जगाच्या पाठीवर : सुधीर फडके (बाबुजी) यान्चे अपूर्ण आत्मचरित्र

Submitted by पशुपत on 8 November, 2012 - 01:30

बाबूजी म्हन्ट्ले की अतिशय सहज सुरेल ; शब्द आदरपूर्वक गाणारा मनस्वी गायक अशी त्यन्ची ओळख ! मनात प्रेमपूर्ण आदर !
"जगाच्या पाठीवर" हे अपूर्ण रहिलेले , गत जीवनाचा आढावा घेणारे लेखन . वयाच्या साठीनन्तर आठवेल तसे आणि हाती घेतलेल्या व्यापातून वेळ मिळेल तसे लिहिलेले. नियतीच्या फटक्याने सन्गीत साथीने विश्वसागरात त्यान्चे आयुश्य भरकटत राहिले याचे अतिशय विदीर्ण करणारे बाबूजीन्नी साधेपणाने केलेले कथन मनाला चटका लावून जाते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हे पुस्तक वाचले आहे. दुर्दैवाने आजारपणामुळे हे आत्मचरित्र अपूर्ण राहिले.
ह्या माणसाने आयुष्यात इतकी गरीबी पाहिली असेल असे वाटले नव्हते. अक्षरशः हातावर पोट. भूक शमवायला जवळजवळ भीक मागण्यापर्यंत वेळ आली होती. पण संगीतातील प्रतिभेच्या जोरावर इतकी मोठी मजल मारु शकले हे मोठे कर्तृत्व.
शिवाय गोव्याच्या मुक्तीसंग्रामात मोठा धोका पत्करुन सहभागी झाले.
एक वाचनीय पुस्तक.

प्रतीभावान व्यक्तीमत्वाला साधेपणाची जोड, मेहनत, चिकाटी, दृढनिष्ठा, सहजसुंदर लेखनशैली, उत्तम सादरीकरण, सामाजिक जाणिव आणि असे इतर अनेक पैलू बाबुजींचे चरित्र वाचताना मनावर कोरले जातात. मस्तच Happy