सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी भारतीय गर्भवती महिला डॉक्टरांनी गर्भपात करायला नकार दिल्यामुळे जग सोडून गेली . अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर गर्भपात करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्याने हरतर्हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला. थोडक्यात म्हणजे धर्माने (की धर्माच्या नावाखाली अंधश्रद्ध लोकांनी ?) आणखी एक बळी घेतला.
अतिशय दुर्दैवी घटना . अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक !
या बाबतीत सविताच्या समर्थनार्थ आणि असे पुन्हा जगभरात कुठेही होऊ नये म्हणून एक व्यापक चळवळ (निदान फेसबुक/इंटरनेट वर तरी )चालवून करोडो भारतीयांच्या सह्या असलेले निषेधपत्र संबंधित चर्च/ देशांच्या सरकारांना पाठवणे आवश्यक.
आपण तेवढे तरी निदान केलेच पाहिजे असे वाटते..................!
>>प्रो-चॉइस हे लेबल 'गर्भपात
>>प्रो-चॉइस हे लेबल 'गर्भपात करावा का नाही ही निवड करायचा हक्क आईलाच आहे'
हो. हाच अर्थ अपेक्षित आहे.
आणि काही कारणाने (धार्मिक, भावनिक, सामाजिक) आईने गर्भपात करायचा नाही असा पर्याय स्वीकारायचे ठरवले तर तो निर्णय प्रोचॉइस धोरणात बसेलच.
काही वर्षांपूर्वी निर्णय घेण्याचा, पर्याय निवडण्याचा अधिकार जैविक आई व वडील दोघांनाही असायला हवा (/नको) अश्या मुद्द्यावरची एक चर्चा बीबीसी रेडियोवर ऐकली होती. त्यातही शेवटी 'केवळ आई' याच पक्षाचे पारडे जड होते (असे मला वाटले.)
नंदिनी तुझ्या प्रश्नाचा
नंदिनी तुझ्या प्रश्नाचा संदर्भात "बहुतांशी स्त्रियांचा गर्भपाताला विरोध आहे" ह्या विधानाचा मी तरी तेव्हढाच अर्थ घेतोय. ह्याचा अर्थ ते pro life आहेत असे नसून तर 'आवश्यकता' नसेल तर गर्भपात नको असा असावा. इथे गोम आवश्यकता कोण ठरवणार ह्यात येते. जर आवश्यकता ठरवणे जर स्त्रीच्या हातात असणे जरुरी आहे हे मानले गेले तर ती व्यक्ती 'गर्भपाताला विरोध' असूनही pro choice धरावी लागेल. pro choice आणी pro life ह्या दोन्ही विरुद्धार्थी संज्ञा नाहित (जरी तशा वापरल्या जात असल्या तरी)
जर आवश्यकता ठरवणे जर
जर आवश्यकता ठरवणे जर स्त्रीच्या हातात असणे जरुरी आहे हे मानले गेले तर ती व्यक्ती 'गर्भपाताला विरोध' असूनही pro choice धरावी लागेल.<< बरोबर. मुळात दुसर्याने काय करायलाच हवे (खाप??) हे सांगणे वेगळे आणि मी त्या स्थितीत असल्यावर मी काय करेन हे ठरवणे वेगळे.
म्हणूनच कल्पू यांचा पहिला प्रतिसाद मला गोंधळात टाकणारा वाटला. कारण मूळ वाक्य कुटुंब्-नियोजनाचे अनेक मार्ग उपलब्ध असताना गर्भ उखडून टाकायच हे बर्याच स्त्रियांच्या हळव्या मनाला पटत नाही. हे आहे. यावरून माझं मत असं बनलं आहे की कल्पू यांना हे लिहिताना यामधे "कुटुंबनियोजनाची साधने फेल झाल्यावर होणारीच गर्भधारणा" अपेक्षित असावी.
माझ ते विधान सरसकट
माझ ते विधान सरसकट गर्भपाताच्या अनुषंगाने होत. सरसकट प्रेग्नन्सीज त्या होतात त्या रेप वैगेरे प्रकरणातून होत नाहीत. ते कुटुंबनियोजनात (साधन फेल झाल वा वापरलच नाही) गडबड झाल्याने होतात. पण त्याला गर्भपात हे सोल्यूशन नसाव अशी विचारसरणी प्रो-चॉईस वाल्यांची असते.
सविता व तिच्या पतीने केलेल्या
सविता व तिच्या पतीने केलेल्या गर्भपात संबंधी विनवण्ञा सविताच्या फायली मधुन गायब !!
ref: http://timesofindia.indiatimes.com/nri/other-news/Savitas-death-Abortion...
सविताच्या केस फायलीतुन काही महत्वाचे पेपर नाहीसे केले असल्याचा आरोप Galway University
Hospital वर केले आहेत. ह्या फायलीतून गर्भपाता संबंधी केलेल्या विनवण्या फक्त नाहीश्या
झाल्यात. ह्या फायलीत आता फक्त चहा, टोस्ट, एश्ट्रा ब्लँकेट ची मागणी असे पेपरच आहेत.
म्हणजे असे प्रकार फक्त भारतातच होतात अश्या आपल्या समजुतीला धक्का बसला असेल !!
>> त्याला गर्भपात हे सोल्यूशन
>> त्याला गर्भपात हे सोल्यूशन नसाव अशी विचारसरणी प्रो-चॉईस वाल्यांची असते.
चॉइस म्हणजे आईला ठरवू द्यावे. इतकेच. काय ठरवावे, गर्भपाताला परवानगी असावी की नसावी हे कायद्याने ठरवलेले नसावे. सविताच्या केसमध्ये कायद्याने गर्भपाताला बंदी असल्याने गुंतागुंत वाढली असे सकृत्दर्शनी वाटते.
मृदुला +१००
मृदुला +१००
Pages