फाटती विरल्या विजारी फार हल्ली..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सांडती नोटा नि नाणी याच गल्ली
फाटती विरल्या विजारी फार हल्ली

पुसल्या न शंका मम मनाला डंखणार्‍या,
मंडळी देतात सल्ले फार हल्ली

गावता ब्लिंपास उंची विरहण्याची,
खेचती खाली दिवाणे फार हल्ली

लेखिता कवतीक आपुले चिमुटभरिचे
सांगती, 'माझेही अस्से' फार हल्ली

जमताच माझा कंपू मजला चेव येतो
कोपचे उजळून येती फार हल्ली

का कुणी ओळींस वाची या फुकाच्या
गावतो का वेळ हापिसी फार हल्ली?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

खटकते माबोवरी सारेच हल्ली
जुळवते हजला लपूनी दूर गल्ली

भांडती खोटे, डुआयडु रोज जरी
फाडती बुरखे बाजारी, चोर वल्ली

झिंगता थोडे नशीले शब्द इथे
सांडती गझला नशील्या होत टल्ली

गावता ब्लिंपास उंची विरहण्याची,
खेचती खाली दिवाणे फार हल्ली<<< Happy

(र आणि ह मधील अदलाबदल आवडली)

Proud

Lol

मृण्मयीतै
हजल आवडून घेण्यात आलेली आहे. फक्त रद्दीफ / काफिया मधे काही गडबड असावी या शंकेने (पर्यायी नव्हे) आमचे दोन पैसे लावलेले आहेत. एकदा पाहून घ्यावेत.

हे आजच पाहिलं.

गझल तशी बरी आहे पण काफिये आणी रदीफ यांच्यात थोडीशी गडबड आहे.बरीच मेहेनत घ्यायला हवी. मला माझाच एक जुना शेर आठवला. मु पो तेर्से बांबार्डे येथे मुशायर्‍यात सादर केलेला .

गझलकारांपेक्षा जास्त झाले टीकाकार हल्ली.
आमच्याच पैशाची पिऊन होतात टल्ली.

प्रा विकु
उपयोजित यंत्रशास्त्र विभाग,
खा. बोबडे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय.
पौड फाटा, पुणे.
भ्रमणध्वनी ९४२२ १२३४५६

Pages