!

मी केलेल्या लहानश्या उपकाराची परतफेड व्हावी या उद्देशाने मी संवाद वाढवून पाहायचे ठरवले.

"मराठी?... ऑर..."

"मी मराठी.. तुम्ही?"

"मी पण मराठी.. .. तो माणूस उठला ते बरे झाले नाही?"

"अं? .. का?"

"त्याला तरी कधी लेडिज सीटवर बसता येणार?"

फस्सकन हासली. आता तिला बहुधा जरा मजा वाटू लागली असावी. म्हणाली...

"तुम्हीच लेडिज सीटवर आहात"

"लेडी माझ्या सीटवर आहे आता"

"मूव्ही बघताय म्हणून तुमचीच मदत केली"

"अच्छा ही तुम्ही मला केलेली मदत आहे का?"

"बसायचंय का इकडे?"

"नको"

"का आता का?"

"तुम्ही काय करता?"

"सध्या आराम.. जॉब शोधतीय"

"मग?... हैदराबाद?"

"माझी मावशी असते.."

"हंहं.. तुम्ही काय केलंयत?"

"इलेक्ट्रॉनिक्स"

"माझं नांव भूषण कटककर"

"ओके... मी दीपा म्हेत्रे"

"द विनर"

"अं?"

"टीशर्टवर लिहिलंय तुमच्या... मागे"

"बरंच लक्षंय"

"दुसरं आहे काय लक्ष देण्यासारखं?"

"म्हणजे?"

"हा पाहिलेलाच पिक्चर, बाकी बसमध्ये अंधार, रात्रभर प्रवास आणि उद्यापर्यंत काम नाही... मग असंच लक्ष जाणार ना?"

"हो का? "

"फक्त पुढे काय लिहिलंय ते मला नीट दिसलं नाही"

"कुठे टीशर्टवर?"

"हं?"

"का? लक्ष नाही का दिलं?"

मला समजलं! दीपा म्हेत्रे चालू आहे. आता मी चालू बनायला हरकत नव्हती.

"पुढून बघितल्यावर अक्षरांकडे कसलं लक्ष जातंय?"

खदखदून पण दबल्या आवाजात हासत माझ्याकडे रोखून बघत म्हणाली...

"का?"

"सुळ्ळकन घसरली नजर"

तिने दोन्ही हात तोंडावर दाबून आणि पुढे झुकून हसून ती चालुएस्ट असल्याचे दाखवले.

"जरा हात बघू तुमचा?" - मी म्हणालो.

हात हातान न देता तिने रोखून व शार्प नजरेने बघत विचारले.

"का?"

"तुमचं उद्या सकाळपर्यंतचं भविष्य सांगतो"

"सकाळपर्यंतचं?"

"हो"

"का? सकाळपर्यंतच का?"

"पुढचं ठरलेलंच आहे"

"काय?"

"की तुम्ही माझी आठवण काढून कसला मूर्ख भेटलावता म्हणत हासणार"

किणकिण!

"हं! बरं सांगा अंधारात भविष्य!" - दीपा म्हेत्रे

हात नुसता अधांतरी धरलेला होता. हेराफेरीच्या प्रकाशात तो दिसत होता मला. दोन्ही अर्थांनी 'हेराफेरीच्या' प्रकाशात!

मी तो अलगद हातात धरला. फारसा विरोध झाला नाही. जो विरोध झाला तो 'विरोध होऊ शकलाही' असता हे दाखवण्यापुरता होता. बायकांमध्ये 'अ‍ॅक्च्युअली हे असं झालं असतं पण मी होते म्हणून असं झालं' दाखवण्याचा गुण जन्मजात असतो.

भविष्य ऐकवलं मी!

"आजची रात्र फार सुखद असू शकेल, जर गप्पा मारल्याच तर! मुखदुर्बळपणा करणारा एका चांगल्या मैत्रीला मुकेल!"

हळूहळू गप्पांना स्पर्श मिळू लागले. विचारांना आकार! इच्छांना शरीरे!

'अ सिटी ऑफ लॉस्ट पीपल, हैदराबाद, नेव्हर सेज गेट लॉस्ट'!

मला सहज सुटणारी कोडी आवडत नाहीत. दीपा म्हेत्रेची ब्रा फ्रंट ओपन होती. बॉबीतल्या डिंपलपेक्षा मला सागरमधील डिंपल भावतेदीमाझे व्यक्तीमत्व फ्रंट ओपन आहे. त्यामुळे माझ्याशिवाय इतर गोष्टी सहज उलगडता येणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. खरे तर सोपेपणा माझ्यासाठी अवघड आहे. काहीतरी अवघड आहे हे समजण्यात जो सोपेपणा असतो तो काहीतरी सोपे आहे हे समजण्यात नसतो. सहा फुटी देहाची ताकद जिथे थिटी पडावी ते काम तिने टिचकीसरशी करावे याचा अपमान वाटण्याच्या मी पुढे गेलेलो असणे याचा अर्थ होता...... सोलापूर आले.

खांदा ते पोट या प्रवासाला पुणे ते सोलापूर या प्रवासाइतका वेळ लागावा हे व्होल्व्हो फार वेगात चालवतात याचे निदर्शक आहे. ज्या स्त्रीची बेंबी लवकर सापडत नाही तिची नाळ महान संस्कृतीमधील छुप्या व्यभिचाराच्या केविलवाण्या परकराखाली दडलेली असते.

पहाटे अडीच वाजता फिलॉसॉफिकल होणे ही दोघांची गरज बनणे हे मला टेंभुर्णीपासून अपेक्षित असले तरीही त्या पातळीला मी टेंभुर्णीलाच न पोचणे यास माझ्यातील नैसर्गीक नावीन्य कारणीभूत आहे.

दुसरा रोज वेगळा वाटावा ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणच रोज वेगळे वागणे हे नाती टिकवायला मदत करते. 'नवीन नाती निर्माण करण्यासाठी' तर जास्तच!

"आपण किती लवकर जवळ आलो...... नाही?"

"सकाळी लांब जाणार"

मला वाटले माझ्या या वाक्यावर दीपा म्हेत्रे तिचा सेल नंबर देईल. तिला वाटले असावे मी माझा तिला देईन. प्रत्यक्षात दोघांनी ड्रायव्हरला शिव्या दिल्या, ज्याने निव्वळ धार मारणार्‍यांसाठी बस थांबवली होती. 'पेशाब दो मिनिट' करत अटेंडंटने लोकांना 'आपल्याला लागली' असण्याची जाणीव करून दिली. ज्यांना उद्या दुपारपर्यंत थेंबही झाला नसता तेही उतरले.

आता एकमेकांचे चेहरे नव्याने बघणे हा एक वेगळाच अनुभव होता. आत्ता अस्ताव्यस्त झालेली दीपा मला अधिक डिझायरेबल वाटली. कारण बसमध्ये दुसरे कोणी बघण्यासारखे नव्हते. बसमधले दुसरे कोणी तिच्याशी असले काही करणार नव्हते, यामुळे तिला मी उजेडात तिच्याशेजारी हवा असलेला सर्वात शेवटचा इसम वाटलो.

मी सिगरेट ओढून आलो कारण आधीच विकत घेतलेल्या सिगारेट्सचा दुसरा काही उपयोगच नव्हता. प्रत्येक माणूस, क्षण, वस्तू यांचा उपयोग ठरलेला असतो व तो वेळोवेळी बदलत असतो. मी दीपा म्हेत्रेसाठी माणूस, क्षण व वस्तू तीनही होतो आणि ती माझ्यासाठी 'वस्तू म्हणूनच ट्रीट केल्यावर भेटू शकणारा माणूस'! क्षण म्हणून तर ती याक्षणीही, लिहितानाही आठवत आहेच.

व्होल्व्हो निघाली तेव्हा मी तिला माझ्या अध्यात्मिक कवेत घेतले आणि ती माझ्या हपापलेपणात तिच्या तात्कालीन, निर्विवाद व दुसरे आव्हानच नसलेल्या यौवनाचा विजय शोधत राहिली. हुमनाबादचे एक आहे. ते आले यापेक्षा ते गेले याचा आनंद जास्त असतो. 'चला व्हायचे ते होऊन गेले, आता पुढचे कसे' या चर्चेला चालना मिळाली. माझ्या कानात बोलताना 'बेगमपेट, लकडीका पूल, लास्ट स्टॉप, अशोका हॉस्पीटल' अशी नांवे घेताना ती माझ्या कानाचे सेकंदाला तीन या रेटने किसेस घेत होती. हा रेट सेकंदाला दोनपेक्षा जास्त असला तरीही 'लोनावला'च्या हालचाली बघण्याचा आनंद या हालचाली कानाशी अनुभवण्यापेक्षा जास्त होता.

प्रत्येक स्त्रीच्या केसांना वेगळा गंध येतो तसाच मीही प्रत्येक क्षण आधीची रेकॉर्ड्स विचारात न घेता हुंगतो. पण यावेळी फसलो. तिने दिलेला पत्ता, नंबर, सगळेच 'बॅक ओपन' निघाले. शेवटी मला तेच सोपे वाटले. फक्त 'उथलपुथल' हा शब्द उच्चारताना तिचे ओठ कसे दिसतात हे बघणे स्वप्नच राहिले.

दीपा म्हेत्रे! अ फेसलेस एन्काऊंटर! वन ऑफ द मेनी, आय 'फेस्ड'!

संस्कृती, निष्ठा, प्रामाणिकपणा, विश्वास!

बिनबुडाच्या शब्दांना असलेले एकमेव लोंगलास्टिंग आणि प्रामाणिक बूड! वासना!

आपण लोक साले वासनेला इतके अस्पृश्य का समजतो? असतेच की प्र्तय्केआच्या मनात? एकाला मार्ग मिळतो हे मान्य करून व्यक्त होण्याचा, एकाला नाही!

खर्‍याला खरे न मानणे म्हणजे हिंदू संस्कृती!

द रिअल प्रॉब्लेम इज विथ द वूमेन!

जिथे व्यक्त व्हायचे आहे तिथे न होता 'कोण व्यक्त झाले' हे कळणारच नाही तिथे व्यक्त व्हावे लागणे हा बायकांचा प्रॉब्लेम आहे राव! व्यक्तिशः मला काय करायचंय? पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर...... मला गोष्टी अवघड असलेल्या आवडतात...... मी जर बाई असतो.... तर ....

'मला पुरुष व्हावेसे वाटले असते'

मग सगळ्याच 'सोप्या' गोष्टी 'अवघड' झाल्या असत्या आणि त्यामुळे सोप्या झाल्या असत्या!

आपणच बाई असतो तर?

आपण संस्कृती पाळली असती की बदलली असती?

हा विचार पुरुषाला झेपू शकत नाही.

त्यासाठी स्वतःच्या बाबतीत 'बेफिकीर' व्हावे लागते.

तसा प्रत्येकच पुरुष व्यवसायात, नोकरीत, कित्येकदा स्त्री बनतो. मग त्यातून बाहेर आल्यावर पुन्हा पौरुषत्व धारण करतो.

साले तुमचे लिंगच उदरनिर्वाहावर अवलंबून आहे तिथे तुम्ही पुरुष कसले?

तुमच्यापेक्षा दीपा म्हेत्रे बरी!

जी निदान स्वेच्छेने 'फ्रंट ओपन' आहे.

मी स्त्री कधी बनलोच तर बदलेन इथली संस्कृती
प्रसवेन त्या मर्दास जो पुल्लिंग वेसण मानतो

-'बेफिकीर'!

(कथेतील नांव काल्पनिक)

======================================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177

ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो - http://www.maayboli.com/node/32642

शिखरावरी आरंभुनी गाठेल तळ... कळते तरी
माझ्या तुझ्या नात्यास मी अनिवार्य घसरण मानतो - http://www.maayboli.com/node/33399

थेंबाप्रमाणे क्षुद्र मी अन तू समुद्रासारखी
मोडायला विश्वास मी नात्यास आंदण मानतो - http://www.maayboli.com/node/34260

तू भार नात्याचा तुझ्या नेलास तेव्हापासुनी
मी एकही ओझे न असण्यालाच दडपण मानतो - http://www.maayboli.com/node/36341

त्या दोन अश्रूंची बचत आहे पुरेशी त्यास ... जो
या राहिलेल्या जीवनाला शुद्ध उधळण मानतो - http://www.maayboli.com/node/39414

====================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्त्री कधी बनलोच तर बदलेन इथली संस्कृती
प्रसवेन त्या मर्दास जो पुल्लिंग वेसण मानतो

वाह बेफीजी !! क्या बात !!

शेर वाचायलाच खास इथे आलो होतो बाकी कथानक निवान्तपणे वाचेन
धन्यवाद

अल्कोहोल इंड्युस्ड हॅल्युसिनेशन्स?

बाकी, हैदराबादचे अचूक वर्णन केलेत .

<ए पी टूरिझम मधील ए पी हे आंध्र प्रदेशसाठी आहे हे मला बरेच नंतर समजले. मला ते ऑक्वर्ड पोझिशन टूरिझम वाटायचे> हे जबरी आहे. नवीन माहिती बद्दल धन्यवाद

(( ए पी टूरिझम मधील ए पी हे आंध्र प्रदेशसाठी आहे हे मला बरेच नंतर समजले. मला ते ऑक्वर्ड पोझिशन टूरिझम वाटायचे.

तो इतका आत रुतलेला होता की हैदराबादपर्यंत पुढे येऊ शकणार नाही असे वाटत होते.

"ये लेडिज सीट है"

"तो?"

हा संवाद कोणात झाला असेल? गाडीबरोबर जो अटेंडंट येतो तो एका सीटवर बसलेल्या एका मुलीलाच हे म्हणाला होता. )))

ह्या वरून वाटलं हलकी-फुलकी विनोदी कथा असेल.
पुढे भलतीच बोल्ड झाली.

अप्रतिम

खूप दिवसान्नी पून्हा एकदा दाद द्यावीशी वाटली.......कारण्....काहिच नाही.....फक्त appreciation... नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो परत सागतो.......जाळ काढलात.....मस्स्स्स्स्स्त!!