जुलै २०११ सुरु होता. बंगलोरात धो-धो पाऊस पडत होता. घरीही एकटाच होतो त्यामुळे सारखे कुठेतरी जाण्याची खुमखुमी येत होती. पावसाळा होता म्हणुन म्हणले एखाद्या धबधब्याला भेट द्यावी. जोग धबधब्याचे बरेच नाव ऐकुन होतो. अजुन कोणी येते आहे का हे पहायला प्रकाशला (माबोकर प्रकाश काळेल) तर तो ही तयार झाला आणि एका वीकएंड आम्ही दोघे निघालो.जोग फॉल्स पच्शिम घाटात अगदी आत आहे. जोग फॉल्स ला जाण्यासाठी बंगलोर-शिमोगा-सागर-जोग फॉल्स असा प्रवास आहे. बंगलोर -शिमोगा अशी रेल्वे आहे. हा साधारणःपणे ३.५ तासांचा प्रवास आहे. आता बंगलोर-तलगुप्पा (तलगुप्पा - जोग फॉल्स १६ किमी) अशी नवी रेल्वे सुरु झाली आहे. शिमोगा ला थांबुन दुसर्या दिवशी सकाळी जोग फॉल्स ला निघालो. सागरला पोहोचलो तर मुसळधार पाऊस सुरु झाला होता. तिथुन दुसरी बस घेऊन जोग फोल्स ला पोहोचलो. हा भारतातला दुसर्या क्रमांकाचा सर्वात ऊंच (२५३ मीटर ) धबधबा आहे. हा धबधबा शरावती नदीवर आहे. ह्या धबधब्याचे राजा, राणी, रोअरर आणि रॉकेट असे ४ प्रवाह आहेत. KSTDC ने धबधब्याच्या अगदी तळापर्यंत नेण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत.
तेथुन ह्या धबधब्याचे खरे रौद्र रूप पाहता येते. वरून पडणारा मुसळधार पाऊस, धबधब्यामुळे होणारा तुषारांचा दाट पडदा, त्यात ढग अशा वातावरणात पायर्या ऊतरून खाली गेलो व शक्य असेल तेव्हडे फोटोज् काढले.
(काही प्रचि slow shutter speed वापरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे पण tripod नसल्यामुळे थोडेसे blur आले आहेत. )
प्रचि १
एक छोटा धबधबा:
-
-
-
प्रचि २
जोग फॉल्सः
-
-
-
प्रचि ३
जोग फॉल्स, तळाकडुनः
-
-
-
प्रचि ४
झरा
-
-
-
-----------------------------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - ऐहोळे, कर्नाटक.
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
वा ! मस्त फोटो
वा ! मस्त फोटो
आता पहा.
आता पहा.
मस्त रे
मस्त रे
झरा एकदम सुप्पर
झरा एकदम सुप्पर
प्रचि ३ मस्त!!!
प्रचि ३ मस्त!!!
आमचा झब्बू हा गेल्या
आमचा झब्बू
हा गेल्या आठवड्यातला फोटो आहे. पाणी बरंच कमी आहे त्यामुळे फक्त त्याची भव्य उंची बघण्याची संधी मिळाली.
सुंदरच. हा भारतातला सर्वात
सुंदरच. हा भारतातला सर्वात मोठा आहे ना ?
मंजुडी, फोटो छान आहे पण पाणी
मंजुडी,
फोटो छान आहे पण पाणी नसल्यामुळे निरस झाला असेल ना?
दिनेशदा,
मोठा म्हणजे आकाराने का ऊंचीने?
हा भारतातला दुसर्या क्रमांकाचा सर्वात ऊंच धबधबा आहे.
वा ! मस्त फोटो
वा ! मस्त फोटो
सुंदरच
सुंदरच
म स्त ....सुंदरच
म स्त ....सुंदरच
छान फोटो!!
छान फोटो!!
खुपच सुंदर यार.... आम्ही
खुपच सुंदर यार.... आम्ही मगच्या वेळेस इकडे जायला मिसलेलो
शेवटचा कातिल आहे ... लै भारी
शेवटचा कातिल आहे ... लै भारी
सुपर्ब रे!! मस्त फोटो
सुपर्ब रे!!
मस्त फोटो
मस्तच रे !
मस्तच रे !