गझल
सूर्यही हाईस आला, काय हाहाक्कार होता!
वाट त्यालाही दिसेना, केवढा अंधार होता!!
त्या सुगंधाच्या झडीने दाह अंगांगात झाला;
बरसली होती फुले की, बरसला अंगार होता?
ती तुझी वचने, तुझ्या त्या लाघवी शपथा, बहाणे.....
पांगळ्या माझ्या मनाला केवढा आधार होता!
खेळलो मी खेळ बुद्धया आंधळ्याकोशिंबिरीचा!
काय मी करणार दुसरे? आंधळा दरबार होता!!
दार ना ठोठावता त्या लागल्या हृदयात येवू....
फार पूर्वीचा स्मृतींचा आमचा शेजार होता!
कापले त्यांनी खिसे अन् लागले बिनघोर हिंडू.....
वाटले त्यांना जणू तो वैध भ्रष्टाचार होता!
हातचे टाकून जेव्हा चित्त आले साथ द्याया;
त्याचवेळी जाणले मी...तो तुझा होकार होता!
ऐट नाही, डौल नाही, छानछोकी ना बढाई;
चित्त माझे चोरणारा और तो शृंगार होता!
कैद ना सुरईत झालो कोणत्याही लालसेच्या!
वेगळा, अगदीच माझा वेगळा आकार होता!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
हातचे टाकून जेव्हा चित्त आले
हातचे टाकून जेव्हा चित्त आले साथ द्याया;
त्याचवेळी जाणले मी...तो तुझा होकार होता!>>> मस्त.
शेजारही छान!
वाह वाह मस्तच खूप छान जुन्या
वाह वाह मस्तच खूप छान
जुन्या बासनातल्या गझला एकेक करून काढता आहात काय सर?
धन्यवाद विजयराव!
धन्यवाद विजयराव!
वैभवा! तू पहिला प्रतिसाद नाही
वैभवा! तू पहिला प्रतिसाद नाही दिलास?
तुझ्या ख-या भावना कळाल्या असत्या!
बासनावरूोन एक शेर आठवला आमचा............
लपेटली बासने मलाही......
उपाय केला झकास माझा!
त्याही वेळी मी हाच प्रतिसाद
त्याही वेळी मी हाच प्रतिसाद दिला होता व तुम्ही हाच शेर दिला होता मग म्हणालात (अवाहन/ आव्हान नक्की अजूनही समजले नाही ) तूही याजमीनीवर गझल कर मग मी म्हणालो जुगलबन्दी करूयात म्हणून
मझा त्यावरचा शेर असा होता
विठू शोधला विठू शोधला
मला लागला तपास मझा
नन्तर तुम्ही एक -मी एक शेर केले होते प्रतिसादात दिलेही मी म्हणलोही की शक्यतो मुसल्सल गझल करून एकत्रित करून "सहकारी तत्त्वावर" गझल पेश करूयात का अशा अर्थाचे ...दुसर्या दिवशी पाहतो तर तुम्ही स्वतन्त्र धागा काढून तुमचेच शेर असलेली ती गझल पेश केलेलीदेखील् होती
तुमच्याकडे ती तयारच होती बहुधा उगाचच मला वेड्यात कढलेत त्या वेळी......
असो त्यानन्तर मला सुचलेला शेर असा होता जो आता इथे देत आहे
विठ्या तुझ्यविण कसा सोडवू
उभय-अन्वयी समास मझा
धन्यवाद सर तुमच्यामुळे , मला त्यावेळी माझा बासनात गुण्डाळावा लागलेला हा शेर आठवला नाहीतर विस्मृतीतच गेला होता
पुनश्च धन्स
वैभवा! गझल तयार वगैरे नव्हती.
वैभवा! गझल तयार वगैरे नव्हती. असो.