त्यांना हसावयाचा आता सराव झाला (विडंबन )

Submitted by एक प्रतिसादक on 28 November, 2012 - 00:23

(मूळ रचनेची मनापासून क्षमा मागून विडंबन पेश करत आहे )

शेरात गंडण्याचा आता सराव झाला !
वादात राहण्याचा आता सराव झाला !!

भांडावयास ख्याती झाली सुदुर अशी की
झोपेत भांडण्याचा आता सराव झाला !

येथेच घेत नाही, माझी कुणीच बाजू.....
कल्लोळ ऐकण्याचा आता सराव झाला!

होळी असो दिवाळी, आम्हास काय त्याचे?
शिमगा असे सदाचा, आता सराव झाला!

ही जाळपोळ रंगे, हे बाफ स्फोटकांचे......
रचनेस गाडण्याचा आता सराव झाला!

ते लोक, का शहाणे, अभिप्राय टाळणारे
त्यांना हसावयाचा आता सराव झाला!

काही करू परंतू, या खाजवूच खरजा;
काही न वाटण्याचा, आता सराव झाला!

कोल्हेकुई जयांची , त्यांची न गोड वाणी.....
साखर नसावयाचा आता सराव झाला !

(सध्या इतकेच. धाप लागली )
- सायकोडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Rofl
हे चांगलं जमलंय विडंबन.
काय हो? विडंबनाची फॅक्टरी वगैरे आहे की काय तुमची? Uhoh
आजच मी एका विडंबनावर 'हे जमले नाही' असा कायतरी प्रतिसाद दिला तेव्हा मी तुम्हाला नाउमेद केलं असं म्हणालात. लवकर आली की तुमची उमेद परत.

सुरू ठेवा.. Lol

पर्फेक्ट !!!!

आपल्याबद्दलचा आदर वाढला आहे कोपरापासून नमस्कार घालत आहे सा.न. समजून स्वीकारावा .........

___________/\___________

मूळ रचनेवर प्रतिसाद म्हणून एक हझलेचा शेर आताच देवून आलोय
ती रचना वाचायच्या आधी तुमची रचना वाचल्याचा तो परिणाम असावा ..त्यामुळेतुमची ही रचना किती परीणामकारक आहे याची खात्री पटली.........आपल्याबद्दलचा आदर अजूनच वाढला आहे

तो मूळगझलेसाठीचा शेर असा.........

ही गझल वाटताहे मज "नेहमीप्रमाणे"
पण अवडावयाचा आता सराव झाला