मंगळगड / कांगोरी : अनवट वाटेचे आम्ही वाटकरू - एक अनुभव
किती दिवसापासून हा ट्रेक करू करू म्हणत म्हणत तसाच राहिला .मागे एकदा ग्रंथालयात गेलो असता (नेहमीच जात असतो म्हणा ) .
कांगोरी किल्ल्याबद्दल एका मासिकात लेख आला होता . तो वाचला नि मनात कांगोरी किल्ल्याबद्दल त्याच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल ओढ निर्माण झाली नि तिथे जाण्याच्या उत्सुक्तेलां पंख फुटले. नि
ना ना म्हणता म्हणता तिथे जाण्याचा तो दिवस उजाडला हि . दिनांक २४.११.२०१२ शनिवार
मी , आमचा मेन इंजिन लक्ष्मन उर्फ बाळू दा , मिलिंद नि तुषार असे चौघे आम्ही तयार झालो ट्रेक ला .
ठाण्याहून खोपट एसटी स्थानकातून रात्री ठीक १२:३० ला पिंपळ वाडी एसटी आहे. ती थेट आपणास किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी उतरवते . दुधानेवाडी किंवा गोगावले वाडी येथून आपणास किल्ल्याच्या माथ्यावर पोहचता येते.
आम्ही चौघेच असल्या कारणाने आम्ही तसं आरक्षण वगैरे काही केलेच न्हवते . म्हटलं होत कि फार गर्दी वगैरे तशी नसणारच एसटी ला .. . बसण्यास जागा जरुरू मिळेल.
आणि मागे त्याच एसटी ने आम्ही रायगड साठी हि निघालो होतो , त्यावेळेसच्या स्थिती वरून मी हे मनात ठरवून टाकले( बसण्यास जागा मिळेल म्हणून ) . नि शनिवारी रात्री पाठपिशवी घेऊन रात्री १०:३० ते १०:४५ च्या आसपास मी नि बाळू दा आम्ही दोघे घरातून निघालो , ठाणे स्थानकाच्या दिशेने , का तर एक मित्र तुषार म्हणून त्यास घ्यावयास . ह्या ट्रेक ला आम्हा सर्वात मध्ये लहान तो तोच होता. कॉलेज बॉय .
डोंबिवली हून निघून त्याच्या वडलान सोबत तो ठाणे स्थानका बाहेर १०-१५ मिनिटे आमची वाट पाहत उभा होता . तसं मी त्यांना ११ :३० ला तेथे असण्यास सांगितले होते . पण त्याच आधी ते तिथे पोहोचले. त्यामुळे त्यांना आमची थोडी वाट पहावी लागली.
बरोबर ११:३० ला आम्ही ठाणे स्थानका बाहेर पोहोचलो . ते दोघे तिथे उभे होते .
''माफ करा काका आमच्यामुळे तुम्हाला इतका वेळ थांबावे लागले'' . अस बोलून आमची नि काकांशी ओळख झाली . तुषार तसा पहिल्यांदाच आम्हा सोबत येत असल्याने त्याच्याशीही गाठभेट झाली( ह्यापूर्वी फेसबुक मार्फत आमची चर्चा होत से ) .
आमचा परिचय सत्र संपताच आम्ही आमच्या दिशेन खोपट एसटी स्थानकात रिक्षा करू निघालो नि १० मिनिटात तिथे पोहचते झालो.
साधारण १२ च्या आसपास आम्ही खोपट एसटी स्थानकात होतो.
एसटी येण्यास नि सुटण्यास अजून अर्धा तासाचा तरी अवधी होता . त्यामुळे थोडा पाठ्पिशावीच ओझ जरा बाजूला सारून तिथेच आम्ही आसनस्थ झालो.
आजूबाजूला नजर फिरवली असता लक्षात आले. गर्दी फार आहे . बसायला जागा मिळेलच अस वाटत नाही. इतक्या ४ ते ५ तासाचा प्रवास उभ्याने करायचा म्हणजे .....मनात विचारांचं चक्र फिरू लागल .
नि अर्धा तासाचा तो अवधी ना ना म्हणत लगेच निघून हि गेला .
एसटी आली नि लोकांची घाई झाली . जो तो त्या इवल्याश्या दरवाजाच्या दिशेन तुटून पडले . मग काय दरवाजातच काही अडकून पडले. काही त्यातून पुढे निघाले. एकाच झुंबड उडाली .सीट मिळविण्याकरिता.
आम्हाला मात्र चौघात एक अशी एकच सीट मिळाली , नशीब म्हणालो , निदान एक एक करून आम्ही आलटून पालटून बसण्यास मिळेल तरी ...
बरोबर १२:३० ला तिच्या वेळेतच एसटी निघाली. नि आमचा मंगल गडाच्या दिशेने प्रवासाला सुरवात झाली.
रात्री साधारण साडे तीन ते पावणे चार दरम्यान आम्ही महाड ला पोहोचलो. तिथे २० मिनिटे एसटी थांबली . आम्ही थोडे फ्रेश होण्यासाठी खाली उतरलो. मी बाळू दा नि तुषार ....
३ तासाच्या च्या 'वर - खाली' 'खाली - वर' प्रवासाने तुषार ला उलट्या करण्यास भाग पडले.
नि खाली उतरताच त्याने उलट्या करण्यास सुरवात केली.
पाठ पिशवी मधील पाण्याची बॉटल काढून त्याला पाणी दिले , नि थोड्या वेळेत कुठे गरमा गरम चहा मिलेते का ते पाहू लागलो .
कोपर्यावरील एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला चहा वाला होता . तिथे मस्त पैकी चहा पिऊन थोड्या वेळत पुन्हा एसटी मधून जावून बसलो .
आता मात्र आम्हा सर्वाना बसण्यास जागा मिळाली . तरीही पिंपळ वाडी करीता एसटीत पुन्हा नव्याने गर्दी झाली .
आम्हला मात्र आता एसटी च्या सर्वात मागील सीट वर जागा मिळाली .
एसटी चे चाके हळू हळू गती घेऊ लागले नि तसं तसे आम्ही अधून मधून एखादा खेळ खेळावा तसा हवेत झोकावू लागो . पुन्हा आहे त्या जागेवर स्थिरावू लागलो .
अस करत करत आम्ही एक एक वाड्या सोडत रात्री ५ च्या सुमारास कुठल्या तरी (नाव आता आठवत नाही ) एका गावात पोहोचलो . शेवटचा स्टोप. (दुधाने वाडी केंवाच मागे गेली , आमच्या ते लक्षात हि न्हवत )
एसटी तून उतरताना ड्रायवर काकांना आम्ही विचारल असता , त्यांनी सांगितले '' अरे गडावर ना , तुम्ही तसं अगोदर सांगितले असते तर तुम्हाला गोगावले वाडी येथे उतरवले असते'' तिथूनच गेला असता '' पण आम्हाला काय माहीत , रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारातून काही दिसलेच नाही . नि आम्ही काही विचारले हि नाही .
आता मात्र आम्हाला पुन्हा काही अंतर मागे जायचे होते .त्याह्याने आम्ही एसटी तून उतरताच त्या अंधार्या रात्री , पहाटेच्या शीतल चांदण्या रात्री आम्ही पायपीट करण्यास सुरवात केली .
रात्रीची ती शांतता नि ते वातावरण किती मोहक होतं , मनाला ताजेतवान करत होतं, मन प्रफुल्लीत करत होत. प्रवासात झालेली सगळी दग दग, तो त्रास इथे त्या आल्यास नाहीसा झाला होता.
तरीही आमच्यातला सर्वात छोटे ट्रेकर्स साहेब तुषार '' ह्यांच्या उलट्या काही थांबत न्हवत्या.
रस्तातून अधे मध्ये ते चालूच होत.
काही वेळेतच आम्ही जोगळे वाडीत पोहोचलो. नि रस्त्याच्या कडेला असणार्या प्रशस्थ अशा विठ्ठल रखुमाई देवळापाशी जावून विसावलो
तुषार ती तब्येत हि खालावली होती . उलट्या करून करून ...तो हि लगेच तिथेच आडवा झाला (झोपी गेला )
सकाळचे ६:१५ ला थोड उजाडल्यावर नि थोडी विश्रांती घेतल्यावर , एक एक सफरचंद पोटात गेल्य्वार आम्ही ट्रेक ला सुरवात केली.
जोगळेवाडी येथून ५ ते १० मिनिटावरच दुधानेवाडी आहे. रस्त्यालगतच एसटी थांबा आहे नि त्याच्या समोर मंदिर नि दुधानेवाडी चा फलक .
मिळविलेल्या माहितीवरून मंदिराच्या मागून शेताच्या बांधा वरून आम्ही चढण्यास सुरवात केली .
एक वाट मंदिरा समोरून हि जाते तिने न जाता शेताच्या बांधावरून सुरवात केली ,.
वाढलेले, सुकेलेल गवत , काटेरी छोटी छोटी झुडपं ह्याने ती वाट झाकलेली होती. त्यातून वाट काढत आम्ही . एका कच्च्या पण प्रशस्थ अशा रस्त्याला येऊन पोहोचलो. हा रस्ता सध्या नव्याने बांधत आहेत , काही दिवसाने किंवा वर्षाने म्हणा ह्या रस्त्याच काम हि पूर्ण झालेले असेल, त्यावेळेस मला वाटत सीधा गाडीनेच गडाच्या त्या बुरूजा इथल्या दरवाजात पोहचता येईल. अजून तरी ते काम अर्धवट आहे .असो पण त्या रस्त्याचा आपल्या सारख्या ट्रेकर्सना काय उपयोग , ट्रेक ला अर्थच नाही उरणार ना , ती चालताना , चढताना होणारी दमछाक , त्या अवघड वाटेवरील ते हळुवार नि सावधानतेने , सावकाश टाकलेले पाउल , घामाघूम झालेले शरीर , इतका सार होवून मग गडाच्या माथ्यावर टाकलेले ते पाऊल.. तिथल्या मातीचा स्पर्श , तो गारवा नि मनात निर्माण झालेले ते आनंदी तवंग , वलय . हे असले तर ट्रेक ला अर्थ .
कारण किल्ले पाहायचे असेल , इतिहास अनुभवायचा असले तर ते असेच , त्यावेळेस चे ते दुर्गाचे महत्व नि तिथला दुर्गम पणा , अवघडपणा अनुभवायचा असले तर तो असाच.
क्रमश : उर्वरित भाग पुढील सदरात ...लवकरच
संकेत पाटेकर
०२ /१२/२०१२
छान! पुढील भाग येऊ द्या
छान! पुढील भाग येऊ द्या लवकर..
मस्त लेख!! पु.भा.प्र.
मस्त लेख!!
पु.भा.प्र.
चला रात्र 'ऊलटून' गेलेली आहे,
चला रात्र 'ऊलटून' गेलेली आहे, मंगळवार उजाडलाय, आज नक्की येऊद्यात मंगळगडाचा वृतांत...:)