कॉर्पोरेट क्षेत्रात नव्यानेच आल्यानंतर इंटरनेट ची कायमवेळ सुविधा (अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्स वगळून) आणि नवनवीन मेल्स ह्यांचे प्रचंड आकर्षण/ कुतूहल वाटत असे. आपल्याला आलेले प्रत्येक ढकलपत्र (forwarded email) आपल्या असंख्य मित्र-मैत्रिणींना त्याच पद्धतीने पुढे पाठविण्यात फार धन्यता वाटत असे.
कामाच्या क्षेत्रात बराच काळ स्थिरावल्यानंतर लक्षात आले की तेव्हा आपल्याला नवीन/ फ्रेश वाटणारी जी विपत्रे आपण अशी पुढे ढकलत होतो, तीच आपल्या ज्युनियर्स कडून पुन्हा नव्याने आपल्याला मिळत आहेत. उदा. नॅशनल गीओग्राफिक चॅनेल ने अमुक एका वर्षी बेस्ट ठरविलेले वाईल्ड लाईफ ह्या विषयावरील फोटो हा मेल जवळपास प्रत्येक वर्षी सब्जेक्ट लाईन मधील फक्त साल बदलून नव्याने येतो. आता तर संबंधित मेल करणार्या/री ला उलट टपाली उत्तर देणाचाही ही कंटाळा केला जातो की "जुना झाला हा मेल आता!" किंवा "शिळी झाली ही बातमी आता!"
तीच गत अजून अनेक प्रकारच्या मेल्स ची उदा:
१) एक मेल असा आहे की ज्यात नवर्याच्या, बाळाच्या इ. ऑपरेशन साठी मदत म्हणून अमुक एक संस्था आर्थिक मदत करणार असल्याचा उल्लेख केलेला असतो. आणि हा मेल जमेल तितक्यांना फॉरवर्ड करा म्हणून कळकळीची विनंती केली असते. हॉस्पिटलच्या शय्येवरील बाळाचा/ संबंधित व्यक्तीचा हृदयद्रावक फोटो वगैरे सोबत दिलेला असतो. बर्याच जणांना वाटते की आपल्या पाकिटातले काही जातेय का? मग काय हरकत आहे, हा मेल नुसता फॉरवर्ड करायला? असे लोक मग भारंभार लोकांना तो इ-मेल फॉर्वर्ड करतात. (बरेच जण तर सर्व मेल आयडीज् ना मेलच्या बीसीसी (bcc) टाकण्याचीही दक्षता घेत नाहीत. ). मग एकाने तरी "रीप्लाय ऑल" केले तरी संवादाचा, प्रश्नोत्तरांचा अखंड ओघ चालू होतो - कुणीतरी एका-दोघांनी सांगेस्तोवर की "रीप्लाय ऑल" करू नका किंवा निदान "मला ह्यातून वगळा"!
२) दुसरा एक मेल/समस असतो ज्यात अमुक मेल अमुक इतक्या लोकांना किंवा त्या पेक्षा जास्त लोकांना पाठविला की अमुक दिवसांत अमुक लाभ निश्चितपणे होणार ह्याची हमी दिलेली असते. न केल्यास वाईट घडेल म्हणून धमकी दिलेली असते. अगदी मॅनेजर लेव्हलच्या लोकांनाही हे असले मेल्स/ समस फॉरवर्ड करताना मी अनुभवले आहे. इतक्या भाकडकथांवर आपण कसा विश्वास ठेवू शकतो?
३) अजून एका प्रकारात प्रमुख बँक्स च्या नावाने फेक साईट्स बनवून त्या द्वारे मेल पाठवून पर्सनल माहिती मागवलेली असते.
४) कुरकुरे, मॅगी ह्या व इतर कित्येक प्रकारच्या प्रॉडकट्स मध्ये घातक घटक असल्याचा दावा करणारे मेल्स, भारतातील बरीचशी औषधे अमेरिकेने बॅन ठरवलेली आहेत तरी भारतात वापरली जात आहेत, अशा अर्थाचे मेल्स अशा कितीतरी मेल्स च्या बाबतीत खरे-खोटे ठरविणेही अवघड होऊन बसते.
५) एका मेल मध्ये तर चक्क र्हीस व्हिदरस्पूओन ह्या हॉलिवूडच्या नटीचे फोटो देऊन हे सोनिया गांधीचे तरुणपणाचे फोटो आहेत अशी चक्क भलामण करण्यात आली होती. आता बोला! :फीदी:
६) एका मेल मध्ये एका प्रसिद्ध लॅपटॉपच्या कंपनी चे नाव देऊन त्यांची एक ऑनलाईन स्कीम चालू असल्याचे लिहिलेले असते. व हा मेल जितके लोक अमुक इतक्या संख्येला फॉरवर्ड करतील तितक्यांना लकी ड्रॉ साठी कंसिडर केले जाईल व लकी ड्रॉ लागला तर फ्री मध्ये लॅपटॉप मिळेल अशा थापा मारलेल्या असतात. बरं अश्या मेल्स मध्ये त्या व्यक्तीचे काही डीटेल्स (पत्ता, फोन नंबर इ.) काहीच मागितलेले नसते किंवा संबंधित कंपनीचे चे ही काही डीटेल्स दिलेले नसतात. नुसतेच आपले "मेल फॉरवर्ड करा" ही विनंती!
वर नमूद केलेल्या १ नं च्या प्रकारचा एका स्त्रीच्या नावाने पाठविलेला मेल मला गेली ८ वर्षे नित्यनेमाने वेगवेगळ्या व्यक्तींकडून मिळालेला आहे. अजून ही स्त्री ऑपरेशन साठी पैसेच गोळा करत बसली आहे? तोच प्रकार नं. ६ मध्ये नमूद केलेल्या मेलचाही. त्या अमुक लॅपटॉप च्या कंपनीची तीच स्कीम अजूनही चालू आहे?
इथे एक मजेदार किस्सा आठवतोय. ट्रेन मध्ये २ स्त्रियांचा संवाद चालू होता. माझ्याच वयाच्या असाव्यात! त्यातली एक दुसरीला सांगत होती की नं. ६ च्या प्रकारचा एक मेल तिला आला आहे व अमुक एका कंपनीची अशी स्कीम चालू आहे. लकी ड्रॉ मध्ये आपला नंबर लागला तर फ्री मध्ये लॅपटॉप लागेल! दुसरी स्त्री ही कमालीची खुश व आश्चर्यचकित होऊन ऐकत होती व 'मलाही तो मेल फॉरवर्ड कर' म्हणून तिने २-३ दा पहिलीला सांगितले. मी न राहवून त्यांच्या संभाषणामध्ये भाग घेतला आणि विनंती केली की कृपया असले फेक मेल्स पुढे पाठवू नका. मी त्यांना पुढील प्रश्न विचारले -
१. त्या अमुक एका कंपनीला कसे कळणार आहे की अमुक इतक्या व्यक्तींकडे हा मेल फॉरवर्ड करण्यात आलेला आहे?
२. तुम्हाला आलेल्या मूळ मेल मध्ये त्या कंपनीच्या वेब साईटचा उल्लेख किंवा कुणा कंपनीच्या कुणा रीप्रेझेन्टेटिव्ह चा संपर्क क्रमांक इ. नमूद केले होते का? की जेणेकरून ह्या स्कीम ची/ बातमीची शहानिशा करून घेता येईल? किंवा निदान असा एखादा मेल आयडी की जो तुम्ही असले मेल्स फॉरवर्ड करताना सीसी (cc) मध्ये ठेवण्याची विनंती केलेली असते की जेणेकरून किती वेळा व कुणाकुणाकडून तो मेल फॉरवर्ड झाला ह्याचा ट्रॅक त्या कंपनीला ठेवता येईल?
३. जर एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या मेल्स आयडीने वेगवेगळ्या लोकांना तोच मेल फॉरवर्ड केला तर त्या व्यक्तीला तितक्यांदा ग्राह्य धरणार का तुमची ही तथाकथित कंपनी?
तर ह्यावर त्यांच्याकडे काहीही उत्तरे नव्हती. पहिल्या स्त्रीने "हे सर्व मी काही वाचले नाही. मला मेल आला. स्कीम बघून मी लगेच फॉरवर्ड केला. फुकट कुणी काही देणार असेल, तर नुसते एका क्लिक ने फॉरवर्ड करायला काय प्रॉब्लेम आहे?" असे उत्तर दिले. नंतर दोघी आपापसांत हळू आवाजात खुसपुसत होत्या व एकंदरीत "कुणाला फुकट काही मिळण्याची शक्यता दिसली की काही जणांच्या पोटात दुखते!" अशा आशयाचा त्यांना एकंदरीत सूर व नूर दिसला!
अनुभानंतर अश्या मेल्स मधला फेकपणा समजत जातो. आपल्याला माहीत असलेल्या/कळलेल्या फेक विपत्रांचा/ साईट्स/ मेसेजेस चा इथे उल्लेख करुया! त्याचप्रमाणे ह्याला आळा घालण्यासाठी करता येणार्या उपायांचीही चर्चा करुया.
(मी वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या परीने मी जागरुकतेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी फरक होणार नाही. पण कालांतराने तर त्या स्त्रीला समजलेच असेल की तिने फॉरवर्ड केल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारची पोचपावती मिळालेली नाही किंवा तिला/ वा तिच्या ओळखीत कुणालाही असला फेक लकी ड्रॉ लागलेला नाही!)
तळटीपः कृपया आंतर्जालावरील कुठल्याही फेक/ फिशींग साईट च्या लिंक्स इथे देऊया नको. नुसता उल्लेख करू या. कुणी ह्या धाग्यावरून चुकून तिकडे रीडायरेक्ट व्हायला नको.
निंबे, माझी गुगल वेबसाइट ज्या
निंबे, माझी गुगल वेबसाइट ज्या इमेलला जोडलेली आहे तिथेच आली होती ही मेल. तसेच अनेक काही प्रोफेशनल साइटसवर (राइझ.कॉम किंवा तत्सम) माझा इमेल अॅड्रेस दिलेला आहे मी. फ्रीलान्सर्सना गुप्तता पाळून चालत नाही फार.
मला दर महिन्याला एकदा ५००,०००
मला दर महिन्याला एकदा ५००,००० ग्रेटब्रिटन पौंड बक्षीस लागल्याचे आठवणीने सांगितले जाते..
@निंबुडा - तुम्हाला office
@निंबुडा - तुम्हाला office मधे काही काम दिसत नाही. सगळा वेळ forwarded mails वाचण्यात आणि पुढे forward करण्यात घालवता असे दिसते. नशिबवान आहत.
प्रसाद, तुम्ही चर्चेला नुसरून
प्रसाद, तुम्ही चर्चेला नुसरून पोस्ट टाकलीत तर बरे. व्यक्तिगत टिप्पणी करायची असल्यास विपू आहेच
घ्या!
निंबुडा ..........तु अपेक्षा
निंबुडा ..........तु अपेक्षा ठेवतेस
पुढील मुद्दे जे यापूर्वीच्या
पुढील मुद्दे जे यापूर्वीच्या चर्चेत दिसले नाहीत. (पाल्हाळ होईल, पण नाईलाज आहे)
अनोळखी कुणाकडूनही आलेली मेल.
विचित्र विषय, ज्याचा आपला काही संबंध नाही.
कोणत्याही स्पर्धेत / लकी ड्रॉ इ. मधे भाग न घेता बक्षिस लागणे. (हे येऊन गेलंय)
देवाचे / अल्लाचे / गॉडचे /साईबाबा वा तत्सम श्रद्धास्थानांचे नांव घेऊन आलेली मेल
- या सर्व स्पॅम आहेत असे गृहित धरून चालावे. न उघडता डिलीट करणे. काही लोकांना अॅटेचमेंटसकट सगळ्या मेल्स लॅपीवर्/काँप्युटरवर डालो करायची सवय असते. व्हेरी बॅड. या मेल ला रिप्लाय्/वाचणे/फॉरवर्ड करणे इ. केल्यास "स्पॅमबॉट" तुमची मेल व्हॅलिड आहे असे गृहित धरतो, मग तुमची आयडी पुढील डेटाबेसला विकली जाऊ शकते. वा अॅटॅचमेंट मधून कीलॉगरसारखी अॅप्लिकेशन्स तुमच्या काँप्युटरमधे घालू शकते.
याउपर मेल उघडलीतच, तर स्पॅम ओळखण्याचे व स्वतःची वाचविण्याचे सोपे फंडे :
भाषा अशुद्ध असते. - सरळ डिलीट करणे.
तुम्ही कोण हे ठाउक नसताना फक्त तुमच्या मेल अकाऊंटमधे लिहिलेले नाव त्यात गुंफलेले असू शकते.
विचित्र गोष्टींची मागणी असते. उदा. मी सद्दाम हुसेनचा बॉडीगार्ड असून मजजव्ळ ५५ बिलियन डॉलर्स आहेत. मला ते लाँडरिंग साठी तुमची मदत हवी. तुम्हाला फी म्हणून १० बिलियन देऊन टाकू इ. - मोहात पडू नये.
काहीवेळा तुमच्या ओळखीच्या माणसाची मेल असते, त्यात म्हटलेले असते, की मी अमुक देशी आलो आहे, माझे पाकीट पासपोर्ट इ. हरवले आहे, अन अमुक प्रकारच्या पैसे ट्रान्स्फरने मला तात्काळ मदत करा. (वेस्टर्न युनियन) - या परिस्थितीत त्या व्यक्तीस / त्याच्या घरी फोन करून माहिती घ्या, की काय झालं आहे नक्की.
आपल्या बँकेकडून आल्यासारखे वाटणारे पत्र. पासवर्ड रीसेट करणे गरजेचे आहे इ.
किंवा तत्सम. - कधीही मेलमधील लिंकवर क्लिक करून बँकेच्या साईटवर जाऊ नये. वेगळी खिडकी उघडून आपल्या हाताने आपल्या बँकेचा पत्ता टाईप करून तिथे जावे. व काय ती खातरजमा करावी. फार वाटले तर फोन करून चवकशी करावी.
अधिक खबरदारीचे उपाय :
भारतात तर करूच नये. कायद्याने गुन्हा आहे
(पण केलेच तर नको त्या बायकांची चित्रे डेस्कटॉपवर येऊन बसतात. अन त्या 'व्हर्चुअल गर्ल्स' हाकलून देणे भयंकर कटकटीचे होते.)
१. वेगवेगळ्या कामांचे वेगळे ई मेल आयडी बनवावेत.
(एम आर लोकांना देण्यासाठी वेगळा. आय.एम.ए. इ. असोसिएशन्स ना देण्यासाठी वेगळा. माबो, व इतर संस्थळांसाठी वेगळा, व माझा पर्सनल, जो फक्त जवळच्या लोकांना व बँकेला दिलेला आहे. यातील क्र. १ ची सगळी मेलबॉक्स अधून मधून न वाचता उडवायची असते. असोशिएशन वर भरपूर स्पॅम असते, पण ऑफिशियल मेल्स हेडींगवरून लगेच कळतात. तिसर्यावर फारसा संवाद नसतो;) व घरचा सेफ आयडी असतो.)
२. नेटवरून बँकेचे / पैशाचे व्यवहार करताना नेहेमीच व्हर्च्युअल कीबोर्ड वापरावा.
३. माहितगार व्यक्तीचे मार्गदर्शन नसेल तर पोर्न सर्फिंग करू नये.
४. ब्राऊजरचा स्टेटसबार वाचायला शिकावे. तुमी कोणत्या साईटवर जात आहात, वा नेले जाणार आहात हे माऊस हॉवर केल्यावर तिथे दिसत असते. रिडायरेक्शनही दिसते.
५. कुठेही क्रेडीटकार्ड/ बँकिंगचे डीटेल्स टाईप करताना अॅड्रेस बार मधे http ऐवजी https दिसते आहे की नाही हे बघा.
७. अनोळखी आडनावाच्या अॅटॅचमेंट फाईलवर डबलक्लिक करू नका. बहुतेकदा विंडोज मधे आडनाव लपवलेले का असते कुणास ठाऊक. (आडनाव = extension. उदा. interesting.pdf मधील pdf हे आडनांव आहे. पण त्याचा आयकॉन घेऊन व्हायरस .exe / .com / .bat इ. आडनावांने असू शकतो. कोणतीही एक्झिक्यूटेबल फाईल माहित नसताना चालवून पाहू नये)
सरळ आठवले तितके लिहिले. जाणकारांनी अधिक भर घालावी.
वाचण्याचा पेशन्स टिकला असेल, तर धन्यवाद!
इब्लिस, छान संकलन... बरीच
इब्लिस, छान संकलन... बरीच वर्षे स्पॅम मधे ढकलत राहिल्याने, आता माझ्याकडची वाहतूक कमी झालीय.
आता हे कमी झालेय, पण पुर्वी मेल फॉर्वर्ड करताना, भली मोठी ईमेल अॅड्रेसची यादीच फिरत असायची.
धन्यवाद दिनेशदा. ते एक
धन्यवाद दिनेशदा.
ते एक राहिलंच.
अगदी कामाचीही मेल बर्याच लोकांना पाठवत / ढकलत असाल, तर ती नावं बीसीसी मधे टाका. म्हणजे विनाकारण इतरांचे पत्ते स्पॅमर्सना मिळत नाहीत.
नंबर २ प्रकारचे ईमेल आले कि
नंबर २ प्रकारचे ईमेल आले कि ज्याने पाठवले त्यालाच तितक्या वेळा पाठवून पाहा
काहीवेळा तुमच्या ओळखीच्या
काहीवेळा तुमच्या ओळखीच्या माणसाची मेल असते, त्यात म्हटलेले असते, की मी अमुक देशी आलो आहे, माझे पाकीट पासपोर्ट इ. हरवले आहे, अन अमुक प्रकारच्या पैसे ट्रान्स्फरने मला तात्काळ मदत करा. (वेस्टर्न युनियन) - या परिस्थितीत त्या व्यक्तीस / त्याच्या घरी फोन करून माहिती घ्या, की काय झालं आहे नक्की.<<<
मला (म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खरंतर) आमच्या सरांची अशी मेल आली होती. आणि नेमके तेव्हा ते त्याच देशी असणार होते हे माहित होतं. तेव्हा क्षणभर काळजी बिळजी वाटली मग लक्षात आलं की ते त्या देशातल्या कुठल्याही भागात असले तरी त्या देशातल्या य ओळखीच्या लोकांना मेल करू शकतात आणि आपण कुठे आहोत काय आहोत हे कळवू शकतात. कलेक्ट कॉल करू शकतात. तिकडे बहुतेक सर्व मराठी कम्युनिटीमधे त्यांना ओळखणारे लोक आहेतच.
तसेही माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते त्यामुळे काही करणं शक्य नव्हतं.
दोन दिवसांनी त्यांची खरी इमेल आली हा सगळा स्पॅम आहे. मी ठिक आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. अकाउंट हॅक झालाय. कुठेही पैसे पाठवू नका. बहुतेक बर्याच लोकांनी ते जिथे जिथे जाणार होते तिथे फोन करून विचारलं असणार
निंबुडा, महत्वाचा
निंबुडा, महत्वाचा विषय.
तुम्ही दुवे देऊ नका म्हणुनही १-२ देतो आहे - लोकांचे री-इन्वेंटींग वाचावे म्हणुन (खूपच आक्षेप असल्यास उडवायला सांगावे - वाईट वाटणार नाही). या प्रकाराला अर्बन लिजेण्ड्स म्हणतात व ती किल्ली वापरुन शोधल्यास अजुनही गोष्टी सापडतील. थोडक्यात काय तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोकांनी थोडा विचार केला तर त्यांना ऑफर का ऑफर आणि लिजेण्ड का लिजेण्ड स्वतःलाच करता येईल.
http://urbanlegends.about.com/
http://www.snopes.com/
भारतातील बरीचशी औषधे
भारतातील बरीचशी औषधे अमेरिकेने बॅन ठरवलेली आहेत तरी भारतात वापरली जात आहेत >> ह्याचा आताच अनुभव आला. आताच्या भारतवारि मधे माझ्या १५ महिन्यांच्या बाळाला अंबानी मधे admit केले होते. डॉक्टर ने viral and bacterial दोन्हिसाठि औषधे दिलि plus alergy and seizure साठि सुद्धा. १० दिवसांचा कोर्स होता. त्यामधेच आम्हाला इकडे परतायचे होते.इथे परत आल्या आल्या मुलाच्या pediatrician ला दाखवले आणि त्याचि औषधे दाखवुन तिच continue करु का विचारले. pediatrician ने पहिल्यांदा alergy and seizure ची औषधे बंद करायला सांगितलि. त्या औषधांचे known side effects आहेत म्हणुन इथे ति बॅन आहेत. viral साठि इथे लहान मुलांना काहिहि औषध देत नाहित.
मेल मधल्या किति गोष्टि खर्या असतात ते माहिति नाहि कारण मला कधि असे मेल नाहि आले.
प्रिया७, अमेरिकेतील वैद्यकीय
प्रिया७,
अमेरिकेतील वैद्यकीय सेवेची मला नेहेमीच दया वाटत आलेली आहे. परंतू तो या बाफचा विषय नव्हे.
अमेरिकेतील वैद्यकीय सेवेची
अमेरिकेतील वैद्यकीय सेवेची मला नेहेमीच दया वाटत आलेली आहे
हे अग्दी बरोबर आहे. अत्यन्त अशास्त्रीया कन्सेप्ट आहेत त्यान्चे
यापूर्वी ऑस्ट्रेलियन
यापूर्वी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचं एक भाषण, स्वामी विवेकानंदांच्या गाजलेल्या भाषणाची ऑडीओ लिंक इ. ची ईमेल्स फ्रॉड असल्याचं स्पष्ट झालं आहे. hoax-slayer वर दिलेलं स्पष्टीकरण आणि पुरावे पुरेसे होते.
सध्या बातमी भारताच्या संदर्भात आहे. भारत - चीन सीमेवर युएफओ दिसल्याबाबतच्या बातम्या आहेत. गुगल सर्च दिलात तर युट्युब व्हिडीओ मधे शंभरेक युएफओज त्या भागात फिरत असल्याचे दिसतेय. मला सध्या व्हिडीओ नीट दिसत नाहीये. तो भाग लडाखचा आहे हे नक्की आहे. पण फिल्ममधले ऑब्जेक्ट्स हे सुपरईंपोज केलेत किंवा कसे हे स्पष्ट झालेले नाही. भारतातल्या ईलेक्ट्रॉनिक्स मेडीयाने सैन्यदलाचा अहवाल दिलेला आहे. प्रिंटमेडीयामधेही बातम्या आहेत. युरोपातल्या एका टॅब्लॉईडने तर भारताला आता युएफओ आहेत हे जाहीर करावं लागेल असं छातीठोकपणे सांगितलंय. भारत चीन सीमेवर एक गूढ प्रदेश असून तिथे दोन्ही देशाचे सैन्य जात नाही किंवा कुणालाही तिथे जाऊ देत नाही. तिथे ३२००० वर्षपूर्व एक देऊळ असून त्याचा संबंध युएफओशी आहे असा मसालाही बातमीत आहे.
काय खरं नक्की ?
>>अमेरिकेतील वैद्यकीय सेवेची
>>अमेरिकेतील वैद्यकीय सेवेची मला नेहेमीच दया वाटत आलेली आहे

>>हे अग्दी बरोबर आहे. अत्यन्त अशास्त्रीया कन्सेप्ट आहेत त्यान्चे
मला अजिबात कौतुक नाहीये अमेरिका आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेचे, पण विधान जरा धाडसी वाटले.
महेश, पादुकानंद. तो या बाफचा
महेश, पादुकानंद.
तो या बाफचा विषय नाही हे आधीच म्हटले आहे मी. अधिक चर्चा विपूत
<स्वामी विवेकानंदांच्या
<स्वामी विवेकानंदांच्या गाजलेल्या भाषणाची ऑडीओ लिंक इ. ची ईमेल्स फ्रॉड असल्याचं स्पष्ट झालं आहे. >
या भाषणाची सीडी २००० साली प्रकाशित झाली होती. सीडीवर स्पष्टपणे लिहिलं होतं की, हे मूळ आवाज नसून अभिनेत्यांकडून भाषणं वाचून घेतली आहेत. हे वाचण्याचे कष्ट न घेता त्या सीडीतली तमाम भाषणं यूट्यूबवर चढवली गेली.
विदेशी फोन नंबर
विदेशी फोन नंबर बाबत-
मध्यंतरी सरकारने + २४३, +१२०......,unknown numbers ,blank calls ना प्रत्युत्तर देवू नये ,किंवा ते फोन रिसीव्ह करू नयेत ,असे जाहीर आवाहन केलेले होते. पण यात मेख अशी आहे कि, ज्यांचे आप्त ,नातेवाईक,मित्र परदेशी व विशेषत: गल्फ मध्ये असतात ,अशा लोकांना वर उल्लेख केल्या सारख्या नंबर वरून सतत फोन येतात कारण ते परदेशी असलेले नातेवाईक voip सेवा वापरून call करत असतात . voip call करताना भारतातल्या फोन नंबरवर विचित्र नंबर येणे अगदी स्वाभाविक आहे .
काही परदेशी कंपन्यासुद्धा voip चा वापर करून telephonic interview घेतात .
यास्तव सगळेच विचित्र नंबर fraud नसतात ,हे लक्ष्यात घ्यावे. धन्यवाद.
इब्लिस, मस्त पोस्ट! तुम्ही
इब्लिस,
मस्त पोस्ट!
तुम्ही दुवे देऊ नका म्हणुनही १-२ देतो आहे >>>
दुवे नकोतच असे म्हटले नाही. अधिकृत असल्याची खात्री नसेल तर नको, इतकेच म्हणणे आहे.
व्हॉटस अॅप वर तर असल्या फेक
व्हॉटस अॅप वर तर असल्या फेक माहितीचा धुमाकूळ चालू असतो.
कुणी पुलकित इसरानी म्हणून व्हॉटस अॅप चा फाऊंडर आहे नि त्याने म्हणे आव्हान केलेय की अमके अमके करा म्हणजे हिरवा लोगो निळा होईल वगैरे वगैरे.
(No subject)
४) कुरकुरे, मॅगी ह्या व इतर
४) कुरकुरे, मॅगी ह्या व इतर कित्येक प्रकारच्या प्रॉडकट्स मध्ये घातक घटक असल्याचा दावा करणारे मेल्स, भारतातील बरीचशी औषधे अमेरिकेने बॅन ठरवलेली आहेत तरी भारतात वापरली जात आहेत, अशा अर्थाचे मेल्स अशा कितीतरी मेल्स च्या बाबतीत खरे-खोटे ठरविणेही अवघड होऊन बसते.
>>
मॅगीबाबत खरे ठरले
म्हणून देवावर जी श्रद्धा ठेवतात तीच अश्या मेल्सवर ठेवावी.
त्यांचीही खरी होण्याची प्रोबॅबिलिटी तीच असते जी देव पावण्याची असते
आताच एक आलेय. १५-३० नोव्हेंबर
आताच एक आलेय.
१५-३० नोव्हेंबर जगावर सूर्य उगवणारच नाही असे.
मस्त.. पण लाईटबिल जास्त येईल
मस्त.. पण लाईटबिल जास्त येईल त्याचे काय?
काही अपप्रचार वर्षानुवर्षे
काही अपप्रचार वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक केले गेलेले आहेत आणि आता ते "सत्य" म्हणून बिनदिक्कतपणे सांगितले जातात. त्याबाबत वस्तुस्थिती.
बाबासाहेब म्हणाले होते की आरक्षण दहा वर्षांनी बंद करा.
राजकीय आरक्षणाबाबतचे बाबासाहेबांनी मिळवलेले हक्क गांधीजींच्या उपोषणामुळे संपुष्टात आले. त्या वेळी झालेल्या कराराप्रमाणे राजकीय आरक्षण गांधीजींनी सांगितलेल्या अटींवर लागू झाले. त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्काचं काम करणारा कुणीही निवडून येणार नाही, तर काँग्रेसच्या दयेवर असणारा उमेदवार राखीव जागेतून निवडून येईल असं बाबासाहेबांच भविष्य प्रांतिक सरकारांच्या, प्रतिनिधीक सरकारच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या निवडणुकीत खरं ठरलं. त्यामुळे राजकीय आरक्षण अस्पृश्यांच्या कामाचे नसल्याने ते बंद करण्यात यावे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. शैक्षणिक आणि प्रशासनिक आरक्षणाबद्दल ते तसं म्हणाले नाहीत. त्यामुळंच राजकीय आरक्षणाबद्दल एकदम बंद न करता दहा वर्षे पाहू आणि मग ठरवू असं काँग्रेसचं म्हणनं होतं.
अमेरिकेत घर भाड्याने द्यायचे
अमेरिकेत घर भाड्याने द्यायचे होते. सुलेखामधे जाहिरात दिली होती. कुणी ऐश्वर्या चोप्रा नामक व्यक्तीने भाडेकरु बनण्यात स्वारस्य दाखवले. मी विचारले केव्हा बघायचे ते सांगा वगैरे. मग तिकडून हळूच सुरवात झाली. मी वेस्ट इंडिज मधे एका प्रोजेक्टवर आहे. प्रोजेक्ट लांबले आहे. काही प्रॉब्लेम आहे वगैरे. मग मी भाड्यापेक्षा जास्त पैसे वायरने पाठवते. तुम्ही भाड्याचे वळते करुन उरलेले चेकने पाठवा. मला हा अव्यापारेषू व्यापार अनाकलनीय वाटला. पण भाडेकरु मिळत नसल्यामुळे आगतिक झाल्यामुळे आणखी पत्रव्यवहार झाला. मग त्यात मस्का लावणे सुरु झाले. तुम्ही कित्ती कित्ती चांगले आहात माझी अडचण समजून घेत आहात वगैरे. पण मी खूप खूप बिझी आहे म्हणून मी वायर केले की लगेच चेक पाठवा. वगैरे सुरु झाले.
घर न बघता ते भाड्याने घेणे, घाईघाईने पैसे पाठवणे वगैरे धोक्याच्या घंटा दिसत होत्या त्यामुळे यथावकाश त्या चोप्राबाईंना मी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण एक फसवणुकीचा प्रकार कळला.
काही काळ वॉशिंग्टन डी सी भागातून फोन यायचा. तुमच्यावर एक फेडरल केस दाखल केलेली आहे. मी फेडरल पोलिस बोलतो आहे. बोलणारा देशी असावा आणि खोटा अमेरिकन अक्सेंट मारत असावा असे साफ कळत होते. मी विचारले की हे संभाषण मी रेकॉर्ड करणार आहे चालेल ना? लगेच कट.
खडी
खडी साखर
http://divyamarathi.bhaskar.com/dainikbhaskar2010/scripts/print/index.ph...
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4...
http://mdramteke.blogspot.in/2011_06_01_archive.html
http://www.bharat4india.com/easyblog-3/2013-01-25-07-54-13
जन गण मन हे गीत गुरुदेव टागोर
जन गण मन हे गीत गुरुदेव टागोर यांनी पंचम जॉर्ज च्या स्वागतासाठी लिहिले अशा धादांत खोटा प्रचार करणाऱ्या पोस्ट आणि लेख सध्या वॉट्स अप आणि फेसबुक वर फिरवले जात आहेत. एवढेच नव्हेतर त्यावरून चक्क गुरुदेवांच्या देशभक्तीवर शंका घेतल्या जात आहेत . याबाबत राज कुलकर्णी यांनी केलेला खुलासा प्रत्येकाने नक्की वाचावा..
https://www.facebook.com/groups/285662861537441/permalink/607887662648291/
यातला महत्वाचा भाग इथे डकवत आहे.
- कलकत्ता इथे २६ डिसेंबर १९११ रोजी कॉंग्रेस चे अधिवेशन होते ,त्याच्या दुस- या दिवशी हे गीत गायले गेले.
- ब्रिटीश वर्तमान पत्रांनी पंचम जॉर्ज ला खुश कारण्यासाठी चुकीची बातमी छापली आणि हे गीत पंचम जॉर्ज च्या स्वागतासाठी लिहिली गेले अशी अफवा सर्व कॉमन वेल्थ देशात पसरवली .
- वास्तविक रामभूज चौधरी यांनी हिंदी भाषेत लिहिलेले " बादशहा हमारा " हे गीत पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी लिहिले होते .
- २८ डिसेंबर १९११ रोजी अमृत बाजार पत्रिका मधील बातमी अशी आहे ...
""The proceedings of the Congress party session started with a prayer in Bengali to praise God (song of benediction). This was followed by a resolution expressing loyalty to King George V. Then another song was sung welcoming King George V." (Amrita Bazar Patrika, Dec.28,1911)
-याशिवाय "दि बेंगाली" या वर्तमानपत्रातील बातमी अशी आहे ..
"The annual session of Congress began by singing a song composed by the great Bengali poet Ravindranath Tagore. Then a resolution expressing loyalty to King George V was passed. A song paying a heartfelt homage to King George V was then sung by a group of boys and girls." (The Bengalee, Dec. 28, 1911)
याचा अर्थ असा कि ,त्या दिवशी दोन गीते म्हटली गेली होती . एक ईश्वर स्तुती करणारे टागोरांचे आणि ठराव पारित झाल्यानंतर पंचम जॉर्ज च्या सन्मानार्थ एक ! अशी दोन गीते म्हटली गेली .
कॉंग्रेस अधिवेशनाचा अहवाल सुद्धा याच बाबीचा दुजोरा देतो ....
"On the first day of 28th annual session of the Congress, proceedings started after singing Vande Mataram. On the second day the work began after singing a patriotic song by Babu Ravindranath Tagore. Messages from well wishers were then read and a resolution was passed expressing loyalty to King George V. Afterwards the song composed for welcoming King George V and Queen Mary was sung."
ही पोस्ट उडवण्यात येणार आहे. लिंक राहील. राकु यांची ही माहीती अचूक आहे काय ? .
हल्ली जुन्या हॉटमेलला रोज जवळ
हल्ली जुन्या हॉटमेलला रोज जवळ जवळ १००-१५० ईमेल जाहिराती येतात. कितीही स्वीप मधे टाकले तरी येतात. त्यातुन खरी ईमेल हरवतात. यावर कोणाला काही ठाम उपाय सापडलाय का की ज्यामुळे ही ईमेल येणे बंद होईल? ईमेल आयडी बदलायचा म्हणजे झंझट होणार.
Pages