"लम्हे"

Submitted by रमेश भिडे on 23 November, 2012 - 10:42

परवा माझा एक मित्र आणि मी "लम्हे" या सिनेमाबद्दल बोलत होतो...यश चोप्रांची मला आवडलेली उत्तम कलाकृती म्हणजे लम्हें...वेगळे कथानक, उत्तम लोकेशन्स, सर्व कलाकारांचा ताकदीचा अभिनय...मस्त. त्यावर तो म्हणाला "ते सगळं ठिक आहे पण कमर्शिअल हिट कुठे झाला तो तुझा लम्हें?" एक क्षण मी स्तिमित झालो...खरंच आपण कोणत्याही कलाकृतीची श्रेष्ठता सिध्द होण्यासाठी त्याला "कमर्शिअल हिट" होण्याचंच परिमाण दरखेपेस लावत असतो....एखादी कलाकृती अनेकांना आवडली,पटली तर ती उत्तम व श्रेष्ठ, अन्यथा नाही असंच मानण्याची पध्दत आहे....कलाकृतीची निर्मिती ही कलाकार नेहमीच "विक्री"साठी करतो असं नाही, अनेक कलाकृती या केवळ शुध्द कलानिर्मितीच्या इच्छेने, सृजनशीलतेच्या अभिव्यक्तिकरणासाठी किंवा काहीवेळा तर कलाकाराच्या स्वानंदासाठीही झालेल्या असतात...त्याला "मुल्य" चिकटतं ते नंतर...कतरीना कैफ किंवा ऐश्वर्या राय हीच जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे कारण ती कमर्शिअली हिट आहे.....शोले किंवा तेजाब हेच सिनेमे उत्कृष्ट आहेत कारण ते कमर्शिअली हिट ठरले होते म्हणुन...हे निकष व्यवहारिक मुद्द्यांवर योग्य असले तरी ते सर्वत: सत्य नाहीत....जे भरघोस किंमतीला विकलं जाते तेच श्रेष्ठ, जे चकाकतं तेच सोनं हा नियम सगळीकडेच सरसकट लावला जातो...जगात कोहीनुरपेक्षाही सुंदर हिरे असतील, कतरीनापेक्षाही सुंदर मुली असतील, चितळ्यांच्या बाकरवडीपेक्षाही एखादा दुकानदार उत्तम-खुसखुशीत बाकरवड्या बनवत असेलही कदाचित, स्विट्झर्लंडपेक्षा छान निसर्ग असेलही की कुठेतरी, एखादी मस्त वाचनीय कथाकादंबरी असेल जी वाचकांपर्यंत पोहोचली्च नाहीये...पण हे त्यांचं दुर्दैव की त्या सर्व कलाकृती "कमर्शिअली हिट" नाहीत...आणि आपल्यासारख्या रसिकांचंही हेच दुर्दैव आहे की या कमर्शिअल हिटच्या लाटेच्या प्रवाहात उत्तम, रसिकतेने दाद देण्यासारख्या अनेक गोष्टी काळाच्या ओघात आपल्यापासुन कायम दुर राहील्या...आल्या आणि गेल्याही....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी बरोबर !! लम्हे हा माझाही आवडता picture. Sridevi चा अतिशय सुन्दर अभिनय व सुन्दर दिसणे. त्यात sridevi (Jr) व अनिता या character चे restaurant मधिल सन्वाद तर अप्रतीम !!