Submitted by हर्ट on 8 November, 2012 - 23:38
इथे फक्त २०१२ च्या अदर्जेदार दिवाळी अंकांबद्दल लिहा.
इथे फक्त २०१२ च्या अदर्जेदार दिवाळी अंकांबद्दल लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी, अदर्जेदार? दर्जाहीन?
बी, अदर्जेदार? दर्जाहीन?
बी, हा रे कुठला शब्द?
बी, हा रे कुठला शब्द? अदर्जेदार?
दर्जा हा व्यक्तीसापेक्ष असतो. त्यामुळे एकाला दर्जेदार वाटलेला अंक दुसर्याला तद्दन फालतू वाटू शकतोच की. त्यापेक्षा इथे लोकांना वाचलेल्या दिवाळी अंकाबाबत चर्चा करू देत ना. प्रत्येक अंकामधे काय आवडले काय नाही ते इथे लिहिता येइल.
नंदीनी, बरोबर आहे! मग अशा
नंदीनी, बरोबर आहे! मग अशा वेळी चुकीचे मत खोडून काढून टाकायचा प्रयास इथे करु शकता. बघू कितपत प्रतिसाद मिळतो. नाही मिळाला तर फार फार तर एक बाफ वाया जाईल जो नंतर उडवता येईल. पण नवीन काहीतरी म्हणून प्रयोग करुन बघत आहे.
शैलजा, धन्स.
दर्जाहीन दिवाळी अंकांची
दर्जाहीन दिवाळी अंकांची माहिती लिहा पटापटा, म्हणजे ते घ्यायला नकोत
मग अशा वेळी चुकीचे मत खोडून
मग अशा वेळी चुकीचे मत खोडून काढून टाकायचा प्रयास इथे करु शकता.>> हे काही समजलं नाही.
मत हे बरोबर किंवा चुकीचे असणे हेच मुळात व्यक्तीसापेक्ष नाही का?
मला सलमान खान अतिशय आवडतो. तुला अजिबात आवडत नाही. मग कुणाचे मत बरोबर आणि कुणाचे चूक?
शैलजा, धन्स. केलयं नीट तुझं
शैलजा, धन्स. केलयं नीट तुझं नाव.
नंदीनी, तू येणार्या काळाची वाट पहा. बघ तुला ह्या बाफवर वेगळे प्रतिसाद वाचायला मिळतील. तुझा सापेक्षाचा मुद्दा मला मान्य आहे पण तरीही सगळेचं सापेक्ष नसते असेही वाटते.
बी, दोन वेगवेगळे बीबी
बी, दोन वेगवेगळे बीबी काढण्यापेक्षा वाचलेल्या दिवाळी अंकांचा एकच बीबी काढ. कुणाला काय आवडलं, नाही आवडलं ते प्रत्येकाला सांगता येइल. शिवाय एखाद्या अंकात चार उत्तम लेख आहेत आणि चार फालतू तर त्या अंकांबद्दल कुठे लिहायचं (प्लीज तिसरा बीबी काढू नकोस)
बी तु गटणे सारखा नको रे बोलु.
बी तु गटणे सारखा नको रे बोलु. प्लीज.
बी, दोन वेगवेगळे बीबी
बी, दोन वेगवेगळे बीबी काढण्यापेक्षा वाचलेल्या दिवाळी अंकांचा एकच बीबी काढ. कुणाला काय आवडलं, नाही आवडलं ते प्रत्येकाला सांगता येइल. शिवाय एखाद्या अंकात चार उत्तम लेख आहेत आणि चार फालतू तर त्या अंकांबद्दल कुठे लिहायचं (प्लीज तिसरा बीबी काढू नकोस)
>>>
+१
दर्जाहीन दिवाळी अंकांचा एक धागा आणि दर्जेदार दिवाळी अंकांचा दुसरा धागा अश्या दोन्ही धाग्यांवर लक्ष ठेवावे लागेल मग. आणि एखाद्याला दर्जेदार वाटलेला व तेथे तसे नमूद केलेला अंक इथे मात्र दर्जाहीन म्हणून गणला जाणार! असे नको प्लीजच!
अदर्जेदार? >>>
आपले आवडते साहित्य असेल तर तो
आपले आवडते साहित्य असेल तर तो दर्जेदार नाहीतर अदर्जेदार्.:फिदी:
कृपया तिसरा बाफ खरच नको, फुकट मिळाला तरी.:अओ:
'बी' मधला 'बी' सायलेन्ट ठेवून
'बी' मधला 'बी' सायलेन्ट ठेवून हा बाफ वाचला. 'ई'
बेफिकिर, आता तुमच्या नावातले
बेफिकिर, आता तुमच्या नावातले दोन्ही इ सायलेंट ठेऊन वाचा.
३९०८७ ऑलरेडी सुरू केलेला आहे!
३९०८७ ऑलरेडी सुरू केलेला आहे!
आता तुमच्या नावातले दोन्ही इ
आता तुमच्या नावातले दोन्ही इ सायलेंट ठेऊन वाचा.<<<
पण मी धागा काढला नाही
लॉजिकमध्ये मार खाताय तुम्ही अजून
यात धाग्याचा संबंध नव्हता..
यात धाग्याचा संबंध नव्हता.. खास तुमच्यासाठी तो विनोद केलेला होता. संपादन केले आहे.
तो विनोद नव्हता, माझे मूळ
तो विनोद नव्हता, माझे मूळ नांव तेच असायला हवे आहे पण ते चालणार नाही म्हणून मी जवळचा मराठी शब्द घेतला
तुमच्या नावात 'थ' सायलेंट. ते खरे 'थांबा' असायला हवे.
(अवांतराबद्दल क्षमस्व बी)
बेफी सिक्सर मारली की.
बेफी सिक्सर मारली की.
तुम्हा लोकांना जरा म्हणजे
तुम्हा लोकांना जरा म्हणजे अगदी किंचितही कुठल्या बीबीचे गांभिर्य नाही. मी हा बीबी टिंगलटवाळी करण्यासाठी काढलेला नाही. जर दर्जेदार दिवाळी अंक असू शकतात तसे दर्जाहीन दिवाळी अंक देखील असू शकतात आणि जसा दर्जा हा सापेक्ष आहे आहे तसा दर्जा नसणे हे देखील सापेक्ष आहे. म्हणून त्या त्या नावाचे बीबी उघडू नये असे नाही. असो. जर दोन तीन दिवस हा बीबी व्यर्थ गेला तर मी हा बीबी अप्रकाशित करेन. पण अता पुरे!
बी- काकोडकर दिवाळी हल्ली येतो
बी- काकोडकर दिवाळी हल्ली येतो की नाही माहित, असेल तर नको घेऊस
बाकी ते "अगदी किंचितही कुठल्या बीबीचे गांभिर्य नाही" हे मी चुकुन "अगदी किंचितही कुठल्या बीचे गांभिर्य नाही" असे वाचले.
श्या बाबा पाटील तुम्हाला
श्या बाबा पाटील तुम्हाला कश्शाकश्शाचंच गांभीर्य नाही बघा
लोक ठरवून दर्जाहीन दिवाळी अंक
लोक ठरवून दर्जाहीन दिवाळी अंक काढतात की काय?
(No subject)
दिवाळी अंकांच्या दर्जाबद्दल
दिवाळी अंकांच्या दर्जाबद्दल वाचकाचे मत हे नेहमीच संतुलीत असणे आवश्यक आहे. वर नंदिनी आपल्या प्रतिसादात म्हणतात त्यानुसार कोणत्याही ललितकृतीविषयीची आवडनिवड सापेक्ष असू शकते (सार्या जगभर कमालीची आर्थिक कमाई करून ऑस्करवरही झेंडा फडकविलेल्या 'टायटॅनिक' ला नावडता, दर्जाहीन आणि भावनेची विक्री करण्याचा धंदा म्हणणार्या जवळपास पन्नासएक परदेशस्थ रसिकांसमवेत मी याहू आंतरजालावर सुमारे एक आठवडाभर वाद घालत बसलो होतो. त्यांचेही काही मुद्दे नंतर मला विचार करण्यासारखे वाटू लागले होते, हे नाकबूल करण्यात अर्थ नाही.). मुद्दा असा की आज धागाकर्ते 'बी' याना 'लोकप्रभा' दिवाळी अंक दर्जाहीन वाटला तर तोच अंक इथल्याच कुणा सदस्याला अप्रतिमही वाटेल.
खरे सांगायचं झाल्यास मराठी मनाचा एक हळुवार कोपरा दिवाळी अंकांनी व्यापलेला असतो.....जवळपास पन्नाससाठ वर्षांची परंपरा आहे आणि आता त्याला निश्चित्तच सांस्कृतिक स्वरूप आले आहे. माझ्या पाहण्यात जे जे दिवाळी अंक येतात [मग ते विकत घेतलेले असोत वा सार्वजनिक वाचनालयात मिळणारे असोत] ते पाहताना संबंधित टीमचे कष्ट जरूर जाणवते. [इथल्याच एक सदस्या 'सावली' यानी इथे ओळख करून दिलेल्या 'फ' फोटोचा दिवाळी अंकावर निव्वळ नजर जरी टाकली तरी अंक काढण्यासाठी काय कष्ट पडत असावे याची पुसटशी का होईना, जाणीव होतेच]..... 'विनोदी' झालर लावलेल्या काही दिवाळी अंकांतील साहित्याचा दर्जा जसा अपेक्षित असतो तसा तो नसतो यावर दुमत होत नाही, पण म्हणून 'इन टोटो' तो अंकच अदर्जेदार मानला जाऊ नये.
'बेळगांवी' मासिकांबद्दल इथल्या कुणा सदस्याला खोलवर माहिती असण्याची शक्यता नाही....आता ती प्रकाशितही होत नाहीत. पण १९६० आणि १९७० या दोन दशकात या अंकांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. त्यांचेही दिवाळी अंक स्टॉलवरून हातोहात खपत....असे खपत की दिवाळीपूर्वीच 'अमुक एक अंक शिल्लक नाही' असे विक्रेता खडूने फलकावर लिहित असे. या अंकांना कसलाही दर्जा नव्हता.....साहित्य तर सेमीपोर्नोच असायचे पण कागदाचा, छ्पाईचा, बांधणीची दर्जाही भिकारच. पण ते घेणाराही एक वर्ग होताच होता.
वेल....बी यांचा विषयामागील हेतू स्तुत्य आहे, फक्त शीर्षकामुळे....काहीसा... गैरसमज होत आहे असे वाटते.
अशोक पाटील
पाटिल गुर्जी, हैदोस चा दिवाळी
पाटिल गुर्जी,
हैदोस चा दिवाळी अंक सांगताहात का तुम्ही?
डॉक्टर.... "हैदोस" चा दिवाळी
डॉक्टर....
"हैदोस" चा दिवाळी अंक मला कधी पाह्यला मिळाला नाही, पण त्या विषयी कोल्हापूरातील समवयस्क मित्रांमध्ये झालेली चर्चा आठवते....[अर्थात सर्वच दिवाळी अंकाच्या संदर्भात दर डिसेम्बरमध्ये आम्ही टाऊन हॉल बागेत चर्चेसाठी जमण्याचा प्रघात पाडला होता......मजा यायची.....पण ईडिअट बॉक्सने तो सारा प्रकार आता 'इतिहासजमा' करून टाकला याची खंत जरूर आहे.
बेळगावी प्रकारात 'तिलोत्तमा', 'चमचम', 'चांदणी' आणि 'रंगीली' ही काही ठळक नावे आजही आठवतात.....निपाणी स्टॅण्डवर मिळायची सारी.
बेळगावी म्हणजे काय ?
बेळगावी म्हणजे काय ?
"बेळगावी".....म्हणजे, १९६० ते
"बेळगावी".....म्हणजे, १९६० ते १९७० {अगदी १९७४ पर्यन्त म्हटले तरी चालेल} या दरम्यान ज्यावेळी महाराष्ट्रात "हंस...मोहिनी....नवल....सुगंध....रहस्यरंजन.... वाङ्मयशोभा....किर्लोस्कर....स्त्री....मनोहर...वसंत...." अशी निखळ निव्वळ मनोरंजनाला वाहिलेली मासिक निघत {'सत्यकथा' चा रुबाब आगळा होता}.... त्यांचा खप इथे विलक्षण असाच होता. खूप वाचनप्रेमी मंडळी त्या दशकात होती. यांच्या व्यतिरिक्त 'सिनेमा' विषयाला वाहिलेली 'रसरंग...." डायजेस्ट स्वरुपाचे 'अमृत', मुलांसाठी 'चांदोबा' आदीनी इथे एक हवीशी अशी संस्कृती निर्माण केली होती. त्याचा फायदा घेऊन बेळगाव शहरातून इकडे {त्यातही कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच पणजी इथेही} ज्याला अश्लील म्हटले जाऊ शकेल अशा मासिकांची विक्री सुरू झाली होती. इकडच्या "पोलिस टाईम्स" मध्ये ज्याप्रमाणे केवळ 'गुन्हा' विषय केन्द्रीत असतो तद्वत बेळगावहून येणार्या गठ्ठ्याचा 'शृंगार' हाच विषय असायचा....नावेही 'रंभा....उर्वशी...तिलोत्तमा...मदनिका...' अशीच सहेतूक दिलेली असायची.
या दरमहा येथील स्टॉल्सवर एकत्रित पडणार्या धबधब्याला यातील 'रसिक' मग 'बेळगावी' मासिके असेच म्हणू लागला होता. चार जिल्ह्यातील प्रत्येक एस.टी.स्टँडवर असलेल्या वर्तमानपत्र विक्रेत्याच्या बैठकीखाली या मासिकांचे गठ्ठे असत.
१९७५ नंतर मात्र अशी मासिक एकदमच बंद झाली.....ती नदीही मग आटलीच.
ओह ! माहितीबद्दल धन्यवाद. (
ओह ! माहितीबद्दल धन्यवाद.
( तुम्ही म्हणाल कि त्या काळचे तुम्हाला कसे माहीत नाही. तर चाचांचे वय आता खूपच झाले असल्याने खूप जुने आठवत नाही )