घरून काम करणारया लोकांचे हितगुज

Submitted by पियू on 27 November, 2012 - 11:02

हा धागा घरून काम करणार्या लोकांसाठी.. भारतातले आणि बाहेरचे सुद्धा..

इथे तुम्ही चर्चा करू शकता:

१. हा निर्णय तुम्ही का घेतलात (घरून काम करण्याचा)
२. तुम्हाला आलेल्या/ अजूनही येत असलेल्या अडचणी
३. तुम्ही त्यांच्यावर शोधून काढलेले उपाय/ मार्ग
४. काही सकारात्मक बाबी (घरच्यांना/ मुलांना वेळ देता येतो याव्यतिरिक्त)
५. इतर कोणाला घरुन काम करायची इच्छा असल्यास उपलब्ध असलेले पर्याय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीरा, ग्रेट! अभिनंदन हा निर्णय घेतल्याबद्दल Happy

तुझ्या निर्णयात माबोचा वाटा आहे म्हणतेस, तुला माबोवर आणलं कुणी? :उगीच कॉलर ताठ करून घेणारी बाहुली:

(आपल्या रियुनियनच्या मिटिंग्जमधे मी माबोबद्दल सांगितल्यावर तू इथे यायला लागलीस असं मी समजतेय हां इतके दिवस Wink तसं नसेल तर सांग, मी कॉलर खाली करते आणि हे उडवते Proud )

छान व उपयुक्त चर्चा चालू आहे. वाचते आहे.

घरून काम करण्याचे फायदे-तोटे जवळून पाहिले आहेत. त्यामुळे या चर्चेशी रिलेट करू शकते. कामाची शिस्त, वेळा, कामानिमित्त भेटायला येणारे लोक आणि घरच्यांनी/ इतरांनी गृहित धरणे या बाबतीत सहमत आहे.
जिथे घरातच, परंतु स्वतंत्र अशी ऑफिसची सोय असते, जे घरापासून थोडे वेगळे आहे तिथे त्यातल्या त्यात ऑफिस प्रमाणे वातावरण, कामाच्या वेळा पाळणे हे जमू शकते.

अभिनंदन मीरा.. !

एक थोडासा वेगळा विचार. आपल्याकडे ( आणि इतर बहुतेक देशातही ) निवासी जागा आणि कमर्शियल जागा खुप लांब लांब असतात. पण मस्कतमधे मात्र, दरवेळी, शेजारच्याच बिल्डींगमधे माझे ऑफिस असे असायचे. त्यामूळे अक्षरशः पाच मिनिटात ऑफिसमधे पोहोचत असू. ( शिवाय दूपारी घरी येऊन, मस्तपैकी तास / दोन तास झोप काढून, ऑफिसला जाता येत असे. ) असे आपल्याकडे घडते तर !

दा नेहेमिप्रमाणेच, वीषयाशि अतीशय, सूसंबद्ध आणी स्वतःबद्दल, कूठलिच फाजिल माहीति, न देणारा प्रतीसाद.

अजून येऊ द्या !! आफ्रीकेतील शेजार्‍यांना तूमचा कसा लळा लागला हे या संदर्भात वाचनिय ठरेल.

१. घरून काम करणे = बेशिस्तपणा वाढणे (हे. मा. म.). अगदी वेळेवर जेवण सुद्धा गिळले जात नाही. अजागळपणा वाढतो. दिवसभर अजागळ अवस्थेत बसणे... तयार होणे नसते. Proud
२ . घरातल्या इतर लोकांच्या अपेक्षा वाढणे( घरातच होतीस तर मधून मधून हा बिल डिसप्युट फोन केला नाहीस, ते जरा करायचे ना... ह्यांव व त्यांव)
३. बॉस नजर ठेवून ज्यास्त असतो IM मधून. चॅट करून रीपोर्ट करा.. वगैरे. घरीच आहात ना मग करा ज्यास्त काम हा बॉसचा अत्याचार.
४.टाईमपास ज्यास्त होतो. मग गिल्ट व प्रेशर मध्ये थकणे.
५. वजन वाढणे(सर्वात महत्वाचा) Proud

तेच ऑफीसमध्ये,

१. लवकर जावून कोट खुर्चीला टांगून ८ वाजता कॅफेटेरीयात / ब्रेकरूम मध्ये टाईमपास/ गॉसिप.
२. वेळेत जेवण
३. काम लवकर होतात. ई.

वजन वाढणे(सर्वात महत्वाचा) >>>>

माझं उलट आहे... घरी राहिले की वजन आटोक्यात असतं. घरात मी उगाचच खुप फिरते ( नवर्‍याचं मत) ऑफिस मधे सतत बसुन काम आहे. कधी कधी लंच सुध्धा टेबलावर..... फक्त नैसर्गिक कॉल पुरतं उठणं होत. पाय सुध्धा धरतात. सतत ए.सी मधे बसुन आणि सूर्य प्रकाश न मिळाल्याने मला "डी" व्हीटॅमिन डेफिशियन्सी झाली आहे. सध्या प्रमाण आटोक्यात आहे. पण जास्त झाले तर हाडां वर परिणाम होवु शकतो.

घरून काम याचे अनेक प्रकार आहेत.
१. नोकरीत राहून घरून काम
२. फ्रिलान्सिंग करताना घरून काम (विविध दैनिका-मासिकांतून लिहिणे, अनुवादाची कामे आणि कुठलेही व्यावसायिक लिखाण, विविध ठिकाणी व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून शिकवायला जाणारे लोक )
३. छोटा व्यवसाय ज्याचा सेटप पसार्‍याचा नाही, एम्प्लॉयी फक्त तुम्हीच आणि जिकडे तिकडे जाऊन क्लायंट अटेंड करणे, बाकीचा सेटप घरात करणे असे स्वरूप असेल. (छोटी एजन्सी, डिजेच्या मेंदी व्यवसायासारखे, टप्परवेअर, ऑरिफ्लेम, मेरी के, अ‍ॅव्हॉन इत्यादींचे विक्रेते)
४. असा व्यवसाय ज्याचे ब्रेनवर्क वेगळे हपिस परवडत नसल्याने घरात बसून कराल आणि रिसर्च व/वा बाकीचे काम प्रत्यक्ष फिल्डवर ( उदा. डॉक्यु मेकींग, नाटकाचे दिग्दर्शन, सेट आणि कॉश्च्युम डिझायनिंग, पोर्टफोलिओ फोटोग्राफी )
५. घरगुती व्यवसाय (हस्तकलेच्या वस्तू, टिकाऊ खाद्यपदार्थ बनवणे)
६. स्टुडिओ (अनेक पेंटर्स, स्कल्प्टर्स हे सुरूवातीला घराचाच एखादा भाग यासाठी वापरतात पुढे जाऊन जेव्हा मोठे घर परवडते तेव्हा घरातच वेगळी स्पेस तयार करतात. प्रोफेशनल फोटोग्राफर्स पण यात येऊ शकतात)
७. आगे दुकान पीछे मकान (ब्यूटी पार्लर्स व वरती आलेली अनेक उदाहरणे)

मला वाटतं आपण आपला अनुभव लिहिताना यातल्या कुठल्या कॅटेगरीत बसतो तेही मेन्शन केलं तर वाचणार्‍याला उपयोग होऊ शकेल.

वाचते आहे. छान पोस्टस.
मोकिमी- अभिनंदन आणि शुभेच्छा. बिग लीप ऑफ फेथ. Happy

नी

अजून एक कॅटॅगरी अ‍ॅड कर.

प्रोफेशनल्स : माझ्या सारखे जे फक्त सल्ला देतात, एखाद्या क्लायेंटची घडी बसवुन देतात. ह्यात फक्त सल्ला येतो. ह्यात सी.ए. , सी.एस, लॉयर्स. ज्यांना घरी होम वर्क असतं म्हणजे फक्त सल्ला देण्या साठी जे वाचायला लागतं. ह्यात अनेक लोक सामावु शकतात. अगदी हॉर्टीकल्चरिस्ट सुध्धा.

मीरा, मस्त निर्णय!! अभिनंदन आणि मनःपुर्वक शुभेच्छा!!

योगायोगाने इतक्यातच अजून एक सीए मित्र (ठाण्यातलाच) नोकरी सोडून कन्सल्टन्सीमधे येतोय असे कळले आहे. कर्मधर्मसंयोगाने तुम्ही भेटलात तर पार्टनरशिप चालू करा Wink

मी इलेक्ट्रॉनिक्स फर्मवेअर / हार्डवेअर मध्ये काम करते. चार वर्ष घरुन काम करतेय.

१. हा निर्णय तुम्ही का घेतलात (घरून काम करण्याचा)
नवीन गावात माझ्या कंपनीचे ऑफिस नव्हते.

२. तुम्हाला आलेल्या/ अजूनही येत असलेल्या अडचणी
प्रथम म्हणजे प्रचंड सेल्फ डिसिप्लीन लागते वेळच्या वेळी काम करायला बसायला. घरात प्रचंड पसारा असला तरी तो डोळ्याआड करुन कामाला बसता आले पाहीजे. ते नाही जमले की मग कामाचे काही तास रहात नाही. घरात कींवा ऑफीस सतत कामच असते. ह्या अडचणी अजूनही सुटल्या नाही आहेत. पण पसार सहज दृष्टीआड करता येतो मला. Happy
दुसरे म्हणजे बाहेर पडल्यावर आपल्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलाचाली असते, इतर लोकांशी इंटअ‍ॅक्शन होते ती स्वतःच्या वाढीसाठी (दुसर शब्द ??) फार उपयुक्त असते. जर दिवसभर नीट काम झाले नाही (माबोवर किंवा तत्सम स्थळांवर फार वेळ घालवला ) तर गिल्टी फिलींग येते.मग जरा चिड्चीड होते. मग संध्याकाळ कामातच जाते. माझ्या बाबतीत संध्याकाळी मी माझ्या बॉसशी बोलते त्यामुळे ती तशीही कामातच जाते.
आता हार्डवेअर मधले काम फारसे माझ्या वाट्याला येत नाही आहे.

३. तुम्ही त्यांच्यावर शोधून काढलेले उपाय/ मार्ग
सकाळी / संध्याकाळी स्वतःसाठी काही वेळ जरुर बाजूला ठेवावा. दिवसातून एकदातरी बाहेर पडावेच.
व्यायामाची सवय ठेवावी.
स्वतःला आणि घरातल्यांना आठवण करुन द्यावी की घरातली सर्व कामं ही माझीच जबाबदारी नाही. नाहीतर घरुन काम करत असल्याने काम अलगद अंगावर पडतात / आपणच ओढवून घेतो.
जवळ जवळ रोज संध्याकाळी बॉसशी बोलल्याने, ऑफिस पासून एकदम तुटल्यासारखे वाटत नाही. तो पण चांगला असल्याने कंपनी विषयी नवीन गोष्टी सांगत असतोच.

४. काही सकारात्मक बाबी (घरच्यांना/ मुलांना वेळ देता येतो याव्यतिरिक्त)
मुलं शाळेतून थेट घरी येऊ शकतात. आजारी पडली की कोणी घरी रहायचे, कशी /कोणी सुट्टी घ्यायची असे प्रश्न निर्माण होत नाही.
काही छंद जोपासता येतात.

मला बाहेर जाऊन काम करायला निश्चितच आवडेल पण जो पर्यंत हे काम आहे तोपर्यंत मी स्वतःहून दुसरा जॉब बघणार नाही आहे. अडचणी असल्यातरी मी घरुन काम केल्याने माझाच स्ट्रेस खुपच कमी झाला आहे. ह्या गावात वर्क कम्यूट / ट्रॅफीक हा अंगावर शहारे आणणारा प्रकार आहे.

मोकीमी सारखा स्वतःहून कदाचित हा मार्ग मी घेतला नसता. त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद कारण ती कारण वाचून मला अजूनही काही फायदे जाणवले ज्याचा मी विचार केला नव्हता.

घरुन काम करणे अगदीच सोपे नाही आहे. त्याचे फायदे-तोटे आहेतच. प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीत कुठचे पारडे जड आहे ते ठरवून निर्णय घ्यावा. असे काही नाही की एकदा घरुन काम करायला सुरवात केली की आयुष्यभर घरुनच काम करावे लागेल.

.

चांगला धागा आहे. सगळ्यांचे अनुभव वाचते आहे. माझा मुलगा लहान आहे(१ वर्ष) तो मोठा होइपरन्त घरुन काम करायला आवडेल. संधीच्या शोधात आहे. मी software tester म्ह्णून ५ वर्षे काम केले आहे.

पण जर तुम्ही एकत्र कुटुंबात रहात असाल तर पैसे वाचतात आणि ऑफिसच्या वेशभूषेचा डेकोरम पाळायची गरज नाही हे सोडून कुठलेही फायदे मिळण्याची शक्यता नाही. अडचणी मात्र अनंत...

>> एवढा पर्फेक्ट गेस असु नये बरं का कोणाचा.. Light 1

मी बरीच वर्ष ऑफीस मधुन काम केले. घरुन काम करायला मिळाल तर किती बर होइल अस कायम वाटत राहील.प्रत्येक वेळी लागलच तर पर्सनल कामासाठी घरुन काम करायचा ऑप्शन होताच. पण तेही २ अठवड्यातुन एकदा वैगरे. रीसेन्टली पुर्ण पने घरुन काम करायची ऑपर्टुनिटी मिळाली आणी जाम खुश झाले. २/३ आठवडे मजेत गेलेत. नंतर मात्र वर सगळ्यांनी लिहीलेल्या अडचणींचा त्रास व्हायला लागला. अगदी कोणीतरी शिक्षा दिल्यासारखा. काम, खाणं, पीनं, झोपण ह्या सगळ्यावरच परीणाम व्हायला लागला. म्हणुन रोज घरुन काम करायचे ऑप्शन/ परवानगी असतांना सुध्दा ३ दिवस घरुन आणी २ दिवस ऑफिस अस सुरु केला आहे. आता खरच बर वाटताय Happy

mala online kam karnya babat madat havi aahe..mhanje mala changlya sites chi naave janun ghyaychi aahet...

मला हा धागाच माहित नव्हता. आधी अॅडमिन मॅनेजर म्हणून घरून नोकरी केली. नोकरी छान होती पण १२ तासाचे काम असायचे तरीही परवडायचे. मुलगा दहावीत होता, त्याने मार्क मिळवण्याची अर्धी जबाबदारी पोटात असल्यापासूनच माझ्यावर टाकली मग काय करणार. नोकरी सोडली. मुलगा दहावी झाल्यावर नोकरी शोधली तर मिळाली नाही. मग आता मी घरूनच फ्रीलान्स काम करते.
भाषांतर करते इंग्रजी मराठी हिंदी. मी आधीही करत होते पण थोड्या प्रमाणात. आता पूर्ण व्यवसायरूपी करावे असा प्लॅन करते आहे व तयारी ही करते आहे.
फ्रीलान्स अॅडमिन वा व्यवस्थापनाची कामे आता फारशी मिळत नाहीत . आजकाल घरून काम करण्यासाठीच्या कामे शोधण्याच्या व्याख्या पार बदलल्या आहेत. भारतीय लोकाना डिमांड कमी झालीय. पण काही क्षेत्रे जसे, शिकवणे (tutor), डेव्हलपर, डिझायनर, याना अजूनही मागणी असते असे दिसते. फसवणूक खूप होते.

जरा आणखी पोस्ट टाक ना.. >> म्हणजे काय करू? आणखी प्रश्न अ‍ॅड करू का? तुला जे लिहावंसं वाटतंय ते लिही कि..

हो पियू नक्कीच लिहित आहे.तू पण लिही असे म्हणायचे होते... असो.

घरून काम करणा-यांसाठी आजकाल अनेक संकेतस्थळे उपलब्ध आहेत.

संधी मिळत नसते. हुडकावी लागते, शोधावी लागते, खेचून आणावी लागते...
किंवा चुकून मिळालीच तर त्यासाठी इतर काही कम्फर्टसचा त्याग करायची तयारी असावी लागते.

वेल तू कुठे शोधते आहेस ते सांग, मला जमेल ती मी मदत करेन पण नीधप पण खरे म्हणतेय, जबरी पापड बेलने पडते है

२. कामवाल्या बायकांना मी काही काम करत बसलेली आहे त्यामुळे समोर दिसले तरी तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला, गप्पा मारायला मी उपलब्ध नाहीये हे झेपत नाही/ समजत नाही. परिणामी कामवाल्या असतात त्या १-२ तासात करायचे काम हे अतिशय टाइमपास स्वरूपाचे किंवा मग काम न करता इतर काही असे करावे लागते. हे नेहमीच शक्य होते असे नाही. <<<
याचे आज परत एकोणीसशे साठाव्यांदा प्रत्यंतर आले... Angry

Pages