माझ्या हातात पडलेलं एक अतिषय सुंदर पुस्तक. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी अशा तिघांनीही वाचलेच पाहीजे असे वाटले म्हणून इथे त्याची ओळख करुन देत आहे.
शाळा निवड, शाळेकडून अपेक्षा इ. बाबींवर ह्या इथे आपल्या माबोवर बरीच चर्चा आधीही झालेली आहेच.
शाळा घराजवळ की लांब, शिक्षणाचे माध्यम, सिलॅबस - स्टेट, सिबिएसी, आयसीएस्सी, आयबी, शाळेत चालवले जाणारे उपक्रम इ. इ. बद्दलची चर्चा त्या अनुषंगाने शाळा निवडी विषयी ठरले जाणारे ज्याचे त्याचे प्राधान्यक्रम ह्या सगळ्यामधे कुठेही झेड पी च्या शाळा, म. न.पाच्या शाळांना मनाच्या कोपर्यातही स्थान नव्हते (कदाचित तुमच्या मनात असतीलही पण प्रामाणिक पणे मी मान्य करते की माझ्या मनात तरी ह्या शाळा नव्हत्या. माझे बाबा मनपाच्या शाळेत शिक्षक होते, त्यांच्या विद्यार्थ्यांचे पेपर्स बघितले असल्यानेही असेल कदाचित माझ्या मनात माझ्या लेकीसाठी ह्या शाळा लिस्टीत शेवटच्या स्थानावर देखील नव्हत्या)
ह्या शाळां विषयी असे सगळे पुर्वग्रह मनात असताना हे पुस्तक वाचनात आलं आणि पुर्वग्रहांची सगळी जळमट दूर करत एक नवा विचार, नवी नजर देऊन गेलं.
"इच्छा तिथे मार्ग" ह्या म्हणीचा कृतीत उपयोग मला ह्या पुस्तकात वर्णन केकेल्या शाळांनी दाखवला.
मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस ह्या वाक्याचाही "खरा" अर्थ इथे समजला.
ह्या म्हणीचा अर्थ, ह्या वाक्याचा अर्थ माहीत नव्हता असं नाही पण खर्या अर्थाने तो इथे रुजलेला दिसला.
श्रमदानातून साकारलेली परसबाग, शेती, स्वच्छता योजना, हुशार आणि थोडे कमी हुशार अशांची जोडी योजना, अभ्यासात मागे असलेल्या मुलांना अभ्यासात प्रगत असलेल्या मुलांनी दत्तक घ्यायची योजना, स्वतः प्रश्न तयार करण्याची योजना, गट करुन खेळातून अभ्यास साधणं, मुल्य शिक्षण हा शिक्षणाचा भाग न करता त्याला जगण्याचाच भाग बनवणं अशा अनेक योजना राबवत ह्या शाळांनी एक आदर्श घालून दिलाय त्याची ओळख व्हावी, चांगल्या कामाचं कौतुक व्हावं ह्या हेतूने हे पुस्तक लिहीलं गेलय.
एक पालक म्हणून हे सर्व वाचताना ह्यातल्या काही गोष्टी आपल्यालाही करता येण्यासारख्या आहेत हे लक्षात आलं. करुन तर बघुयात म्हणून ह्यातल्या "स्वाध्याय कार्ड" चा वापर करुन बघीतला. सध्या तरी लेकीला हा प्रयोग प्रचंड आवडलाय. तिलाही पुस्तकातील काही भाग वाचून दाखवला. माझ्या प्रमाणेच ह्या शाळा प्रत्यक्ष बघायला जायची इच्छा तिलाही निर्माण झाली.
ठिक आहे, काही गोष्टींमधे ह्या शाळाही असतील उण्या पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणून त्याचं कौतूक करावं, जे भावलं त्यातलं जे अंगिकारता येईल ते अंगिकारावं म्हणून हा प्रपंचं.
मला तरी हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने, पालकाने आणि शिक्षकांनी "वाचायलाच हवं" वाल्या लिस्ट मधे अॅड करावं असं वाटतं
मस्त परीचय. लवकरच हे पुस्तक
मस्त परीचय.
लवकरच हे पुस्तक मृदुलाला वाचायला द्यायला हवं. ती सुद्धा शाळांना भेट देते तेव्हा असंच काहीसं सांगत राहते.
AGES च्या कर्जत जवळच्या शाळेला भेट दिल्यावर तीनं त्या शाळेबद्दल बरंच सांगितलेलं.
धन्स कविता
धन्स कविता
काही दिवसांपुर्वी या
काही दिवसांपुर्वी या पुस्तकाचा लोकसत्ताच्या करीयर वृत्तांत या पुरवणीतदेखील परिचय करून देण्यात आला होता.
http://www.loksatta.com/career-vrutant-news/can-anybody-teach-by-teachin...
छान लिहिलंयस गं, कवे. मी ही
छान लिहिलंयस गं, कवे.
मी ही लोकसत्तामधे या पुस्तकाबद्दल वाचलं होतं.